आता गांव राखण अभियान

संभाव्य उमेदवारांसाठी लोक संपर्काची योजना

गांवकारी,दि.१९(प्रतिनिधी):

काँग्रेस पक्षाच्या २७ दिवसांच्या गोंय राखण यात्रेची सांगता रविवार १८ रोजी झाल्यानंतर आता गांव राखण अभियानाची घोषणा पक्षाने केली आहे. सोमवार १९ ऑक्टोबरपासून उमेदवार चाचपणी प्रक्रिया सुरू होणार असल्याने पक्षाच्या संभाव्य उमेदवारांना विविध मतदारसंघातील लोकांपर्यंत पोहचण्यासाठी या अभियानाचा उपयोग केला जाणार आहे.
काँग्रेस पक्षाचे नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहूल गांधी यांच्या गोंय राखण यात्रेतील सहभागानंतर पक्षात नवचैतन्य पसरले आहे. पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते निवडणूकांसाठी पूर्णपणे सज्ज झाले आहेत. हा उत्साह निवडणूकीपर्यंत ताजा ठेवण्यासाठी आता गांव राखण अभियानाचे नियोजन पक्षाने केले आहे. या अभियानाअंतर्गत राज्यातील गावांगावांत पक्षाचे नेते, कार्यकर्ते फिरणार आहेत. या अभियानाअंतर्गत गावांतील विषय समजून घेऊन त्या विषयांना राज्य स्तरावरील घोषणापत्रात तसेच पक्षाच्या जाहीरनाम्यात समाविष्ठ करण्याबाबतचाही विचार केला जाईल,अशी माहिती पक्षाच्या नेत्यांनी दिली.
उमेदवार चाचपणी प्रक्रियेला प्रारंभ
गोंय राखण यात्रेनंतर आता उमेदवार चाचपणी प्रक्रिया सुरू केली जाईल,अशी माहिती प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी दिली. आरजीपी पक्षासोबत युतीच्या चर्चेलाही अंतिम स्वरूप प्राप्त करून देण्याच्या दिशेने प्रयत्न गतीमान केले जातील. गोवा फॉरवर्ड पक्षाने युतीच्या चर्चेला सकारात्मकता दर्शवल्यामुळे पुन्हा एकदा नव्याने गोवा फॉरवर्ड पक्षासोबत युतीची चर्चा सुरू केली जाईल,अशी माहिती कार्यकारी अध्यक्ष एम.के.शेख यांनी दिली.

गोवा गोमंतकीयांचाच : राहुल गांधी

गोवा हा निसर्गसंपन्न प्रदेश असून त्याची जमीन, पर्यावरण आणि सांस्कृतिक अस्मिता जपली पाहिजे. मात्र भाजप सरकार सामान्य गोमंतकीयांच्या हितापेक्षा धनाढ्य उद्योगपतींच्या हिताला प्राधान्य देत आहे. गोवा हा मुख्यमंत्री किंवा भाजपच्या मंत्र्यांची खासगी मालमत्ता नसून गोमंतकीय जनतेचा आहे, असा घणाघात लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला.

काँग्रेसच्या २७ दिवसांच्या ‘गोंय राखण यात्रे’च्या मडगाव येथील समारोप सभेत ते बोलत होते.

राहुल गांधींच्या भाषणातील प्रमुख मुद्दे
* जमिनींची लूट : गोव्याच्या जमिनी आणि नैसर्गिक साधनसंपत्ती धनाढ्यांच्या घशात घालण्याचे काम भाजप सरकार करीत असल्याचा आरोप.
* बेरोजगारी : गोव्यातील सुशिक्षित तरुणांना रोजगार का मिळत नाही? युवकांच्या भवितव्याची जबाबदारी कोण घेणार?
* उद्योगपतींचे हित : अदानी-अंबानींसारख्या बड्या उद्योगपतींच्या हिताला प्राधान्य देणाऱ्या भाजपच्या धोरणांवर टीका.
* मतचोरीचा आरोप : निवडणूक प्रक्रियेतील कथित गैरप्रकारांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर निशाणा.
* लोकशाहीचे रक्षण : संविधान, मतदानाचा अधिकार आणि लोकशाही संस्थांचे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी संघर्ष सुरूच ठेवण्याचा निर्धार.
* गोव्याची अस्मिता : गोव्याची जमीन, संस्कृती, पर्यावरण आणि पारंपरिक जीवनपद्धती वाचवण्यासाठी गोमंतकीयांनी एकत्र येण्याचे आवाहन.
* २०२७ ची निवडणूक : गोव्याच्या हिताचे रक्षण करणारे आणि जनतेला उत्तरदायी सरकार स्थापन करण्यासाठी काँग्रेसला स्पष्ट बहुमत देण्याचे आवाहन.

  • Related Posts

    48 Compassionate Appointment Cases Pending at KTCL; RTI Activist Demands Immediate Recruitment

    RTI activist Sudip Narayan Tamankar demands immediate recruitment for 48 pending compassionate appointment cases at Kadamba Transport Corporation Limited (KTCL), urging an end to prolonged administrative delays that affect families of deceased employees.

    Rahul Gandhi Sounds 2027 Poll Bugle in Goa, Accuses BJP of Land Grab, Corruption and Unemployment

    Rahul Gandhi launched a scathing attack on the BJP government in Goa over alleged land grabbing, unemployment, corruption, and environmental destruction. The Congress party concluded its ‘Goy Rakhonn Yatra’ and launched the ‘Gaon Rakhonn Abhiyan’ campaign, urging Goans to give Congress a clear majority in the 2027 Assembly elections to protect the state’s land, identity, and democratic rights.

    You Missed

    19/10/2026 e-paper

    19/10/2026 e-paper

    आता गांव राखण अभियान

    आता गांव राखण अभियान

    गोवा काँग्रेसला संजीवनी मिळणार ?

    गोवा काँग्रेसला संजीवनी मिळणार ?

    48 Compassionate Appointment Cases Pending at KTCL; RTI Activist Demands Immediate Recruitment

    48 Compassionate Appointment Cases Pending at KTCL; RTI Activist Demands Immediate Recruitment

    Rahul Gandhi Sounds 2027 Poll Bugle in Goa, Accuses BJP of Land Grab, Corruption and Unemployment

    Rahul Gandhi Sounds 2027 Poll Bugle in Goa, Accuses BJP of Land Grab, Corruption and Unemployment

    THE TUEM EMC DECEPTION: INDUSTRIAL DREAMS SACRIFICED FOR COMMERCIAL PROFITS?

    THE TUEM EMC DECEPTION: INDUSTRIAL DREAMS SACRIFICED FOR COMMERCIAL PROFITS?