३२ मडगावकरांचा विश्वास सार्थ ठरतोय : प्रभव नायक

दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात ५.६१ कोटींची कॅथ लॅब उभारण्याचा मार्ग मोकळा
—————————–
——–
दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात प्रगत हृदयविकार उपचारांसाठी ५.६१ कोटी रुपयांची कॅथ लॅब उभारण्याचा मार्ग मोकळा होत असल्याने २७ ऑगस्ट २०२४ रोजी या मागणीसाठी निवेदनावर स्वाक्षरी करणाऱ्या ३२ मडगावकरांचा विश्वास सार्थ ठरत असल्याचे युवा नेते प्रभव नायक यांनी म्हटले आहे. या सुविधेसाठी पाठपुरावा केल्याबद्दल त्यांनी आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांचे आभार मानले.
शिरीष पै काणे यांच्या अपघाती निधनानंतर दक्षिण गोव्यात प्रगत आरोग्य सुविधा आणि आपत्कालीन वैद्यकीय सेवांची गरज लक्षात घेऊन हा उपक्रम सुरू करण्यात आला होता. मात्र, कॅथ लॅब उभारणे हे अंतिम उद्दिष्ट नसून दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाचे संपूर्ण सक्षमीकरण करून त्याचे तृतीयस्तरीय आरोग्यसेवा केंद्रात रूपांतर होईपर्यंत पाठपुरावा सुरूच राहणार असल्याचे नायक यांनी स्पष्ट केले. त्यासाठी तज्ज्ञ डॉक्टर, कर्मचारी, विशेष उपचार विभाग आणि आधुनिक उपकरणांची आवश्यकता असल्याचेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, मडगावातील कोंबा व इतर भागांतील सांडपाण्याच्या समस्येची आरोग्यमंत्र्यांनी तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी नायक यांनी केली. सांडपाण्यामुळे दूषित झालेल्या विहिरींची तपासणी करून संयुक्त पाहणी आणि आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश आरोग्य खात्याला द्यावेत, असे आवाहनही त्यांनी केले.

  • Related Posts

    ‘हाऊसिंग फॉर ऑल’ योजनांचा धडाका!

    घर खरेदी, दुरुस्ती आणि फ्लॅटसाठी गृहकर्ज योजनांची घोषणा ————————————- गांवकारी, दि. २६ (प्रतिनिधी आगामी विधानसभा निवडणुकीला दोन ते अडीच महिने शिल्लक असताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विविध घटकांसाठी गृहकर्ज…

    तुका म्हणे सेटल व्हावे !

    मनोजच्या भाषणात बरेच वैयक्तिक मुद्दे आले जे टाळता आले असते. पण हातचे राखून बोलला तर तो मनोज परब कसला? ———————————————————————————— अंत्रुजसिंग फोंडेकर कुठे गायब झाला असा प्रश्न कोणालाही पडला नसेल.…

    You Missed

    27/11/2026 e-paper

    27/11/2026 e-paper

    ३२ मडगावकरांचा विश्वास सार्थ ठरतोय : प्रभव नायक

    ३२ मडगावकरांचा विश्वास  सार्थ ठरतोय : प्रभव नायक

    आगरवाडा – चोपडे पठारावर हरित महाप्रकल्प

    आगरवाडा – चोपडे पठारावर हरित महाप्रकल्प

    कारापूरवासीयांचा विजय

    कारापूरवासीयांचा विजय

    ₹5.61-Crore Cath Lab at SGDH Result of Madganvkars’ Collective Efforts: Prabhav Naik

    ₹5.61-Crore Cath Lab at SGDH Result of Madganvkars’ Collective Efforts: Prabhav Naik

    काँग्रेसचे ‘गोंय राखण अभियान’ सुरू; भाजप सरकारविरोधात २५ मुद्द्यांचे आरोपपत्र

    काँग्रेसचे ‘गोंय राखण अभियान’ सुरू; भाजप सरकारविरोधात २५ मुद्द्यांचे आरोपपत्र