आता झेडपी आणि आमदारही बनवू!

गोवा कन्नड महासंघाचे अध्यक्ष सिद्धण्णा मेटी गरजले
गांवकारी, दि. ३ (प्रतिनिधी)

आमच्या समाजातील एक व्यक्ती गोव्यात सरपंच बनली आहे. आता यापुढे जिल्हा पंचायत सदस्य आणि आमदारही आमच्या समाजातील व्यक्ती बनवण्याइतकी ताकद गोव्यात आहे, अशी गर्जना कन्नड साहित्य परिषदेचे अध्यक्ष सिद्धण्णा मेटी यांनी केली.
सांकवाळ याठिकाणी कन्नड राज्योत्सव कार्यक्रमानंतर पत्रकारांनी काही प्रश्न विचारले असता सिद्धण्णा मेटी यांनी आक्रमकपणे यावर भाष्य केले आणि कन्नडविरोधकांचा खरपूस समाचार घेतला. त्यांनी थेट रिव्होल्यूशनरी गोवन्स पार्टीला लक्ष्य करत वेगवेगळी सनसनाटी विधाने केली. “कन्नड समाजाचा सरपंच झाल्याबद्दल सर्वांनी त्यांचे अभिनंदन करायला हवे. काही मतदारसंघात आमचे पाच हजार मतदार आहेत, तर काही ठिकाणी दहा ते पंधरा हजार इतके मतदार आहेत. अनेक मतदारसंघात आमदार, मंत्री आणि मुख्यमंत्री बनण्यासाठीही आमच्या समाजाचा मोठा वाटा आहे,” असे ते म्हणाले.
कष्ट करून खातो, चोरी करत नाही…
“आमचे कपडे बघा, आमचेही राहणीमान गोंयकारांसारखेच आहे. आम्हाला ‘घाटी-घाटी’ म्हणून हिणवणे बंद करा,” असे आवाहन मेटी यांनी केले. “तुम्ही आम्हाला मदत करा, आम्ही तुम्हाला विधानसभेत पोहोचवण्यासाठी तुमच्या सोबत राहू,” असेही त्यांनी सांगितले. “आम्ही कष्ट करून खातो, चोरी करून जगत नाही. जिथे जिथे मोठ्या वस्ती आहेत, तिथे गरीब माणसे हवी लागतात. या वस्ती स्वच्छ ठेवायच्या असतील तर कष्टकरी समाजाची गरज लागते. बारीकसारीक काम, धंदे करणाऱ्यांना लक्ष्य करणाऱ्यांनी मोठ्या लोकांना टार्गेट करावे. झुवारीनगरच्या झोपडपट्टीवर बोलणाऱ्यांनी याठिकाणी लाखो चौ. मीटर जमीन विकत घेणाऱ्यांवर बोलावे,” असे आवाहन करत मेटी यांनी अप्रत्यक्षपणे आरजीपीवर शरसंधान साधले.
आमची बदनामी नको
सिद्धण्णा मेटी यांनी पुढे सांगितले, “रात्री ग्लाससोबत बसून व्हिडिओ काढून आम्हाला बदनाम करणे थांबवा. आमच्याकडेही तुमची कुंडली आहे. तरीदेखील आम्ही गप्प आहोत. तुमचे नाव घेण्यास आम्हाला शरम वाटते,” असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे आरजीपीच्या नेत्यांना थेट आव्हान दिले.
“आम्ही भारताची संस्कृती जतन करत आहोत. गोव्यात आम्हाला ५३ वर्षे झाली आहेत, त्यापेक्षा अधिक काळ कन्नड लोक येथे वास्तव्यास आहेत. आम्ही संविधान मानतो. आम्हाला ‘घाटी-घाटी’ म्हणून हिणवणारे पक्ष संविधान मानत नाहीत का?” असा सवाल मेटी यांनी उपस्थित केला.
उत्तर भारतीयांचे काय?
“उत्तर भारतीयांनी गोव्यात येऊन लाखो चौ. मीटर जमीन विकत घेतली आहे. गोव्याच्या विनाशाला ते कारणीभूत आहेत. त्यांच्या विरोधात आरजी पक्षाने आवाज उठवावा. जुवारी येथे लाखो चौ. मीटर जमीन घेतली आहे; त्यांच्या विरोधात आवाज उठवा. बस्त्यांमध्ये राहणाऱ्या कन्नड समाजाच्या लोकांना त्रास देऊ नका. आम्ही एकमेकांना भावाप्रमाणे मानतो,” असे मेटी यांनी स्पष्ट केले.

  • Related Posts

    दामू नाईक यांचा अभ्यास कच्चा !

    काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांचा हल्लाबोल गांवकारी, दि. ७ (प्रतिनिधी) राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या अपयशाचे खापर काँग्रेसवर फोडणाऱ्या भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांचा अभ्यास अपुरा आहे, असा टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष…

    बांबोळी ”ब्लॅकस्पॉट” सरकारनिर्मित

    बिल्डरला मदत करण्यासाठी महामार्गात बदल गांवकारी, दि. ६ (प्रतिनिधी)बांबोळी येथील राष्ट्रीय महामार्ग-६६ वर आतापर्यंत अनेकांचे प्राण गेले आहेत. या महामार्गाच्या मूळ आराखड्यात गोवा सार्वजनिक बांधकाम खात्याने एका बिल्डरला मदत करण्याच्या…

    You Missed

    जनतेला मूर्ख बनवण्याचा प्रयत्न नको

    जनतेला मूर्ख बनवण्याचा प्रयत्न नको

    अरे हे चाललंय काय?

    अरे हे चाललंय काय?

    08/11/2025 e-paper

    दामू नाईक यांचा अभ्यास कच्चा !

    दामू नाईक यांचा अभ्यास कच्चा !

    गोंयकारांनीच पुढाकार घ्यावा

    गोंयकारांनीच पुढाकार घ्यावा

    07/11/2025 e-paper

    error: Content is protected !!