गोवा डेअरी कर्मचारी आंदोलनाला अमित पाटकर यांचा पाठींबा

गांवकारी,दि. ३ (प्रतिनिधी)
गोवा डेअरीच्या १८८ कर्मचाऱ्यांचा जुलै २०२३ पासूनचा महागाई भत्ता (डीए) आणि थकबाकी अद्याप मिळालेली नसल्याने कर्मचाऱ्यांनी बुधवार, ४ नोव्हेंबरपासून आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. या आंदोलनाला काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी पाठिंबा जाहीर केला आहे.

गोवा डेअरीच्या कर्मचाऱ्यांनी पाटकर यांची भेट घेऊन आपल्या व्यथा मांडल्या. वारंवार निवेदने देऊन आणि आश्वासने मिळूनही थकीत रक्कम अदा करण्यात आलेली नाही. महागाई भत्ता हा कर्मचाऱ्यांचा हक्क असून तो देण्यात होणारी दिरंगाई अन्यायकारक असल्याचे पाटकर यांनी सांगितले.

कर्मचारी दररोज सकाळी ९.३० आणि सायंकाळी ५.३० वाजता निदर्शने करणार आहेत. व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांचा संयम न पाहता जुलै २०२३ पासूनचा संपूर्ण महागाई भत्ता आणि थकबाकी तातडीने अदा करावी, अशी मागणी पाटकर यांनी केली. कर्मचाऱ्यांना न्याय मिळेपर्यंत त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

  • Related Posts

    आरोग्यापेक्षा राजकीय असुरक्षितता महत्वाची?

    प्रभव नायक यांचा सरकारला सवाल …………………………………………………………………………………………….. गांवकारी,दि.३ (प्रतिनिधी) : कोंबा येथील दीर्घकाळ प्रलंबित सांडपाण्याच्या समस्येची पाहणी करण्यासाठी नियोजित केलेली संयुक्त स्थळ पाहणी अचानक रद्द करण्यात आल्याबद्दल युवा नेते प्रभव नायक…

    तुये ग्रामसभेचा ३९ स्विमिंग पूलयुक्त व्हिलांना विरोध

    आयटी कन्व्हेन्शन सेंटर, बांधकाम कचरा प्रकल्पालाही हरकत; परवानग्या रद्द करण्याची मागणी ……………………………………………………….. गांवकारी, दि. २ (प्रतिनिधी) तुये पंचायत क्षेत्रात प्रस्तावित ३९ व्हिला आणि प्रत्येकी एक स्विमिंग पूल उभारण्यासाठी दिलेली परवानगी…

    You Missed

    आरोग्यापेक्षा राजकीय असुरक्षितता महत्वाची?

    आरोग्यापेक्षा राजकीय असुरक्षितता महत्वाची?

    आम आदमी वापरणार `महागाई कार्ड`!

    आम आदमी वापरणार `महागाई कार्ड`!

    वास्को अग्नि पीडित व्यापाऱ्यांना आर्थिक मदतीचा पहिला हप्ता वितरित

    वास्को अग्नि पीडित व्यापाऱ्यांना आर्थिक मदतीचा पहिला हप्ता वितरित

    गोवा डेअरी कर्मचारी आंदोलनाला अमित पाटकर यांचा पाठींबा

    गोवा डेअरी कर्मचारी आंदोलनाला अमित पाटकर यांचा पाठींबा

    AAP Announces Statewide ‘Mhargai Mukti Yatra’ from November 26 to December 19

    AAP Announces Statewide ‘Mhargai Mukti Yatra’ from November 26 to December 19

    आग लागो त्या आगीला!

    आग लागो त्या आगीला!