अखिल गोमंतक क्षत्रिय मराठा समाजाचे सरसेनापती श्री. सुहास फळदेसाई

अखिल गोमंतक क्षत्रिय मराठा समाज ही राज्यातील ९६ कुळी मराठा समाज बांधवांची शिखर संस्था आहे. या समाजाचे नेतृत्व हरहुन्नरी व्यक्तिमत्व श्री. सुहास फळदेसाई करीत आहेत. त्यांची धडाडी, चिकाटी आणि परिश्रम पाहिल्यानंतर या शिखर संस्थेचे प्रमुख म्हणून ते गोव्यातील अखिल गोमंतक क्षत्रिय मराठा समाजाचे सरसेनापतीच ठरले आहेत, असे कौतुकाने म्हणावे लागेल.
समाजाच्या उन्नतीसाठी आणि समाज संघटीत करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर त्यांनी कार्य केले आहे. बाळ्ळी देवस्थानचे माजी सचिव हे पद सांभाळताना, त्यांनी अखिल गोमंतक क्षत्रिय मराठा समाजाचे माजी सचिव म्हणूनही आपला ठसा उमटवला आहे. आतापर्यंत त्यांनी आपल्या कुशल नेतृत्वाने अनेक महत्त्वाचे प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण केले आहेत. मराठा संकुल प्रकल्प पूर्ण करणे हा त्यांचा प्रमुख ध्यास आहे आणि या ध्यासपूर्तीसाठी ते झपाटल्यागत आपल्या सहकाऱ्यांसह काम करत आहेत.
शालांत शिक्षणानंतर त्यांनी सिव्हिल इंजिनिअरिंगमधील डिप्लोमा पूर्ण केला. सध्या ते एक जबाबदार सरकारी नगर अभियंता म्हणून उत्कृष्ट कामगिरी बजावत आहेत. समाजासाठी त्यांनी अनेक दूरदृष्टीच्या योजना राबवल्या आहेत, ज्यामध्ये समाजबांधवांची सभासद नोंदणी, सांस्कृतिक व क्रीडा कार्यक्रमांचे आयोजन, महिलांचे सक्षमीकरण, तसेच विद्यार्थी आणि तरुणांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमांचा समावेश आहे.
ते एक कुशल प्रशासकच नाही, तर एक आकर्षक व्यक्तिमत्त्व देखील आहेत. त्यांचा सौम्य व शांत स्वभाव कोणालाही आपलेसे करून घेतो. समाजाच्या विविध विचारधारांना स्वीकारून सर्वांना एकत्र घेऊन पुढे जाण्याची क्षमता हेच त्यांच्या नेतृत्वाचे वेगळेपण आहे. देवाच्या कृपेने त्यांना त्यांच्या कामात त्यांच्या प्रेमळ पत्नीचा आणि दोन गोड मुलांचा भक्कम आधार लाभला आहे. त्यामुळे ते अधिक आत्मविश्वासाने समाजाच्या प्रगतीसाठी वेळ देऊ शकतात.
समाजाच्या उन्नतीसाठी आणि एकतेसाठी अहोरात्र झटणारे श्री. सुहास फळदेसाई यांचे कार्य समाजासाठी एक प्रेरणास्थान आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली अखिल गोमंतक क्षत्रिय मराठा समाज निश्चितच एक नवी दिशा आणि उंची गाठेल यांत काहीच शंका नाही.
एक हीतचिंतक

  • Related Posts

    पडत्या फळाची आज्ञा !

    हनुमान म्हणाला, ‘माई, या मोत्यांत राम आहे का ते शोधतोय. ज्या गोष्टीत राम आहे, तीच गोष्ट माझ्या उपयोगाची, बाकीचा कचरा घेऊन काय करू?’‘पडत्या फळाची आज्ञा’ ही म्हण तुम्ही ऐकली असेल.…

    “कोकणचा प्रेरणादायक प्रवास—रानमाणूस प्रसाद गावडे यांच्या कार्याचा गौरव”

    रानमाणसाचे त्रिवार अभिनंदन! अस्सल कोकण ब्रॅण्ड “रानमाणूस” म्हणून ओळख मिळवलेले प्रसाद गावडे यांना यंदाचा युआरएल फाऊंडेशन सामाजिक गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्काराच्या माध्यमातून एक लाख रुपये रोख आणि…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    ‘बीएलओ’ बदली आदेश अखेर स्थगित

    ‘बीएलओ’ बदली आदेश अखेर स्थगित

    13/06/2025 e-paper

    13/06/2025 e-paper

    “दया, कुछ तो गडबड है…”

    “दया, कुछ तो गडबड है…”

    12/06/2025 e-paper

    12/06/2025 e-paper

    राणेंविरोधी तक्रारीमुळे एसआयटी पेचात

    राणेंविरोधी तक्रारीमुळे एसआयटी पेचात

    न्यायदानात गोव्याची घसरण

    न्यायदानात गोव्याची घसरण
    error: Content is protected !!