गोंयकारांना केजरीवालांच्या सहा गॅरंटी!

गांवकारी, दि. ९ (प्रतिनिधी)
गोव्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक तथा दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गोमंतकीय जनतेसाठी सहा महत्त्वाच्या गॅरंटी जाहीर केल्या आहेत.
पणजी येथे आयोजित ‘आप’च्या गॅरंटी कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी वीज, महिला सक्षमीकरण, आरोग्य, जमीन संरक्षण आणि क्रीडा सुविधांबाबत महत्त्वपूर्ण आश्वासने दिली. गोव्यात आम आदमी पक्षाचे सरकार सत्तेवर आल्यास प्रत्येक कुटुंबाला चोवीस तास अखंडित वीजपुरवठा आणि दरमहा ३०० युनिट मोफत वीज देण्यात येईल. प्रत्येक महिलेला दरमहा ३ हजार रुपयांची आर्थिक मदत, प्रत्येक कुटुंबाला १० लाख रुपयांचे आरोग्य विमा संरक्षण आणि सर्व महिलांना बसमधून मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल, अशी घोषणा केजरीवाल यांनी केली.

गोव्यात जमीन रूपांतरणाच्या मुद्द्यावरून वादग्रस्त ठरलेले नगरनियोजन कायद्यातील कलम ३९ अ सत्तेवर आल्यानंतर अवघ्या एका महिन्यात रद्द करण्याची महत्त्वपूर्ण गॅरंटीही त्यांनी दिली. त्याचबरोबर राज्यातील प्रत्येक गावात क्रीडांगण उभारण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

  • Related Posts

    नटसम्राट नाना पाटेकर काळाच्या पडद्याआड!

    गांवकारी, दि. ८ (प्रतिनिधी) आपल्या भारदस्त आवाजाने, बेधडक व्यक्तिमत्त्वाने आणि कसदार अभिनयाने मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीवर अमीट ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर (७५) यांचे गुरुवारी पहाटे गोव्यात निधन झाले.…

    डंपला हात लावाल तर पस्तावाल

    सुर्लाकरांचा मुख्यमंत्र्यांना इशारा गांवकारी, दि. ७ (प्रतिनिधी) साखळी मतदारसंघातील सुर्ला गावाच्या माथ्यावरील सुमारे ३५ वर्षे जुन्या खनिज डंपच्या हाताळणीस मेसर्स व्ही. एम. साळगांवकर कंपनीला गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने मान्यता…

    You Missed

    09/10/2026 e-paper

    09/10/2026 e-paper

    गोंयकारांना केजरीवालांच्या सहा गॅरंटी!

    गोंयकारांना केजरीवालांच्या सहा गॅरंटी!

    २७ लाख छे… हा तर कोटींचा मामला !

    २७ लाख छे… हा तर कोटींचा मामला !

    या भामट्यांना कोण आवरणार ?

    या भामट्यांना कोण आवरणार ?

    Rahul Gandhi’s October 12 Goa Visit Postponed Amid INDIA Bloc Protests

    Rahul Gandhi’s October 12 Goa Visit Postponed Amid INDIA Bloc Protests

    गोव्याचे भवितव्य सुरक्षित ठेवण्यासाठी काँग्रेसला साथ द्या : डी. के. शिवकुमार

    गोव्याचे भवितव्य सुरक्षित ठेवण्यासाठी काँग्रेसला साथ द्या : डी. के. शिवकुमार