हातात नारळ की नारळावर हात ?

आरजीपीचा फुटबॉल स्वबळावर गोल करण्याच्या तयारीत



गांवकारी, दि.५ (प्रतिनिधी)

मोठ्या दिमाखात घोषणा झालेली महाविरोधी आघाडी घडण्यापूर्वीच बिघडल्यात जमा झाली आहे. आघाडीतील घटकांना विश्वासात न घेता काँग्रेसने उमेदवारांची घोषणा केल्याचे निमित्त करून आरजीपीने पहिली आणि दुसरी यादी जाहीर करत आघाडीतून काढता पाय घेतल्याचे संकेत दिले आहेत. आता काँग्रेस आणि गोवा फॉरवर्डच्या आघाडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आरजीपीचा घात करण्याची व्यूहरचना – मनोज परब
राज्यातील भाजपला पराभूत करणे हे एकमेव उद्दिष्ट आरजीपीने डोळ्यांसमोर ठेवले आहे. मागील लोकसभा निवडणुकीत आघाडीत सहभागी न झाल्यामुळे अनेकांनी आरजीपीला दोष दिला. लोकांच्या भावनांचा विचार करून यावेळी काँग्रेस आणि गोवा फॉरवर्डसोबत एकत्र येण्याचे प्रयत्न केले, असे आरजीपीचे अध्यक्ष मनोज परब यांनी सांगितले.
प्रारंभापासून झालेल्या चर्चेत काही नेते भाजपच्या पराभवापेक्षा स्वतःचे वेगळे राजकारण साधण्याचा प्रयत्न करत असल्याचे जाणवले. तरीही आरजीपीने काही प्रमाणात माघार घेऊन तडजोडीचे धोरण स्वीकारले. आघाडीची चर्चा पुढे जात असताना आरजीपीला बेसावध ठेवून अंतिम क्षणी धोका देण्याची रणनिती आखली जात असल्याची माहिती मिळाली.
या रणनितीचा भाग म्हणूनच काँग्रेसने आघाडीतील घटकांना विश्वासात न घेता पहिली यादी जाहीर केली. ही यादी मुकाट्याने मान्य केली असती तर दुसरी यादी जाहीर करून आरजीपीने दावा केलेल्या जागांवर उमेदवार उतरवून पक्षात यादवी माजवण्याची योजना होती. हा डाव वेळीच ओळखल्यामुळे आरजीपीने तातडीने पावले उचलून आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केली, असे परब यांनी सांगितले.
या यादीमुळे काँग्रेसच्या छुप्या नेत्यांचा डाव फसला. विश्वासावरच आघाडीचा पाया रचला जाणे गरजेचे आहे. आरजीपीचा विश्वासघात करून पक्षात दुफळी माजवण्याचा हा डाव ओळखल्यामुळेच पक्षाने स्वतंत्रपणे उमेदवार जाहीर केले. विधानसभेसाठी आघाडीची शक्यता आरजीपी फेटाळत नाही, पण त्यासाठी काँग्रेसने प्रामाणिक आणि स्वच्छ मनाने पुढे यावे लागेल, असेही परब यांनी स्पष्ट केले.
गोवा फॉरवर्डची यादी अडकली
काँग्रेस आणि आरजीपीने अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केली असली तरी गोवा फॉरवर्ड मात्र अडकली आहे. दत्तजयंतीदिनी उमेदवार जाहीर करणार असल्याचे सांगितले गेले होते, परंतु दत्तजयंतीचा मुहूर्त संपला तरी यादी जाहीर झालेली नाही.
आता आरजीपीने २६ उमेदवारांची यादी जाहीर करून आघाडीतून बाहेर पडल्याचे स्पष्ट संकेत दिल्याने काँग्रेस आणि गोवा फॉरवर्डची आघाडी कायम ठेवावी की स्वतंत्रपणे निवडणुकीत उतरावे, याचा निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.
काँग्रेसची ४४ उमेदवारांची यादी
काँग्रेसने आपल्या रणनितीचा भाग म्हणून ४४ उमेदवारांची यादी तयार केली आहे. आरजीपीने आघाडीतून काढता पाय घेतल्याने आता गोवा फॉरवर्डच्या आघाडीबाबतचा निर्णय आज प्रभारी माणिकराव ठाकरे यांच्या उपस्थितीत होणार आहे. या निर्णयानंतरच काँग्रेसची दुसरी यादी निश्चित होणार आहे. गोवा फॉरवर्ड पक्षानेही सावध भूमिका घेत काँग्रेसच्या प्रतिसादाची वाट पाहण्याचा निर्णय घेतल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे.
राजकीय पक्षांनी जाहीर केलेले उमेदवार
• भाजप – ४०
• मगो – १
• काँग्रेस – ११
• आरजीपी – २६
• आप – ३२

  • Related Posts

    कदंब कर्मचाऱ्यांची सरकारकडून परवड

    प्रखर आंदोलनाचा संघटनेचा इशारागांवकारी, दि. २३ (प्रतिनिधी) कदंब परिवहन महामंडळाचे खाजगीकरण करण्याचा सरकारचा डाव आहे. दिवसेंदिवस महामंडळ आपली जबाबदारी झटकून कर्मचाऱ्यांना खाजगी कंत्राटदार कंपन्यांच्या दाव्याला बांधत आहे. हा प्रकार अजिबात…

    St Andre MLA Viresh Borkar Moves Breach of Privilege Notice Against Speaker Over Assembly Proceedings

    Panaji, March 21, 2026: St Andre MLA Viresh Borkar has submitted a Notice of Motion for Breach of Privilege under Rule 76 of the Goa Legislative Assembly, raising serious concerns…

    You Missed

    23/03/2026 e-paper

    23/03/2026 e-paper

    गोव्याची वाटचाल अराजकतेकडे…

    गोव्याची वाटचाल अराजकतेकडे…

    कदंब कर्मचाऱ्यांची सरकारकडून परवड

    कदंब कर्मचाऱ्यांची सरकारकडून परवड

    St Andre MLA Viresh Borkar Moves Breach of Privilege Notice Against Speaker Over Assembly Proceedings

    St Andre MLA Viresh Borkar Moves Breach of Privilege Notice Against Speaker Over Assembly Proceedings

    21/03/2026 e-paper

    21/03/2026 e-paper

    किती म्हणून सहन करणार ?

    किती म्हणून सहन करणार ?