कंटेनरातील बाटल्या मोजूनच संपेनात

पोलिस आणि अबकारी खात्याच्या कारवाईवर संशय

गांवकारी, दि. १८ (प्रतिनिधी)

धारगळ येथे राष्ट्रीय महामार्गावरील आगीच्या घटनेमुळे सापडलेल्या कंटेनरमधील बेकायदा दारूचा साठा १२ तास उलटूनही मोजून संपलेला नाही. पेडणे पोलिस या घटनेचा पंचनामा करत असून, अजूनही बाटल्या पूर्णतः मोजून झाल्या नसल्याने या साठ्याचा ताबा अबकारी खात्याकडे देण्यात आलेला नाही. बेकायदा मद्यतस्करीचा हा प्रकार असल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाल्यामुळे पोलिस आणि अबकारी खात्याच्या कारवाईवर संशय व्यक्त केला जात आहे.
ही घटना मंगळवारी सकाळी पावणे आठच्या सुमारास घडली. आज दुपारपर्यंत पोलिसांचा पंचनामा संपलेला नव्हता. विशेष म्हणजे इतक्या मोठ्या कंटेनरमध्ये बेकायदा दारूसाठा सापडूनही पोलिसांची टीम पाठविण्याऐवजी तिथे केवळ दोन ते तीन पोलिसच काम करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
हा माल जप्त करून पोलिसांच्या वाहनांतून नेण्यात येत आहे. बेकायदा दारूसाठा सापडूनही अबकारी खाते मात्र कोणतीही हालचाल करत असल्याचे जाणवत नाही. अबकारी खात्याने तत्काळ या प्रकरणाची चौकशी करणे अपेक्षित होते, परंतु इतक्या मोठ्या घटनेबाबत अबकारी खात्याकडून अजूनही अधिकृत माहिती किंवा निवेदन सादर झालेले नाही.
अबकारी खाते बनले भ्रष्टाचाराचे कुरण
अबकारी खाते भ्रष्टाचाराचे कुरण बनले आहे, हा आरोप यापूर्वीच झाला होता. विविध सीमांवर अबकारी चेकनाके हे कलेक्शन सेंटर्स बनले आहेत.
राज्यातून मोठ्या प्रमाणात बेकायदा दारूची तस्करी सुरू आहे आणि हे सगळे राजकीय आशीर्वादातूनच सुरू आहे, असा आरोप आम आदमी पार्टीचे राज्य समन्वयक एड. अमित पालेकर यांनी केला.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनीही हा गंभीर विषय असल्याचे सांगून या प्रकरणाची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे, असे मत व्यक्त केले.

  • Related Posts

    Francis Coelho Quits AAP Goa, Questions Separate Opposition Front Ahead of 2027 Polls

    Senior Aam Aadmi Party leader Francis Coelho has resigned from AAP Goa, citing political disagreement over alliance strategy ahead of the 2027 Goa Assembly elections and questioning the formation of a separate Opposition front.

    न्या. फेर्दिन रिबेलो स्वयंसेवी संस्था आणि तरूणांशी संवाद साधणार

    मडगांवात २२ तर म्हापशात २३ रोजी संवाद गांवकारी,दि.२१ (प्रतिनिधी) गोव्याची जमीन, पर्यावरण, शेती आणि नियोजनाशी संबंधित विविध प्रश्नांवर जनसहभाग अधिक व्यापक करण्याच्या उद्देशाने ‘इनफ इज इनफ’ गोवा चळवळीचे निमंत्रक तथा…

    You Missed

    Francis Coelho Quits AAP Goa, Questions Separate Opposition Front Ahead of 2027 Polls

    Francis Coelho Quits AAP Goa, Questions Separate Opposition Front Ahead of 2027 Polls

    21/09/2026 e-paper

    21/09/2026 e-paper

    उड्डाणपुलाच्या त्रुटींचे उत्तरदायित्व कोण घेणार ?

    उड्डाणपुलाच्या त्रुटींचे उत्तरदायित्व कोण घेणार ?

    न्या. फेर्दिन रिबेलो स्वयंसेवी संस्था आणि तरूणांशी संवाद साधणार

    न्या. फेर्दिन रिबेलो स्वयंसेवी संस्था आणि तरूणांशी संवाद साधणार

    `गोंय राखण यात्रा’ उद्यापासून

    `गोंय राखण यात्रा’ उद्यापासून

    Yash Fadte Goes Down Fighting in PSA Aramis Club Open Quarterfinals

    Yash Fadte Goes Down Fighting in PSA Aramis Club Open Quarterfinals