तेरेखोल नदीतील बेकायदा रेती उपशावर कठोर कारवाई करा!

गांवकारी, पेडणे, दि. ११ (प्रतिनिधी) : उगवे गावातील तेरेखोल नदीपात्रात सुरू असलेल्या कथित बेकायदा रेती उपशाविरोधात तांबोसे-मोपा-उगवे ग्रामपंचायतीने आक्रमक भूमिका घेतली आहे. हा बेकायदा रेती उपसा तातडीने बंद करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सरपंच सुबोध महाले यांनी पेडणे पोलिस निरीक्षकांकडे केली आहे.

सरपंच महाले यांनी ९ नोव्हेंबर रोजी पोलिसांना दिलेल्या लेखी निवेदनात उगवे परिसरातील तेरेखोल नदीत बेकायदा रेती उपसा सुरू असल्याचा आरोप केला आहे. या प्रकाराला ग्रामपंचायतीचा तीव्र विरोध असून यापूर्वीही संबंधित अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी आणि निवेदने सादर करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

उगवे गावालगतच्या तेरेखोल नदीपात्राची तातडीने प्रत्यक्ष पाहणी आणि सर्वेक्षण करण्यात यावे. बेकायदा रेती उपशावर नियंत्रण ठेवण्यासाठी नदी परिसरात दिवसरात्र नियमित पोलिस गस्त सुरू करावी. विशेषतः रात्रीच्या वेळी किनारी पोलिस किंवा सुरक्षा रक्षक तैनात करून रेती उपशाच्या हालचालींवर कडक नजर ठेवावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

बेकायदा रेती उपसा रोखण्यासाठी संबंधित यंत्रणांनी तातडीने ठोस पावले उचलावीत, अशी अपेक्षा सरपंच महाले यांनी व्यक्त केली आहे. ग्रामपंचायतीनेच थेट पोलिसांकडे कारवाईची मागणी केल्यामुळे आता पेडणे पोलिस या प्रकरणात कोणती पावले उचलतात, याकडे लक्ष लागले आहे.

  • Related Posts

    जे का रंजले गांजले…!

    संत तुकाराम महाराजांच्या ‘जे का रंजले गांजले’ या अभंगाचे आजच्या काळातील महत्त्व विशद करणारा लेख, भौतिक समृद्धीच्या जोडीला करुणा आणि संवेदनशीलता वाढवून रंजल्या-गांजल्यांची निःस्वार्थ सेवा करण्याचे आवाहन करतो.

    Together For Mapusa Demands AI CCTV Surveillance, City-Wide Safety Audit

    In the wake of the alleged sexual assault of a four-year-old girl in Mapusa, civic organisation Together For Mapusa has demanded urgent public safety measures, including installation of AI-enabled CCTV cameras, securing abandoned buildings and stricter monitoring of vulnerable public spaces.

    You Missed

    जे का रंजले गांजले…!

    जे का रंजले गांजले…!

    तेरेखोल नदीतील बेकायदा रेती उपशावर कठोर कारवाई करा!

    तेरेखोल नदीतील बेकायदा रेती उपशावर कठोर कारवाई करा!

    Together For Mapusa Demands AI CCTV Surveillance, City-Wide Safety Audit

    Together For Mapusa Demands AI CCTV Surveillance, City-Wide Safety Audit

    Goa State Co-operative Bank Introduces Mobile Banking App with NEFT, RTGS Facilities

    Goa State Co-operative Bank Introduces Mobile Banking App with NEFT, RTGS Facilities

    10/11/2026 e-paper

    10/11/2026 e-paper

    मशाल पेटवणार कोण?

    मशाल पेटवणार कोण?