आगरवाडा – चोपडे पठारावर हरित महाप्रकल्प

जैवविविधता, वनस्पती उद्यानांसह व्यावसायिक लागवडीचाही समावेश
————————————————
गांवकारी,दि. २७ (प्रतिनिधी)
उत्तर गोव्यातील पर्यावरणीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण आगरवाडा–चोपडे टेकडी आणि पठारावर किमान २५ लाख चौरस फूट क्षेत्रात जैवविविधता उद्यान, वनस्पती उद्यान, नैसर्गिक इतिहास संग्रहालय आणि शाश्वत व्यावसायिक कृषी-बागायती लागवडींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारण्याची तयारी राज्य सरकारने सुरू केली आहे. गोवा राज्य जैवविविधता मंडळाने या बहुदशकीय प्रकल्पासाठी पात्र संस्था, कॉर्पोरेट फाउंडेशन आणि धर्मादाय ट्रस्टकडून स्वारस्य प्रस्ताव मागविले आहेत.

हवामान बदल कक्षाच्या ‘ब्लेंडेड फायनान्स’ सुविधेअंतर्गत हा प्रकल्प राबविला जाणार आहे. त्यासाठी सार्वजनिक–खासगी–समुदाय भागीदारीचे प्रारूप निश्चित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, या भागीदारीचा कालावधी अनेक दशकांचा असेल, असे मंडळाच्या जाहिरातीत स्पष्ट करण्यात आले आहे. सरकारच्या या निर्णयाचे आगरवाडा- चोपडे ग्रामस्थांनी जोरदार स्वागत केले असून जैवविविधता मंडळाकडे केलेल्या विनंतीला त्यांनी मान दिल्याबद्दल राज्य सरकारने आभार व्यक्त केले आहेत.

नेमके काय उभारणार?

प्रस्तावित प्रकल्पात आगरवाडा–चोपडे टेकडी आणि पठाराचे सर्वंकष पर्यावरणीय पुनरुज्जीवन करण्याबरोबरच जैवविविधता उद्यान आणि वनस्पती उद्यान उभारण्याचे नियोजन आहे. त्याशिवाय कृषी उत्पादनांसाठी मूल्यवर्धन केंद्र, शाश्वत व्यावसायिक कृषी-बागायती लागवड, उत्कृष्टता केंद्र आणि नैसर्गिक इतिहास संग्रहालयाचाही प्रस्तावात समावेश आहे.

गोव्यात अस्तित्व असलेल्या कायदेशीररीत्या नोंदणीकृत संस्था, पर्यावरणीय व सामाजिक जबाबदारीअंतर्गत काम करणारी कॉर्पोरेट फाउंडेशन, सेवाभावी संस्था आणि धर्मादाय ट्रस्ट या प्रकल्पासाठी प्रस्ताव सादर करू शकतात.

पर्यावरण संरक्षण की व्यावसायिक प्रयोग?

पर्यावरणीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण पठारावर जैवविविधता संवर्धन आणि पर्यावरणीय पुनरुज्जीवनाचा प्रकल्प उभारण्याची संकल्पना महत्त्वाची मानली जात आहे. मात्र त्यात ‘शाश्वत व्यावसायिक कृषी-बागायती लागवडीं’चाही समावेश असल्याने या व्यावसायिक उपक्रमाचे स्वरूप नेमके काय असेल, याकडे पर्यावरणप्रेमी आणि स्थानिकांचे लक्ष लागून राहणार आहे.

प्रकल्पासाठी वापरली जाणारी जमीन ही सरकारी असून त्यात एका व्यक्तीचे नाव कुळ म्हणून नोंद आहे. या जमीनीवर अनेकांची नजर होती. ही जमीन बांधकाम प्रकल्पांसाठी वापरली गेल्यास संपूर्ण आगरवाडा- चोपडे गांव धोक्यात येण्याची शक्यता होती आणि म्हणूनच या जमीनीचा वापर जैवविविधतेसाठी करण्याचा पाठपुरावा ग्रामस्थांनी चालवला होता. इच्छुक संस्थांनी सीलबंद लिफाफ्यातून १० डिसेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत साळगाव येथील गोवा राज्य जैवविविधता मंडळाच्या कार्यालयात प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन मंडळाने केले आहे.

  • Related Posts

    ₹5.61-Crore Cath Lab at SGDH Result of Madganvkars’ Collective Efforts: Prabhav Naik

    Madganvcho Awaaz youth leader Prabhav Naik welcomed the establishment of a ₹5.61-crore cardiac catheterisation laboratory at the South Goa District Hospital, attributing it to the collective efforts of 32 citizens of Margao. He also urged continued efforts to upgrade the hospital and address sewage issues in Margao.

    काँग्रेसचे ‘गोंय राखण अभियान’ सुरू; भाजप सरकारविरोधात २५ मुद्द्यांचे आरोपपत्र

    गोवा प्रदेश काँग्रेस समितीने ‘संविधान रक्षा मार्च’मध्ये ‘गोंय राखण अभियाना’चा शुभारंभ केला, ज्यात भाजप सरकारच्या १४ वर्षांच्या कारभारातील कथित भ्रष्टाचार, कुशासन आणि अपयशांवर २५ मुद्द्यांचे आरोपपत्र प्रसिद्ध केले.

    You Missed

    27/11/2026 e-paper

    27/11/2026 e-paper

    ३२ मडगावकरांचा विश्वास सार्थ ठरतोय : प्रभव नायक

    ३२ मडगावकरांचा विश्वास  सार्थ ठरतोय : प्रभव नायक

    आगरवाडा – चोपडे पठारावर हरित महाप्रकल्प

    आगरवाडा – चोपडे पठारावर हरित महाप्रकल्प

    कारापूरवासीयांचा विजय

    कारापूरवासीयांचा विजय

    ₹5.61-Crore Cath Lab at SGDH Result of Madganvkars’ Collective Efforts: Prabhav Naik

    ₹5.61-Crore Cath Lab at SGDH Result of Madganvkars’ Collective Efforts: Prabhav Naik

    काँग्रेसचे ‘गोंय राखण अभियान’ सुरू; भाजप सरकारविरोधात २५ मुद्द्यांचे आरोपपत्र

    काँग्रेसचे ‘गोंय राखण अभियान’ सुरू; भाजप सरकारविरोधात २५ मुद्द्यांचे आरोपपत्र