‘म्हजें घर’ योजनेचा अमित शहांच्या हस्ते शुभारंभ

गांवकारी, दि. ४ (प्रतिनिधी)

सरकारी, कोमुनिदाद तसेच खाजगी जमिनीवरील बेकायदा आणि अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी विविध कायद्यात दुरुस्ती करून तयार करण्यात आलेल्या ‘म्हजें घर’ योजनेचा शुभारंभ आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते होणार आहे.
दोनापावला येथील डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियममध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यभरातून सुमारे २० हजार कार्यकर्त्यांना आणण्याचे लक्ष्य भाजपने ठेवले आहे. या निमित्ताने राज्यातील सुमारे १८ प्रकल्पांची पायाभरणी व उद्घाटन शहा यांच्या हस्ते होणार आहे.
‘म्हजें घर’ ही योजना आगामी २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपसाठी गेमचेंजर ठरणार असल्यामुळे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या महत्त्वाकांक्षी योजनेचा जोरदार पुरस्कार केला आहे. या कायद्यांना न्यायालयात आव्हान दिले जाण्याची शक्यता असली तरी त्याला तोंड देण्यासाठी सरकारने जय्यत तयारी केली आहे.

अरविंद केजरीवाल गोव्यात दाखल
एकीकडे अमित शहा यांचे गोव्यात आगमन होण्यापूर्वीच ‘आप’चे नेते अरविंद केजरीवाल गोव्यात दाखल झाले आहेत. विमानतळावर उतरल्यावर त्यांनी भाजप आणि काँग्रेसवर टीका केली. या दोन्ही पक्षांनी गेल्या १३ वर्षांत गोव्यात एकमेकांना सांभाळून कारभार केला आहे, असा आरोप त्यांनी केला.
आगामी विधानसभा निवडणुकीत ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. काँग्रेस आणि भाजप एकत्रितपणे काम करत आहेत, असा आरोपही त्यांनी केला. आपल्या दोन दिवसांच्या दौऱ्यात ते ठिकठिकाणी ‘आप’ची कार्यालये सुरू करणार असून कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.

  • Related Posts

    पैंगिणकरांच्या संघर्षाचा २ ऑक्टोबर

    २ ऑक्टोबर म्हटले की आपल्याला महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री आठवतात. पण मला या दिवशी आणखी एक नाव आठवते — राजाराम रंगाजी पैंगिणकर. आज त्यांची जयंती नाही किंवा पुण्यतिथीही नाही.…

    काश्मिरा खोतची स्वतंत्र संगीतविश्वात झेप

    पणशीकर घराण्याचा सांस्कृतिक वारसा नव्या सुरांत गांवकारी, दि. २८ (प्रतिनिधी) मराठी रंगभूमीवरील दिग्गज नटवर्य प्रभाकर पणशीकर यांच्या घराण्याचा समृद्ध सांस्कृतिक वारसा आता नव्या पिढीकडून वेगळ्या सुरांत पुढे जात आहे. प्रभाकर…

    You Missed

    From Mining Scar to Forest — Surla Fears 4,000-Crore Dump Rush Could Reopen Old Wounds

    From Mining Scar to Forest — Surla Fears 4,000-Crore Dump Rush Could Reopen Old Wounds

    Mangrove Trees Allegedly Felled at Undir-Bandora; Environment Forum Seeks FIR, Restoration

    Mangrove Trees Allegedly Felled at Undir-Bandora; Environment Forum Seeks FIR, Restoration

    गोव्यात सत्ता परिवर्तनासाठी काँग्रेस हाच पर्याय : सचिन पायलट

    गोव्यात सत्ता परिवर्तनासाठी काँग्रेस हाच पर्याय : सचिन पायलट

    Husband seeks abetment probe in wife’s death; police yet to register FIR

    Husband seeks abetment probe in wife’s death; police yet to register FIR

    02/10/2026 e-paper

    02/10/2026 e-paper

    Suspected Unlicensed Casting Yard in Residential Kadamba Sparks Outcry

    Suspected Unlicensed Casting Yard in Residential Kadamba Sparks Outcry