किमान १५ दिवसांचे पावसाळी अधिवेशन हवे

विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांचे राज्यपालांना पत्र

गांवकारी,दि.२१ (प्रतिनिधी)

गोवा विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन अर्ध्यावरच स्थगित झाल्यानंतर विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी राज्यपालांना पत्र लिहून किमान १५ दिवसांचे पावसाळी अधिवेशन घेण्याची मागणी केली आहे. राज्यातील गंभीर व जनहिताच्या प्रश्नांवर सखोल चर्चा होण्यासाठी पुरेसा कालावधी आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
आलेमाव यांनी पत्रात सर्वण-कारापूर आंदोलन, गोवा नगर व नियोजन कायद्यातील कलम ३९-अ, वाढती बेरोजगारी, बिघडलेली कायदा-सुव्यवस्था, महागाई तसेच विद्यार्थ्यांच्या समस्या यांसारख्या विषयांवर ठोस निर्णय घेणे आवश्यक असल्याचे अधोरेखित केले आहे.
६ मार्च ते २७ मार्च २०२६ या कालावधीत नियोजित अधिवेशन फोंडा पोटनिवडणूक व आचारसंहितेचे कारण देत केवळ सात बैठकीनंतर स्थगित करण्यात आले. हे कारण योग्य नसल्याचा दावा करत आलेमाव यांनी नमूद केले की, अशा परिस्थितीत इतर राज्यांतील अधिवेशने सुरळीत पार पडली होती.
राज्यपालांनी या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन आगामी पावसाळी अधिवेशनात किमान १५ दिवसांच्या बैठका आयोजित कराव्यात, अशी विनंती त्यांनी केली आहे.

  • Related Posts

    आपचे माजी राज्य संयोजक राहुल म्हांबरे काँग्रेसमध्ये; ‘गोव्यासाठी काँग्रेसच सक्षम आणि विश्वासार्ह पर्याय’

    गोव्याच्या राजकारणात महत्त्वाची घडामोड घडत आम आदमी पार्टी (आप)चे माजी गोवा राज्य संयोजक राहुल म्हांबरे यांनी मंगळवारी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये अधिकृत प्रवेश केला. पणजी येथील काँग्रेस भवनात आयोजित कार्यक्रमात गोवा प्रदेश काँग्रेस समितीच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.

    ‘वाळवी’ वक्तव्यावरून सावईकर तोंडघशी

    २४ तासांत माफी मागा, अन्यथा आंदोलनाचा इशारा गांवकारी,दि. २१ (प्रतिनिधी) दिल्लीतील जंतरमंतरवरील युवक आंदोलन आणि पणजी आझाद मैदानावरील जनसागराच्या पार्श्वभूमीवर भाजपचे माजी खासदार व उपाध्यक्ष अॅड. नरेंद्र सावईकर यांनी फेसबुकवर…

    You Missed

    आपचे माजी राज्य संयोजक राहुल म्हांबरे काँग्रेसमध्ये; ‘गोव्यासाठी काँग्रेसच सक्षम आणि विश्वासार्ह पर्याय’

    आपचे माजी राज्य संयोजक राहुल म्हांबरे काँग्रेसमध्ये; ‘गोव्यासाठी काँग्रेसच सक्षम आणि विश्वासार्ह पर्याय’

    21/07/2026 e-paper

    21/07/2026 e-paper

    किमान १५ दिवसांचे पावसाळी अधिवेशन हवे

    किमान १५ दिवसांचे पावसाळी अधिवेशन हवे

    ‘वाळवी’ वक्तव्यावरून सावईकर तोंडघशी

    ‘वाळवी’ वक्तव्यावरून सावईकर तोंडघशी

    वाळवी कोण? तरुणाई की व्यवस्था?

    वाळवी कोण? तरुणाई की व्यवस्था?

    राज्यपालांकडे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांची मागणी; पावसाळी अधिवेशन किमान १५ दिवसांचे घ्यावे

    राज्यपालांकडे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांची मागणी; पावसाळी अधिवेशन किमान १५ दिवसांचे घ्यावे