पाटो टीसीपीसमोर जनसागर लोटणार

‘इनफ इज इनफ’ च्या हाकेला राज्यभरातून प्रतिसाद

गांवकारी, दि.१६ (प्रतिनिधी)

नगर नियोजन खात्याने वादग्रस्त कलम ३९(ए) अंतर्गत सरसकट जमिनींचा झोन बदल करून त्या रूपांतरासाठी खुल्या केल्याने राज्यभरात तीव्र संताप उसळला आहे. या संतापाला शुक्रवार, १७ रोजी नगर नियोजन खात्यासमोरील ‘इनफ इज इनफ, गोवा’ने आयोजित केलेल्या आंदोलनातून वाट मोकळी होणार आहे.
‘इनफ इज इनफ, गोवा’ चळवळीचे निमंत्रक निवृत्त न्यायमूर्ती फेर्दिन रिबेलो यांनी राज्यभरातील गोंयकारांना शुक्रवार, १७ रोजी सकाळी नगर नियोजन खात्याच्या पाटो-पणजी येथील कार्यालयाबाहेर एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. चळवळीतर्फे मुख्य नगर नियोजकांना निवेदन सादर केले जाणार आहे. आज आयोजित पत्रकार परिषदेत संघटनेचे नेते देविदास आमोणकर आणि गोविंद शिरोडकर यांनी ही माहिती दिली.
सरकारने दुरुस्त केलेले हे कलम महाघातक असून त्याचा सर्रास गैरवापर सुरू आहे. सर्व जमिनी रूपांतरासाठी खुल्या करण्यात येत आहेत. या रूपांतराचा गोव्याच्या पर्यावरण, समाज आणि आर्थिक भवितव्यावर गंभीर परिणाम होणार आहे. हे कलम रद्द व्हावे, अशी राज्यभरातून मागणी होत असताना सरकार दर आठवड्याला अधिसूचना जारी करून लोकांच्या जखमांवर मीठ चोळत आहे, अशी नाराजी न्यायमूर्ती रिबेलो यांनी व्यक्त केली.
जनशक्तीचे दर्शन घडविण्याची वेळ
सरकारला जनशक्तीचे दर्शन घडविण्याची वेळ आली आहे. सकाळी १० वाजता जमल्यानंतर सह्यांची मोहीम राबवली जाईल. या सह्यांचे निवेदन मुख्य नगर नियोजकांना सादर केले जाईल. राज्यातील सर्व तालुक्यांतील लोकांनी येथे एकत्र येऊन आपला पाठिंबा द्यावा, जेणेकरून सरकारला जनशक्तीची जाणीव होईल आणि हे कलम मागे घेण्याची बुद्धी येईल, असेही यावेळी सांगण्यात आले.

  • Related Posts

    गोमंतकीय अस्तित्वासाठी कुंकळळीच्या महानायकांचे बलिदान अतुलनीय; धर्मरक्षण आणि स्वराज्यासाठी दिलेल्या लढ्याला इतिहासात तोड नाही – सुभाष फळ देसाई

    कुंकळळी, दि. १६ : गोमंतकाच्या अस्तित्वासाठी, धर्मरक्षणासाठी आणि स्वराज्याच्या संकल्पनेसाठी १५८३ मध्ये कुंकळळीच्या महानायकांनी दिलेल्या बलिदानाला इतिहासात तोड नाही. त्यांच्या त्यागामुळेच गोमंतकीय समाज आपली संस्कृती, धर्म आणि अस्मिता जपू शकला,…

    ई-२० इंधनाची अंमलबजावणी स्थगित करा; स्वतंत्र चौकशीची काँग्रेसची मागणी

    पणजी, दि. १६: गोव्यात ई-२० (२० टक्के इथेनॉल मिश्रित पेट्रोल) इंधनाची सर्वसाधारण अंमलबजावणी तात्काळ स्थगित करून त्याबाबत स्वतंत्र वैज्ञानिक, आर्थिक आणि पर्यावरणीय अभ्यास करण्यात यावा, अशी मागणी गोवा प्रदेश काँग्रेस…

    You Missed

    गोमंतकीय अस्तित्वासाठी कुंकळळीच्या महानायकांचे बलिदान अतुलनीय; धर्मरक्षण आणि स्वराज्यासाठी दिलेल्या लढ्याला इतिहासात तोड नाही – सुभाष फळ देसाई

    गोमंतकीय अस्तित्वासाठी कुंकळळीच्या महानायकांचे बलिदान अतुलनीय; धर्मरक्षण आणि स्वराज्यासाठी दिलेल्या लढ्याला इतिहासात तोड नाही – सुभाष फळ देसाई

    ई-२० इंधनाची अंमलबजावणी स्थगित करा; स्वतंत्र चौकशीची काँग्रेसची मागणी

    ई-२० इंधनाची अंमलबजावणी स्थगित करा; स्वतंत्र चौकशीची काँग्रेसची मागणी

    SIO Condemns Goa Education Directorate Circular, Threatens Legal Action

    SIO Condemns Goa Education Directorate Circular, Threatens Legal Action

    16/07/2026 e-paper

    16/07/2026 e-paper

    गोव्याच्या भविष्याचा निर्णायक लढा

    गोव्याच्या भविष्याचा निर्णायक लढा

    पाटो टीसीपीसमोर जनसागर लोटणार

    पाटो टीसीपीसमोर जनसागर लोटणार