आमोणा वेदांताला कारणे दाखवा

प्रदूषण नियंत्रण उपाययोजनांचे उल्लंघन

गांवकारी, दि. १९ (प्रतिनिधी)

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या साखळी मतदारसंघातील आमोणा येथील वेदांता पीग आर्यन प्रकल्पाकडून प्रदूषण नियंत्रण उपाययोजनांचे सर्रास उल्लंघन होत असल्यामुळे गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने कंपनीला कारणे दाखवा नोटीस जारी केली आहे. या नोटीशीला समाधानकारक प्रतिसाद न दिल्यास प्रकल्पाचे काम बंद केले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.
पिंपळवाडा – आमोणा येथील देवानंद सिनारी यांनी चार वेळा लेखी तक्रारी गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे दाखल केल्या होत्या. अखेर या तक्रारींची दखल घेऊन मंडळाने २० नोव्हेंबर २०२५ रोजी पाहणी केली. या पाहणीत आमोणा, बेतकी, न्हावेली, खांडोळा आदी भागांपर्यंत या प्रकल्पातून लोखंडी भुकटी तसेच कोळशाची भुकटी हवेत पसरत असल्याचे दिसून आले. ही भुकटी आरोग्यासाठी घातक आहे. सरकारी शाळा, खांडोळा महाविद्यालय, न्हावेली जंक्शन तसेच अन्य सार्वजनिक ठिकाणी ही भुकटी झाडांवर व रस्त्यावर स्पष्टपणे दिसत होती. हवेतून ही भुकटी नाक-तोंडावाटे लोकांच्या शरीरात जात असल्याने परिसरातील ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांमध्ये श्वसनासंबंधी आजार वाढले आहेत. वारंवार तक्रारी करूनही त्याची दखल घेतली जात नसल्याने स्थानिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.
परवाना अटींचे उल्लंघन
गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने आमोणा येथील वेदांत पीग आर्यन प्रकल्पाचा परवाना २०२४ मध्ये नूतनीकरण केला होता. या नूतनीकरण परवान्यात प्रदूषण नियंत्रणासंबंधी सर्व उपाययोजना तात्काळ लागू करण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते. मात्र, मंडळाने केलेल्या पाहणीत या उपाययोजनांचे पालन झाले नसल्याचे उघड झाले आहे. प्रकल्पाच्या ठिकाणी सुरू असलेल्या भट्ट्यांचीही पाहणी करण्यात आली असून तिथे सूचवलेल्या उपायांची अंमलबजावणी झालेली नाही, असे अहवालात नमूद केले आहे.

  • Related Posts

    मोन्सेरातांची घराणेशाही संपवणार !

    उत्पल पर्रीकर यांचा एल्गार गांवकारी, दि. १८ (प्रतिनिधी) गोव्याची राजधानी पणजी शहराची प्रतिष्ठा लयाला पोहोचली आहे. मोन्सेरात पिता-पुत्र यांच्या घराणेशाहीने राजधानीला वेठीस धरले असून पणजीची मुक्तता करण्यासाठी महानगरपालिका निवडणुकीत पणजीकरांनी…

    पणजीकरांनाच कॅसिनो हवेत?

    मोन्सेरात पिता-पुत्रांकडून स्पष्टीकरण गांवकारी, दि. १७ (प्रतिनिधी) राजधानीचे आमदार तथा महसूलमंत्री बाबुश मोन्सेरात आणि त्यांचे पुत्र, महापौर रोहीत मोन्सेरात, या दोघांनीही आपण वैयक्तिकरित्या जुगाराविरोधात असल्याचे स्पष्ट केले आहे. कॅसिनो हटविण्यासाठी…

    You Missed

    18/02/2026 e-paper

    18/02/2026 e-paper

    आमचे काही खरे नाही…

    आमचे काही खरे नाही…

    मोन्सेरातांची घराणेशाही संपवणार !

    मोन्सेरातांची घराणेशाही संपवणार !

    17/02/2026 e-paper

    17/02/2026 e-paper

    फोंड्याचा गड भाजप राखणार ?

    फोंड्याचा गड भाजप राखणार ?

    पणजीकरांनाच कॅसिनो हवेत?

    पणजीकरांनाच कॅसिनो हवेत?