वझरी- पेडणेत सोमवीर खत्रीचा प्रवेश!

कोर्ट रिसीव्हरच्या जमीन विक्रीवरून स्थानिकांत तीव्र संताप

गांवकारी, दि. २५ (प्रतिनिधी)

पेडणे तालुक्यातील वझरी गांवात कोर्ट रिसीव्हरच्या जमीन मालकीच्या विषयावरून आधीच वातावरण स्फोटक बनले आहे. आता ह्याच कोर्ट रिसीव्हरच्या वारस असल्याचा दावा करून श्रीमती चारूशीला दत्तराज देसाई उर्फ चारूशीला यशवंत कामत हीने सुमारे अडीच लाख चौरसमीटर जमीन ब्रोटबर्ग रिएलीटी प्रा. लिमीटेड या कंपनीला विकल्याची माहिती समोर आली आहे. या कंपनीचे संचालक सोमवीर खत्री नामक व्यक्तीच्या नावे ही चार विक्रीखते पेडणे उपनिबंधक कार्यालयाकडे नोंद झाली आहेत.
गोवा मुक्तीपूर्वकालापासूनचा वाद
गोवा मुक्ती पूर्वकालापासून वझरी गावांतील जमीनीच्या मालकीचा वाद सुरू आहे. वझरी गांवच्या ग्रामस्थांनी आधीच उपनिबंधक पेडणे यांना या वादाची कल्पना दिली होती की सर्वेक्षण प्रक्रिये दरम्यान, महसूल कार्यालयाने चुकीने शंकरजी जसवंतराव देसाई यांचे नाव एक चौदाच्या उताऱ्यावर कब्जेदार कॉलममध्ये कोर्ट रिसीव्हर म्हणून नोंदवले होते. यानंतर, १९८२ साली सुरेंद्रनाथ श्रीपाद देसाई यांनी इन्व्हेंटरी प्रक्रिया क्रमांक १२८ / ६५ दाखल केली आणि त्याद्वारे पेडणे मामलेदार कार्यालयाला अंधारात ठेवून आपले नाव कब्जेदार कॉलममध्ये म्यूटेट करून घेतले. यामध्ये वझरी गांवच्या पठार आणि डोंगरी जमीनींचा समावेश आहे. वास्तविक वझरी गांव हा कोमुनिदाद आणि गांवकऱ्यांची मालमत्ता आहे.
सरकारला कल्पना देऊनही बेफिकीरी…
वझरी गांवातील या कोर्ट रिसीव्हर जमीन वादाची माहिती वझरी गांवातील नागरीक आणि शेतकरी संघटनेकडून महसूल, उपनिबंधक तथा मुख्यमंत्री, महसूलमंत्र्यांना देण्यात आली आहे. कुठल्याही प्रकारे ही जमीन विक्री करता येणार नाही. वझरी गांवात कोमुनिदाद होती आणि ही जमीन पूर्णतः गांवकऱ्यांची असल्याने कोर्ट रिसीव्हरच्या नावाखाली गांवची मालकी या कुटुंबाला मिळणे अशक्य आहे. पोर्तुगीज प्रशासनातील काही लोकांना हाताशी धरून गांवकऱ्यांची जमीन बेकायदा पद्धतीने आपल्या नावावर करून आता या जमीनी विकण्याचा घाट घालण्यात आला आहे, असा आरोप वझरी ग्रामस्थांनी केला आहे.
ब्रोटबर्ग रिएलीटी प्रा.लिमीटेड कंपनी कुठली ?
वझरीवासियांकडून मिळालेल्या माहितीनुसार आत्तापर्यंत चार विक्री खते चारूशीला देसाई यांनी केली आहेत. ही विक्री ब्रोटबेरा रिएलीटी प्रा. लिमिटेड या कंपनीच्या नावे केली असून ही कंपनी करंझाळे येथील आहे. ही कंपनी नुकतीच १८ मार्च २०२४ रोजी स्थापन करण्यात आली. या कंपनीचे संचालक तौसिफ अहमद मोमीन, परवेझ रफिक अहमद मोमीन आणि सोमवीर खत्री अशी आहेत. कंपनीच्या संचालक मंडळाने सोमवीर खत्री यांच्या नावे खरेदीखते नोंद करण्याचा ठराव घेतला आहे. विशेष म्हणजे सोमवीर खत्री याने आपला पत्ता खालचावाडा- हरमल असा नोंदवला आहे.
दोन मंत्र्यांचा हात?
वझरी- पेडणेच्या या जमीन व्यवहारात सरकारातील दोन मंत्री सहभागी असल्याची जोरदार चर्चा वझरी गावांत सुरू आहे. ही विक्री करण्यापूर्वी जमीन मोजमापणीसाठी आलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना स्थानिकांनी मज्जाव केला होता. कोर्ट रिसीव्हरच्या या प्रकरणाचा कायदेशीर अभ्यास करून वझरीवासियांना न्याय देण्याची मागणी येथील शेतकरी संघटनेने करूनही सरकारने त्याबाबत काहीच केले नाही. आता सुरेंद्रनाथ श्रीपाद देसाई यांच्या कुटुंबातील एकमेव वारस म्हणून चारूशीला देसाई या आहेत. ही जमीन गांवकरी ताब्यात घेतील या भीतीने आता तिने सरकारातीलच काही मंत्र्यांना हाताशी धरून ही जमीन विक्री करण्याचे प्रयत्न चालवले आहेत, अशीही खबर आहे. सरकारी आशीर्वादाशिवाय हे घडूच शकत नाही. वझरीवासियांच्या पूर्वजांनी या जमीनी कसवल्या, तिथे काजू पिक घेतले आणि आता या जमीनी अशा तऱ्हेने परस्पर विकण्याचे प्रकार घडू लागले तर वझरी गावांत तीव्र उठाव होण्याची शक्यता असून त्यात कायदा सुव्यवस्थाही अडचणीत येण्याची शक्यता आहे.

  • Related Posts

    जीत आरोलकर यांच्या अडचणीत वाढ

    रवळू खलप यांचे सर्वोच्च न्यायालयात आव्हान गांवकारी, दि. ८ (प्रतिनिधी) मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांच्याविरोधात जमीन हडप प्रकरणी पेडणे पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरविला होता. या निवाड्याला…

    CM Sawant Interacts with Artisans, Highlights Welfare Schemes and Market Opportunities

    Chief Minister Dr. Pramod Sawant on Saturday interacted with artisans, weavers, entrepreneurs and stakeholders from Goa’s handicrafts, textile and coir sectors, discussing government schemes, reforms and opportunities for strengthening traditional livelihoods.

    You Missed

    08/08/2026 e-paper

    08/08/2026 e-paper

    जीत आरोलकर यांच्या अडचणीत वाढ

    जीत आरोलकर यांच्या अडचणीत वाढ

    धबधब्यांवरील मृत्यूंची जबाबदारी कोणाची ?

    धबधब्यांवरील मृत्यूंची जबाबदारी कोणाची ?

    CM Sawant Interacts with Artisans, Highlights Welfare Schemes and Market Opportunities

    CM Sawant Interacts with Artisans, Highlights Welfare Schemes and Market Opportunities

    ₹2.53 Crore for Festival, but Mormugao Still Awaits Water and Jobs: Chopdekar

    ₹2.53 Crore for Festival, but Mormugao Still Awaits Water and Jobs: Chopdekar

    Curchorem: Subhash Phal Dessai Seeks People’s Blessings Ahead of Political Shift

    Curchorem: Subhash Phal Dessai Seeks People’s Blessings Ahead of Political Shift