वेलिंगकरांनी ठोठावलेउच्च न्यायालयाचे दरवाजेअटकपूर्व जामीनावर उद्या सुनावणी

पणजी,दि.९(प्रतिनिधी)- सेंट फ्रान्सिस झेविअर यांच्याप्रती प्रक्षोभक वक्तव्य करून धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेले आणि अतिरीक्त सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळलेले सुभाष वेलिंगकर यांनी आता मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाचे दरवाजे ठोठावले आहेत.


सुभाष वेलिंगकर यांच्यावतीने त्यांच्या वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर उद्या १० रोजी सुनावणी होईल. मुळातच दोन वेळा नोटीसा पाठवूनही ते पोलिसांसमोर चौकशीसाठी हजर राहीले नसल्याचा आधार घेऊन अतिरीक्त सत्र न्यायालयाने त्यांचा जामीनासाठीचा अर्ज फेटाळून लावला होता. तरिही ते अद्यापही पोलिसांसमोर हजर राहीले नसल्याने उच्च न्यायालय याबाबतीत नेमकी काय भूमीका घेतात, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
समर्थकांकडून वक्तव्याची पुर्नरावृत्ती
राज्यात धार्मिक तणाव निर्माण झाल्यानंतर चर्च तथा विविध सामाजिक संघटना, सामाजिक कार्यकर्ते यांनी आपल्या ख्रिस्ती धर्मियांना शांत राहण्याचा आणि रस्त्यावर न उतरण्याचा सल्ला दिल्यानंतर काही प्रमाणात वातावरण निवळले परंतु वेलिंगकरांचे समर्थन करणारे काही हिंदू गट आणि संघटना तसेच वैयक्तीक कार्यकर्ते समाज माध्यमांवरून भडकाऊ पोस्ट टाकत असल्याने तसेच वेलिंगकर अडचणीत आलेल्या वक्तव्याचाच पुर्नउच्चार करत असल्याने पुन्हा एकदा भडका उडण्याची शक्यता आहे. पोलिसांनी अशांवर लगेच कारवाई करावी,अशी मागणी सुरू झाली आहे.

डिचोली पोलिसांनी सुभाष वेलिंगकर यांना चौकशीसाठी आता तिसरी नोटीस जारी केली आहे. त्यांना उद्या १० रोजी डिचोली पोलिस स्थानकावर बोलावण्यात आले आहे. उद्याच मुंबई उच्च न्यायालयात त्यांच्या अटकपूर्व जामीनावर सुनावणी होणार असल्याने कदाचित ते पोलिसांसमोर चौकशीसाठी हजर राहण्याची शक्यता आहे. त्यांची चौकशीसाठीची अनुपस्थिती हेच जामीन फेटाळण्याचे कारण ठरल्याने ते पोलिसांसमोर हजर राहू शकतात.

  • Related Posts

    अर्थसंकल्पीय अधिवेशनात राजकीय युद्ध

    विरोधक आणि सत्ताधारी सज्ज गांवकारी, दि. ५ (प्रतिनिधी) गोवा विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन शुक्रवार, ६ मार्चपासून सुरू होत आहे. २७ मार्च २०२६ पर्यंत चालणाऱ्या या अधिवेशनात १४ दिवसांचे कामकाज होणार आहे.…

    मिराबागवासीय आझाद मैदानावर धडकणार

    सरकारकडून आंदोलनाकडे दुर्लक्ष गांवकारी, दि. ४ (प्रतिनिधी) सावर्डे मतदारसंघातील मिराबागवासीयांचे गेल्या २३ दिवसांपासून सुरू असलेले नियोजित बंधाराविरोधातील आंदोलन सरकारने पूर्णपणे दुर्लक्षित केले आहे. आंदोलन तीव्र करण्याच्या इराद्याने अखेर आंदोलकांनी गुरुवारी…

    You Missed

    05/03/2026 e-paper

    05/03/2026 e-paper

    अर्थसंकल्पीय अधिवेशनात राजकीय युद्ध

    अर्थसंकल्पीय अधिवेशनात राजकीय युद्ध

    मुख्यमंत्र्यांची कसोटी

    मुख्यमंत्र्यांची कसोटी

    LoP condemns Govt’s move to denotify 3.33 lakh sq. mt Cada land for Casinos

    LoP condemns Govt’s move to denotify 3.33 lakh sq. mt Cada land for Casinos

    04/03/2026 e-paper

    04/03/2026 e-paper

    मिराबागवासीय आझाद मैदानावर धडकणार

    मिराबागवासीय आझाद मैदानावर धडकणार