बनावट “विल”; पोलिसांची भूमिका संशयास्पद?

गुन्हा नोंदवण्याबाबत हलगर्जीपणा भोवणार

गांवकारी, दि. ८ (प्रतिनिधी)

धारगळ-दाडाचीवाडी येथील एका जमिनीवर दावा करण्यासाठी कुटुंबातील सदस्याने बनावट वसीयतपत्र (विल) तयार करून ती जमीन आपल्या नावावर केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणी दोन पोलिस निरीक्षक अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे, कारण त्यांनी गुन्हा नोंदवण्यात अक्षम्य हलगर्जीपणा दाखवला आहे.
विलचा उगम आणि वाळपई उपनिबंधकांची कारवाई
गणपत गोवेकर यांनी वाळपई उपनिबंधक कार्यालयाकडे विलसंबंधी माहिती मागवली. त्यावर वाळपई उपनिबंधकांनी स्पष्ट केले की असे विल त्यांच्या कार्यालयात नोंदच झालेले नाही. गोवेकर यांनी सुभाष कानुळकर यांनी तयार केलेल्या बनावट विलाची प्रत उपनिबंधकांच्या नजरेला आणून दिल्यानंतर वाळपई उपनिबंधक कार्यालयाचे शिक्के आणि अनेक अधिकाऱ्यांची नावे त्यावर वापरल्याचे दिसून आले.
वाळपई उपनिबंधकांनी हा प्रकार राज्य निबंधकांच्या निदर्शनास आणला, आणि राज्य निबंधकांनी वाळपई पोलिस स्थानकात गुन्हा नोंदवण्याची शिफारस केली. त्यानुसार, तत्कालीन वाळपई उपनिबंधक गौरेश बुगडे यांनी ११ नोव्हेंबर २०२२ रोजी तक्रार दाखल केली होती, पण आजतागायत गुन्हा नोंद झाला नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
पेडणे पोलिस निरीक्षकांकडून चालढकल
शांताराम कानुळकर यांच्या मुलींनी वाळपई उपनिबंधक कार्यालयाकडे खातरजमा करून, पेडणे पोलिस स्थानकात सुभाष कानुळकर याच्याविरोधात २७ नोव्हेंबर २०२३ रोजी तक्रार दाखल केली. पण पेडणेचे पोलिस निरीक्षक सचिन लोकरे यांनी गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केली.
अखेर तक्रारदारांनी पेडणे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांकडे याचिका दाखल केली, ज्यामुळे ३१ जुलै २०२४ रोजी गुन्हा नोंद करण्याचा आदेश जारी करण्यात आला. त्यानंतर १२ ऑगस्ट २०२४ रोजी गुन्हा नोंद झाला.
परंतु संशयिताला अटक करण्यासही पोलिसांनी उशीर केला. सुरुवातीला जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी मदत केली गेली, पण तिथे जामीन फेटाळल्यानंतर पोलिसांनी त्याला मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात जाण्यासाठीही संधी दिली.
खंडपीठाने चौकशीला सहकार्य करण्याच्या अटीवर संशयिताला अटकपूर्व जामीन मंजूर केला, पण त्यानंतर पेडणे पोलिसांनी चौकशीसाठी विशेष रस दाखवला नाही.
वाळपई पोलिसांचे दुर्लक्ष
वाळपई उपनिबंधक कार्यालयाने दाखल केलेल्या तक्रारीची दखल वाळपई पोलिसांनी घेतली नाही. पीडित कुटुंबाने नव्याने पोलिस तक्रार दाखल केली आहे.
तत्कालीन वाळपईचे पोलिस निरीक्षक प्रज्योत फडते यांनी हे प्रकरण तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक गड्डी यांच्याकडे पाठवले होते, पण गड्डी यांनी गुन्हा दाखल केला नसल्याचे आता समोर आले आहे.
वाळपईचे विद्यमान पोलिस निरीक्षक विदेश शिरोडकर यांनी नव्याने दाखल झालेल्या तक्रारीवर लवकरच निर्णय घेणार असल्याचे सांगितले आहे.

  • Related Posts

    स्ट्रीट रेसच्या समर्थनार्थ सरपंचांची ढाल

    राजकीय शक्तीचे पाठबळ, स्थानिकांची नाराजी गांवकारी, दि. ५ (प्रतिनिधी) वास्को येथे विरोध झाल्यानंतर फॉर्म्युला-४ स्ट्रीट रेस स्पर्धा आता मोपा विमानतळ परिसरात आयोजित करण्यात येत आहे. या स्पर्धेच्या अनुषंगाने मोपा भूपीडित…

    १९१९ ; भिवपाची गरज ना !

    बेकायदा प्रकल्पांना मुख्यमंत्र्यांचे अभय – स्वप्नेश शेर्लेकर गांवकारी, दि. ४ (प्रतिनिधी) वेर्णा औद्योगिक वसाहतीतील लोटली पंचायत क्षेत्रात उद्योजक कमलाप्रसाद यादव यांनी उभारलेले १९१९ स्पोर्ट्स क्रिकेट स्टेडियम अजून कायदेशीर मान्यता प्राप्त…

    You Missed

    06/02/2026 e-paper

    06/02/2026 e-paper

    विरोधकांच्या अस्तित्वाची कसोटी

    विरोधकांच्या अस्तित्वाची कसोटी

    स्ट्रीट रेसच्या समर्थनार्थ सरपंचांची ढाल

    स्ट्रीट रेसच्या समर्थनार्थ सरपंचांची ढाल

    05/02/2026 e-paper

    05/02/2026 e-paper

    १९१९ ; भिवपाची गरज ना !

    १९१९ ; भिवपाची गरज ना !

    भाजप हो सावधान !

    भाजप हो सावधान !