सुलेमानचा व्हिडिओ आणि सरकारची नाचक्की

शेवटी सांगण्याचे तात्पर्य म्हणजे ही सगळीच प्रकरणे जमीनीशी संबंधीत आहेत. मांद्रेतील माजी सरपंचांवरील हल्ला, मोरजीतील प्राणघातक हल्ला, आसगांवचे घरे मोडण्याचे प्रकरण आदी सर्वांचाच जमीन व्यवहारांशी संबंध असल्याने जमीन ही गोव्याच्या राजकारण, गुन्हेगारीकरणाचे केंद्रबिंदू बनले आहे, हे आपण विसरता कामा नये.

पोलिस खात्यात सगळ्यात सक्षम आणि कार्यक्षम विभाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुन्हा शाखेच्या कोठडीतून पोलिस शिपायाचीच मदत घेऊन पलायन केलेला सराईत गुन्हेगार सुलेमान उर्फ सिद्धीकी खान याने पोलिसांपेक्षा गुन्हेगार हुशार असल्याचेच सिद्ध केले आहे. पलायन करून लपून न बसता उघड्यावर एका ठिकाणी व्हिडिओ शुट करून तो पेन ड्रायव्हच्या माध्यमातून विरोधी गटातील एका पक्षाच्या प्रमुखांपर्यंत पोहचवणारा सुलेमान खरोखरच चलाखच आहे, हे देखील सिद्ध झाले आहे. सुलेमान याने व्हिडिओत उपसभापती जोशुआ डिसोझा यांच्यासहित पोलिस अधीक्षक, उपअधीक्षक तथा अन्य पोलिसांची काही नावे घेतली आहे. हे प्रकरणी सीबीआयकडे दिल्यास आपण शरण येण्यास तयार आहे,असेही तो म्हणाला आहे.
मुळातच सुलेमान खान याने उल्लेख केलेले म्हापसा गृहनिर्माण वसाहतीतील जमीन प्रकरण यापूर्वी आरटीआय कार्यकर्ते आत्माराम गडेकर यांनी उघड केले होते. १९९६ साली या जमीन खरेदीपत्रावर फ्रान्सिस डिसोझा यांचे नाव आहे. ते १९९९ साली पहिल्यांदा आमदार बनले. यानंतर कायदामंत्री, उपमुख्यमंत्री बनले. ते स्वर्गवासी होईपर्यंत म्हापशातून अपराजीत राहीले. ते खरेदीपत्र खोटे आहे, हे कळण्यासाठी २०२३ का उजाडावे लागले, हा प्रश्न गडेकर यांनी उपस्थित केला होता. आता तीच जागा पुन्हा आपल्या माणसाच्या नावे करा,असा हट्ट जोशुआ याने लावल्याचे सुलेमान याचे म्हणणे आहे. एसआयटीच्या चौकशीच्या कक्षेत आलेल्या अनेक खऱ्या गोष्टी बनावट आणि बनावट गोष्टी खऱ्या करण्याचे प्रयत्न सुरू आहेत की काय,असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होतो.
एका आयपीएस अधिकाऱ्याने आपल्याला एनकाउंटरची धमकी दिल्याचेही तो म्हणाला. आपण आयपीएस असल्याने सगळीकडे आपल्या ओळखीचे अधिकारी आहेत. कुठेही लपल्यास आपण शोधून काढून एनकाउंटर करू,असे तो अधिकारी म्हणाला,असे सुलेमान व्हिडिओत म्हणतो. आता हाच आयपीएस अधिकारी आपल्या ह्याच ओळखींची मदत घेऊन त्याच्या मुसक्या का आवळत नाही, याचे उत्तर कुणी द्यावे. शेवटी सांगण्याचे तात्पर्य म्हणजे ही सगळीच प्रकरणे जमीनीशी संबंधीत आहेत. मांद्रेतील माजी सरपंचांवरील हल्ला, मोरजीतील प्राणघातक हल्ला, आसगांवचे घरे मोडण्याचे प्रकरण आदी सर्वांचाच जमीन व्यवहारांशी संबंध असल्याने जमीन ही गोव्याच्या राजकारण, गुन्हेगारीकरणाचे केंद्रबिंदू बनले आहे, हे आपण विसरता कामा नये.
सुलेमानचे पलायन, त्याचा व्हिडिओ आणि एकूणच घडामोडी या सर्व सरकारच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या ठरल्या आहेत. राजकारणी, नोकरशहा आणि गुन्हेगारांचे साटेलोटे किती थरापर्यंत पोहचलेत, हेच यावरून दिसून येते आणि त्यामुळे जनतेसाठी ही धोक्याची घंटाच म्हणावी लागणार आहे. पोलिस हे जनतेचे सरंक्षक असे म्हणून आम्ही ओळखतो परंतु हेच पोलिस उघडपणे जर गुन्हेगारांचे हस्तक म्हणून वावरत असतील तर कोण सुरक्षीत आहे, असा प्रश्न निर्माण होईल. मग आपले राजकीय नेते, अतिमहनीय व्यक्ती किंवा सर्वसामान्य जनता ही देखील असुरक्षीत आहे, असाच त्याचा अर्थ होत नाही का?

  • Related Posts

    विजयबाब संयमाने घ्या…

    सरदेसाई यांना श्रद्धा आणि सबुरी हे दोन मंत्र जपावे लागतील. हुळवारपणे आपली डागाळलेली प्रतिमा सुधारून फासे टाकले तरच ते राजकारणात विजयी ठरतील हे त्यांनी लक्षात ठेवावे. बाणावलीचे आमदार वेन्झी व्हीएगस…

    मनोज परब आगे बढो…

    आरजीपी जर गोंयकारांसाठी काम करणारा पक्ष आहे, गोंयकारांचे हित जपणारा पक्ष आहे आणि गोंयकारांच्या भवितव्याचे रक्षण करण्यासाठी स्थापन झालेला पक्ष असेल तर गोंयकारांनीच या पक्षाला मदत करावी लागेल आणि या…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    22/01/2025 e-paper

    22/01/2025 e-paper

    धीर आणि वीरतेचा संगम – धिरेंद्र फडते

    धीर आणि वीरतेचा संगम – धिरेंद्र फडते

    सावित्री गावडे हीला न्याय मिळणार ?

    सावित्री गावडे हीला न्याय मिळणार ?

    विजय सरदेसाई सापडले चक्रव्यूहात

    विजय सरदेसाई सापडले चक्रव्यूहात

    विजयबाब संयमाने घ्या…

    विजयबाब संयमाने घ्या…

    मनोज परब आगे बढो…

    मनोज परब आगे बढो…
    error: Content is protected !!