फकिरपाटो रहिवाशांकडे सरकारने लक्ष द्यावे

मिशन फॉर लोकल, पेडणेचे राजन कोरगांवकर यांची मागणी

गांवकारी, दि. ८ (प्रतिनिधी)

पेडणे तालुक्यातील तोर्से पंचायत क्षेत्रातील फकिरपाटो वाड्यावरील रहिवाशांबाबत सरकारकडून अन्याय सुरू आहे. गोवा-महाराष्ट्र सीमेलगतच्या या गावातील नागरिक अजूनही अनेक मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. त्यांचा आवाज सरकार दरबारी पोहोचत नसल्याची खंत राजन कोरगांवकर यांनी व्यक्त केली.
मिशन फॉर लोकल, पेडणे या संस्थेच्या वतीने राजन कोरगांवकर यांनी फकिरपाटो गावाला भेट दिली. तोर्से पंचायत क्षेत्रातील हा प्रभाग असून येथे बहुसंख्य शेतकरी वास्तव्यास आहेत. या वाड्यावरील सरकारी शाळेची अवस्था अत्यंत दयनीय आहे. त्यामुळे येथील मुलांना तोर्से सरकारी शाळा किंवा पेडणे येथे शिक्षणासाठी जावे लागते. प्रवासी वाहनांची सोय नसल्यामुळे नागरिकांना दररोज कितीतरी अंतर पायी चालावे लागते.
या वाड्यातील अनेक सुशिक्षित युवक रोजगाराच्या प्रतिक्षेत आहेत. सार्वजनिक वाहतुकीअभावी त्यांना नोकरीच्या संधी मिळत नाहीत. महिलांचे प्रश्न अधिक गंभीर आहेत. पायवाटा नसल्यामुळे त्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो. सरकारी योजनांचा लाभ महिलांना मिळाला असला तरी गेल्या सहा ते सात महिन्यांपासून गृहआधार योजनेचे पैसे मिळाले नसल्याची तक्रार त्यांनी केली. पेडणेतील गोवा राज्य सहकारी बँकेकडून सहकार्य मिळत नसल्याचीही तक्रार त्यांनी केली. पणजीपर्यंत जाऊन चौकशी केली तरी काहीच निष्पन्न झाले नाही, असे त्यांनी सांगितले.
येथील शेतीसाठी वापरण्यात येणारा पंप बिघडलेला असून त्याला कित्येक महिने झाले आहेत. जलस्त्रोत खात्याकडून अद्याप पंप बदलण्यात आलेला नाही. पाण्याअभावी शेतीचे मोठे नुकसान होत आहे. या सर्व समस्यांबाबत सरकार दरबारी पाठपुरावा करून त्या सोडविण्याचा प्रयत्न करू, असे राजन कोरगांवकर यांनी सांगितले.
यावेळी रश्मी कोरगांवकर, मोपाचे माजी सरपंच रूपेश परब, तुळशीदास कवठणकर आदी उपस्थित होते.

  • Related Posts

    पैंगिणकरांच्या संघर्षाचा २ ऑक्टोबर

    २ ऑक्टोबर म्हटले की आपल्याला महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री आठवतात. पण मला या दिवशी आणखी एक नाव आठवते — राजाराम रंगाजी पैंगिणकर. आज त्यांची जयंती नाही किंवा पुण्यतिथीही नाही.…

    काश्मिरा खोतची स्वतंत्र संगीतविश्वात झेप

    पणशीकर घराण्याचा सांस्कृतिक वारसा नव्या सुरांत गांवकारी, दि. २८ (प्रतिनिधी) मराठी रंगभूमीवरील दिग्गज नटवर्य प्रभाकर पणशीकर यांच्या घराण्याचा समृद्ध सांस्कृतिक वारसा आता नव्या पिढीकडून वेगळ्या सुरांत पुढे जात आहे. प्रभाकर…

    You Missed

    03/10/2026 e-paper

    03/10/2026 e-paper

    दारी कशाला, कार्यालयातच सेवा द्या !

    दारी कशाला, कार्यालयातच सेवा द्या !

    सुर्लाची जखम पुन्हा भळभळणार…

    सुर्लाची जखम पुन्हा भळभळणार…

    From Mining Scar to Forest — Surla Fears 4,000-Crore Dump Rush Could Reopen Old Wounds

    From Mining Scar to Forest — Surla Fears 4,000-Crore Dump Rush Could Reopen Old Wounds

    Mangrove Trees Allegedly Felled at Undir-Bandora; Environment Forum Seeks FIR, Restoration

    Mangrove Trees Allegedly Felled at Undir-Bandora; Environment Forum Seeks FIR, Restoration

    गोव्यात सत्ता परिवर्तनासाठी काँग्रेस हाच पर्याय : सचिन पायलट

    गोव्यात सत्ता परिवर्तनासाठी काँग्रेस हाच पर्याय : सचिन पायलट