‘२०२७ मध्ये नोकऱ्या’ हे बेरोजगार युवकांच्या जखमेवर मीठ

*_सत्तेत आज आहात, मग रोजगारासाठी २०२७ पर्यंत थांबायचे कशाला?_*

राष्ट्रध्वजाच्या भावनिक मुद्द्याआड बेरोजगारीचा प्रश्न दडपण्याचा प्रयत्न : विश्वासराव राणे

वाळपई, दि.१६:

गोव्यातील बेरोजगार युवकांना सरकारी नोकऱ्यांची वारंवार आश्वासने देऊनही प्रत्यक्षात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात सरकार अपयशी ठरले आहे. आता वाढत्या बेरोजगारीवर युवकांकडून प्रश्न विचारले जात असताना राष्ट्रध्वजाचा भावनिक मुद्दा पुढे करून त्यांचे लक्ष विचलित करण्याचा आणि ‘२०२७ मध्ये भाजपचे सरकार आल्यास सरकारी नोकऱ्या देऊ’ असे नवे आश्वासन देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा जोरदार आरोप विश्वासराव राणे यांनी केला आहे.

“संबंधित मंत्री आजही भाजप सरकारचाच भाग आहेत. मग युवकांना नोकऱ्यांसाठी २०२७ पर्यंत का थांबावे लागणार? आज सत्तेत असताना जी आश्वासने पूर्ण करता येऊ शकतात, ती निवडणुकीनंतर पूर्ण करण्याची भाषा का केली जात आहे?” असा थेट सवाल राणे यांनी आपल्या प्रसिद्धीपत्रकातून उपस्थित केला आहे.

गोव्यातील युवकांना आता आणखी मुदती आणि आश्वासने नकोत, तर नोकऱ्या, रोजगाराच्या संधी आणि सरकारची जबाबदारी निश्चित करणारी उत्तरे हवी आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.

‘सरकार अपयशी असेल तर मंत्रीही जबाबदार’

राणे यांनी मंत्र्यांच्या भूमिकेतील विरोधाभासावरही बोट ठेवले. सध्याचे सरकार रोजगारनिर्मितीत अपयशी ठरले आहे, असे मंत्र्यांना वाटत असेल तर त्या सरकारचा एक भाग म्हणून स्वतःची जबाबदारी किती, याचे उत्तरही त्यांनी जनतेला द्यावे. एका बाजूला विद्यमान परिस्थितीची जबाबदारी मुख्यमंत्र्यांकडे ढकलायची आणि दुसऱ्या बाजूला भविष्यातील नोकऱ्यांचे श्रेय स्वतः घेण्याचा प्रयत्न करायचा, हे स्वीकारता येणार नाही, असे त्यांनी म्हटले.

‘राष्ट्रध्वजाचा राजकीय ढाल म्हणून वापर नको’

राष्ट्रध्वज हा प्रत्येक भारतीयाचा आहे. बेरोजगारी आणि सरकारच्या कारभारावरील प्रश्नांपासून लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी राष्ट्रध्वज किंवा राष्ट्रीय भावनांचा राजकीय साधन म्हणून वापर होऊ नये, अशी स्पष्ट भूमिका राणे यांनी मांडली.

गोव्यातील तरुणांना भावनिक प्रतीकांच्या माध्यमातून किंवा भविष्यातील आश्वासनांच्या आधारे मूळ प्रश्नांपासून दूर नेता येणार नाही. आज रोजगार मागणाऱ्या युवकांना २०२७ ची तारीख दाखवणे म्हणजे त्यांच्या प्रश्नाचे उत्तर नव्हे, असेही त्यांनी म्हटले.

“गोव्याच्या युवकांची मागणी अत्यंत स्पष्ट आहे—नोकऱ्या द्या, संधी द्या आणि सत्तेत असलेल्यांनी आपल्या कारभाराची जबाबदारी स्वीकारा. आज दिलेली आश्वासने २०२७ पर्यंत पुढे ढकलता येणार नाहीत. युवकांना ‘डिलिव्हरी’ हवी आहे, ‘डायव्हर्जन’ नाही,” असा घणाघात विश्वासराव राणे यांनी केला.

  • Related Posts

    काश्मिरा खोतची स्वतंत्र संगीतविश्वात झेप

    पणशीकर घराण्याचा सांस्कृतिक वारसा नव्या सुरांत गांवकारी, दि. २८ (प्रतिनिधी) मराठी रंगभूमीवरील दिग्गज नटवर्य प्रभाकर पणशीकर यांच्या घराण्याचा समृद्ध सांस्कृतिक वारसा आता नव्या पिढीकडून वेगळ्या सुरांत पुढे जात आहे. प्रभाकर…

    पाळोळे बांधकाम प्रकरणी ३९(ए) अंतर्गत अर्ज

    पश्चिम बंगाल सभापतींच्या गोवा भेटीचे रहस्य उघडगावंकारी, दि. २५ (प्रतिनिधी) पश्चिम बंगाल विधानसभेचे सभापती रथिंद्र बोस यांच्या आर. बोस हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट प्रा. लि. कंपनीतर्फे पाळोळे-काणकोण येथील सर्व्हे क्रमांक १४८/६ मधील…

    You Missed

    01/10/2026 e-paper

    01/10/2026 e-paper

    कंत्राटी शिक्षकांना न्याय द्या

    कंत्राटी शिक्षकांना न्याय द्या

    तुये कन्व्हेन्शन सेंटरला तीव्र विरोध

    तुये कन्व्हेन्शन सेंटरला तीव्र विरोध

    Sachin Pilot to Join Goy Rakhonn Yatra in Sakhlim on Gandhi Jayanti

    Sachin Pilot to Join Goy Rakhonn Yatra in Sakhlim on Gandhi Jayanti

    गोव्याच्या जमिनींच्या मुळावर उठलेल्यांना सत्तेतून हद्दपार करा : काँग्रेस

    गोव्याच्या जमिनींच्या मुळावर उठलेल्यांना सत्तेतून हद्दपार करा : काँग्रेस

    30/09/2026 e-paper

    30/09/2026 e-paper