गोवा मराठी पत्रकार संघाच्या नूतन कार्यकारिणीचे अधिकारग्रहण

पणजी,दि. ४ (प्रतिनिधी) : गोवा मराठी पत्रकार संघाच्या नूतन कार्यकारिणीचा अधिकारग्रहण सोहळा नुकताच पार पडला. संघाच्या सर्वसाधारण सभेत मावळते अध्यक्ष वामन प्रभू यांनी नूतन अध्यक्ष सुरेश स. नाईक यांच्याकडे अध्यक्षपदाची सूत्रे सुपूर्द केली. निर्वाचन अधिकारी सुरेश काणकोणकर यांनी पुढील दोन वर्षांसाठी बिनविरोध निवड झालेल्या कार्यकारिणीची अधिकृत घोषणा केली.

नूतन कार्यकारिणीत अध्यक्षपदी सुरेश स. नाईक, उपाध्यक्षपदी गंगाराम महांबरे व विठ्ठल पारवाडकर, सचिवपदी सुभाष कृ. नाईक, संयुक्त सचिवपदी नितीन कोरगावकर आणि कोषाध्यक्षपदी सुधाकर नाईक यांची निवड झाली आहे. कार्यकारी सदस्यांमध्ये माजी अध्यक्ष वामन प्रभू, दत्ता शिरोडकर, निलेश नाईक, अनुया शिरोडकर, अनुराधा मोघे आणि अरविंद धुरी यांचा समावेश आहे.

मावळते अध्यक्ष वामन प्रभू यांनी आपल्या स्वागतपर भाषणात संघाच्या वाटचालीचा आढावा घेतला. संघाला नवसंजीवनी देण्याबरोबरच संस्थेची अधिकृत नोंदणी करून विविध उपक्रम राबविण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची त्यांनी माहिती दिली. यावेळी सचिव सुभाष नाईक यांनी संघाच्या कार्याचा अहवाल सादर केला.

नूतन अध्यक्ष सुरेश नाईक यांनी आपली बिनविरोध निवड केल्याबद्दल सर्व सदस्यांचे आभार मानले. संघाच्या कार्याला अधिक व्यापक स्वरूप देण्यासाठी सर्व सदस्यांचा सक्रिय सहभाग आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यकारिणी ही संघाचे कामकाज चालविणारी व्यवस्था असून, संघाच्या विविध उपक्रमांत प्रत्येक सदस्याने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

  • Related Posts

    Chicalim Panchayat Secretary Issues Show-Cause Notice to Own Sarpanch Over Alleged Illegal Commercial Complex

    The Chicalim Village Panchayat Secretary has issued a show-cause notice to Sarpanch Kamla Prasad Yadav and five others over alleged illegal construction and unauthorised commercial activities involving 95 shops and residential rooms at a multi-storeyed complex in Dabolim. The notice raises questions about past inaction and administrative accountability.

    कुणीतरी टॉयलेट द्या हो !

    A short summary about the plea for public toilets.

    You Missed

    गोवा मराठी पत्रकार संघाच्या नूतन कार्यकारिणीचे अधिकारग्रहण

    गोवा मराठी पत्रकार संघाच्या नूतन कार्यकारिणीचे अधिकारग्रहण

    Chicalim Panchayat Secretary Issues Show-Cause Notice to Own Sarpanch Over Alleged Illegal Commercial Complex

    Chicalim Panchayat Secretary Issues Show-Cause Notice to Own Sarpanch Over Alleged Illegal Commercial Complex

    कुणीतरी टॉयलेट द्या हो !

    कुणीतरी टॉयलेट द्या हो !

    पायलटांच्या प्रलंबित योजना आठ दिवसांत सुरू करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

    पायलटांच्या प्रलंबित योजना आठ दिवसांत सुरू करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

    Goa Government Signs MoU with The Modern Data Company to Introduce AI in Governance

    Goa Government Signs MoU with The Modern Data Company to Introduce AI in Governance

    राज्याच्या ‘केअर्स’ समितीवर मांगिरीश, सुनया यांची नियुक्ती

    राज्याच्या ‘केअर्स’ समितीवर मांगिरीश, सुनया यांची नियुक्ती