‘वाळवी’ वक्तव्यावरून सावईकर तोंडघशी

२४ तासांत माफी मागा, अन्यथा आंदोलनाचा इशारा

गांवकारी,दि. २१ (प्रतिनिधी)

दिल्लीतील जंतरमंतरवरील युवक आंदोलन आणि पणजी आझाद मैदानावरील जनसागराच्या पार्श्वभूमीवर भाजपचे माजी खासदार व उपाध्यक्ष अॅड. नरेंद्र सावईकर यांनी फेसबुकवर आंदोलनकर्त्यांना “झुरळे नाहीत, वाळवी आहेत” असे संबोधल्याने तीव्र वादळ उठले आहे.
या वक्तव्याचा काँग्रेससह विविध विरोधी पक्ष व सामाजिक संघटनांनी निषेध केला असून, २४ तासांत माफी मागितली नाही तर राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
सावईकर यांनी पोस्ट हटवली असली तरी नंतर त्यांनी आपल्या कृतीचे समर्थन केले. भाजप युवा मोर्चा व माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्ळेकर यांनी त्यांना पाठिंबा दिला, मात्र विरोधाची लाट इतकी प्रबळ झाली की भाजपवर चौफेर टीका झाली.
विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी युवाशक्तीचा अपमान निंदनीय ठरवला. युवा काँग्रेस अध्यक्ष अर्चित नाईक यांनी आंदोलनकर्त्यांना अपमानास्पद शब्दांत हिणवणे हे लोकशाही मूल्यांना धरून नसल्याचे म्हटले. कार्यकारी अध्यक्ष सुनील कवठणकर यांनी २४ तासांत माफी मागितली नाही तर राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा दिला.
गोवा फॉरवर्डचे विजय सरदेसाई, विद्यार्थी संघटना, आम आदमी पार्टीचे नेते यांसह अनेकांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत भाजपची आंदोलनांविषयीची मानसिकता या वक्तव्यातून स्पष्ट होत असल्याचा आरोप केला.

  • Related Posts

    काँग्रेस – भाजप आमनेसामने

    दिल्लीतील आंदोलनाचे गोव्यातही पडसाद पणजी, दि. २२ (प्रतिनिधी) दिल्लीतील जंतरमंतरवर सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचे पडसाद आता देशभर उमटू लागले आहेत. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानावर मोर्चा नेल्याने…

    Congress Delegation Meets Goa Governor, Condemns Rahul Gandhi’s Detention; Seeks Justice for Students

    A delegation of the Goa Pradesh Congress Committee (GPCC) met Goa Governor P.S. Sreedharan Pillai, submitting a memorandum condemning the detention of Rahul Gandhi and seeking immediate action on student-related issues and the country’s education system.

    You Missed

    22/07/2026 e-paper

    22/07/2026 e-paper

    काँग्रेस – भाजप आमनेसामने

    काँग्रेस – भाजप आमनेसामने

    अधिवेशनात राजकीय कसोटी

    अधिवेशनात राजकीय कसोटी

    Congress Delegation Meets Goa Governor, Condemns Rahul Gandhi’s Detention; Seeks Justice for Students

    Congress Delegation Meets Goa Governor, Condemns Rahul Gandhi’s Detention; Seeks Justice for Students

    मुख्याधिकाऱ्यांविरोधात एफआयआरची मागणी; मडगाव नगरपालिकेतील २६ सुरक्षा रक्षकांच्या नियुक्तीवर प्रभव नायक यांचे प्रश्नचिन्ह

    मुख्याधिकाऱ्यांविरोधात एफआयआरची मागणी; मडगाव नगरपालिकेतील २६ सुरक्षा रक्षकांच्या नियुक्तीवर प्रभव नायक यांचे प्रश्नचिन्ह

    Goa Seva Dal Chief Rajan Ghate Detained During Delhi Protest

    Goa Seva Dal Chief Rajan Ghate Detained During Delhi Protest