नटसम्राट नाना पाटेकर काळाच्या पडद्याआड!

गांवकारी, दि. ८ (प्रतिनिधी)

आपल्या भारदस्त आवाजाने, बेधडक व्यक्तिमत्त्वाने आणि कसदार अभिनयाने मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीवर अमीट ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर (७५) यांचे गुरुवारी पहाटे गोव्यात निधन झाले. दोनापावला येथील निवासस्थानी त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांना तातडीने मणिपाल रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी सुमारे ४५ मिनिटे शर्थीचे प्रयत्न करूनही त्यांचे प्राण वाचवता आले नाहीत. त्यांच्या आकस्मिक निधनाने चित्रपटसृष्टीसह संपूर्ण गोव्यात शोककळा पसरली आहे.

‘परिंदा’, ‘प्रहार’, ‘क्रांतिवीर’, ‘अब तक छप्पन’, ‘वेलकम’ आणि ‘नटसम्राट’ यांसारख्या चित्रपटांतून नानांनी आपल्या बहुआयामी अभिनयाची छाप उमटवली. तीन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि पद्मश्री सन्मानाने गौरवलेल्या नानांनी अभिनयाबरोबरच सामाजिक कार्यातही मोलाचे योगदान दिले. नाम फाउंडेशनच्या माध्यमातून दुष्काळग्रस्त शेतकरी, जलसंवर्धन आणि ग्रामीण भागातील गरजूंसाठी त्यांनी उल्लेखनीय कार्य केले.

गोव्याशी नानांचे विशेष जिव्हाळ्याचे नाते होते. दोनापावला येथे त्यांचे निवासस्थान होते. अवघ्या चार दिवसांपूर्वी एका समारंभात त्यांनी आपल्या खास शैलीत उपस्थितांशी मनमोकळा संवाद साधला होता. त्यामुळे त्यांच्या अचानक जाण्याच्या वृत्ताने गोमंतकीयांना मोठा धक्का बसला आहे.

नानांचे पार्थिव शवचिकित्सेसाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालयात (गोमेकॉ) पाठविण्यात आले असून, त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच कुटुंबीय, नातेवाईक, हितचिंतक आणि सहकारी कलाकार गोमेकॉमध्ये दाखल झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह कला, राजकारण, समाजकारण आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी त्यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त करून श्रद्धांजली वाहिली.

  • Related Posts

    प्रकाशपर्वातून नव्या गोव्याचा संकल्प !

    या दिवाळीत केवळ घरे उजळवू नका, मनेही उजळवा. निसर्गाला जपा, माणुसकीला कवटाळा आणि संविधानाच्या मूल्यांना बळ द्या. कारण गोव्याचे खरे वैभव त्याच्या इमारतींत किंवा संपत्तीत नाही, तर इथल्या निसर्गात, संस्कृतीत…

    सचिवांकडून सरपंचानाच कारणे दाखवा !

    चिखलीच रंगले राजकीय नाट्य —————————————————————————— गांवकारी,दि. ५ (प्रतिनिधी) चिखली पंचायतीचे सरपंच कमलप्रसाद यादव यांना त्यांच्याच पंचायत सचिवांकडून कारणे दाखवा नोटीस बजावल्याने खळबळ उडाली आहे. दाबोळी येथील सर्व्हे क्रमांक ३/१, ५/१…

    You Missed

    Smart Meter Naka Demands Scrapping of Goa’s Smart Meter Project, Seeks Meeting with CM

    Smart Meter Naka Demands Scrapping of Goa’s Smart Meter Project, Seeks Meeting with CM

    Prabhav Naik Exposes Sewage Menace in Margao Again; Questions Government’s Neglect of Public Health

    Prabhav Naik Exposes Sewage Menace in Margao Again; Questions Government’s Neglect of Public Health

    गोव्यातील उद्योगांनी स्थानिक वाहतूकदारांनाच प्राधान्य द्यावे; सुदीप ताम्हणकरांची जीआयडीसीकडे मागणी

    गोव्यातील उद्योगांनी स्थानिक वाहतूकदारांनाच प्राधान्य द्यावे; सुदीप ताम्हणकरांची जीआयडीसीकडे मागणी

    जे का रंजले गांजले…!

    जे का रंजले गांजले…!

    तेरेखोल नदीतील बेकायदा रेती उपशावर कठोर कारवाई करा!

    तेरेखोल नदीतील बेकायदा रेती उपशावर कठोर कारवाई करा!

    Together For Mapusa Demands AI CCTV Surveillance, City-Wide Safety Audit

    Together For Mapusa Demands AI CCTV Surveillance, City-Wide Safety Audit