वनक्षेत्राच्या रूपांतरणाचे प्रकरण दक्षता खात्याकडे

स्वप्नेश शेर्लेकर यांची जिज के. वार्केविरोधात तक्रार

पणजी, दि. १० (प्रतिनिधी)

बार्देश तालुक्यातील साल्वादोर दी मुंद पंचायत क्षेत्रात वनक्षेत्र म्हणून नोंद झालेल्या जमिनीच्या रूपांतरणासाठी ना हरकत दाखल्याची शिफारस केलेले उत्तर गोवा उपवनसंरक्षक जिज के. वार्के यांच्याविरोधात सामाजिक कार्यकर्ते स्वप्नेश शेर्लेकर यांनी दक्षता खात्याकडे तक्रार दाखल केली आहे.
या प्रकरणी भ्रष्टाचार आणि अनियमिततेबाबत तपास व्हावा, असे शेर्लेकर यांनी म्हटले आहे. साल्वादोर दी मुंद पंचायत क्षेत्रातील सर्वे क्रमांक १५५/५ मध्ये १२,२२५ चौ.मी. क्षेत्रफळाची खाजगी वनक्षेत्र म्हणून नोंद झालेल्या जमिनीच्या रूपांतरणाला उत्तर गोवा उपवनसंरक्षक जिज के. वार्के यांनी ना हरकत दिली होती आणि ही जमीन खाजगी वनक्षेत्रात येत नाही, असेही आपल्या शिफारस पत्रात म्हटले होते, असे शेर्लेकर यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.
२२ जून २०२२ रोजी उत्तर गोवा वन विभागाचे उप वनसंरक्षक जिज के. वार्के यांनी वनक्षेत्र रूपांतरणासाठी अतिरिक्त जिल्हाधिकारी-३ (उत्तर गोवा) यांना ना हरकत प्रमाणपत्र जारी केले होते.
खाजगी वनक्षेत्राचा अभ्यास करण्यासाठी सरकारने नियुक्त केलेल्या राज्यस्तरीय तज्ज्ञ समित्या (सावंत / डॉ. करापुरकर / व्ही. टी. थॉमस / पुनरावलोकन समिती डीसीएफ, वर्किंग प्लान) आदींच्या अहवालानुसार खाजगी वन क्षेत्रात या जमिनीचा उल्लेख आहे. एवढे करून खोटी माहिती देण्याचे प्रयोजन काय, असा सवाल शेर्लेकर यांनी केला आहे. हा प्रकार भ्रष्टाचाराशी संबंधित असल्याने त्याची चौकशी होणे गरजेचे आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, या जमिनीतील झाडांचे चटई क्षेत्र तसेच डोंगराच्या उंचीबाबतही खोटी माहिती दिल्याचा दावा त्यांनी केला आहे. हा विषय गंभीर असल्याने त्याचा लवकरात लवकर तपास व्हावा आणि सत्य काय हे उघड व्हावे, असेही शेर्लेकर यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

  • Related Posts

    बहुजनांचे ‘पात्रांव’ रवी नाईक यांचे निधन

    तीन दिवसांचा दुखवटा; सार्वजनिक सुट्टी जाहीर गांवकारी, दि. १५ (प्रतिनिधी) राज्याचे कृषीमंत्री, माजी मुख्यमंत्री, माजी खासदार आणि बहुजन समाजाचे लोकप्रिय नेते रवी नाईक यांचे मंगळवारी रात्री ११.३० वाजता हृदयविकाराच्या तीव्र…

    खरेच आम्ही ”शिकोन ब्रृत” ?

    साक्षरतेत शंभर टक्के उच्चांक गाठलेल्या गोव्यात हे प्रकार पाहिल्यानंतर “शिकोन ब्रृत” ही कोकणी म्हण खरी ठरते आहे, याचे दुःख वाटते. सासष्टी तालुक्यातील गिरदोळी, आंबावली आणि चांदोर पंचायतीत एकाच कंत्राटदाराकडून जीआयए…

    You Missed

    पोलीस निष्क्रियतेवर ‘रासुका’ची मात्रा!

    पोलीस निष्क्रियतेवर ‘रासुका’ची मात्रा!

    बांबोळी ”ब्लॅकस्पॉट” सरकारनिर्मित

    बांबोळी ”ब्लॅकस्पॉट” सरकारनिर्मित

    06/11/2025 e-paper

    05/11/2025 e-paper

    राजकीय दबावाने पोलिस खाते कोलमडले…

    राजकीय दबावाने पोलिस खाते कोलमडले…

    वोट चोरी : लोकशाहीलाच सुरूंग

    वोट चोरी : लोकशाहीलाच सुरूंग
    error: Content is protected !!