विरेश पुन्हा मैदानात

आंदोलनाची पुढील दिशा आज ठरणार

गांवकारी, दि. २४ (प्रतिनिधी)

सोमवारी रात्री प्रकृती खालावल्यामुळे खाजगी इस्पितळात दाखल करण्यात आलेले सांतआंद्रेचे आमदार विरेश बोरकर आणि तुषार गांवस हे दोघेही मंगळवारी सकाळी पुन्हा आझाद मैदानावर दाखल झाले. जोपर्यंत वादग्रस्त कलम ३९(ए) रद्द केले जाणार नाही, तोपर्यंत हे आंदोलन बंद होणार नाही, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. शिरदोन-पाळेवासियांशी चर्चा केल्यानंतरच आंदोलनाची पुढील दिशा आज निश्चित केली जाईल, अशी माहिती अजय खोलकर यांनी दिली.
सोमवारी नगर नियोजनमंत्री विश्वजीत राणे यांच्या दोनापावला येथील बंगल्यावर विराट मोर्चा नेण्यात आला. रात्रभर तिथेच ठिय्या मांडण्याचा निर्धार आंदोलकांनी केला असता, आझाद मैदानावर विरेश बोरकर यांची प्रकृती खालावल्याची वार्ता मिळाल्याने हा मोर्चा पुन्हा आझाद मैदानावर वळविण्यात आला. डॉ. ऑस्कर रिबेलो हे विरेश बोरकर यांच्या प्रकृतीकडे लक्ष ठेवून होते. त्यांनी तपासणी केल्यानंतर त्यांना तत्काळ इस्पितळात दाखल करण्याची विनंती केली. मात्र विरेश बोरकर तयार नसल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले. शेवटी सर्वांनी समजूत काढल्यानंतर विरेश आणि तुषार या दोघांनाही खाजगी इस्पितळात हलविण्यात आले. सकाळी ११ वाजता ते पुन्हा आझाद मैदानावर दाखल झाले.
पोलिस तक्रार प्राधिकरणाकडे सुनावणी
आमदार विरेश बोरकर यांच्याबाबतीत पोलिस बळाचा वापर करून त्यांना फरफटत कार्यालयाबाहेर ओढून आणण्याच्या प्रकरणासंबंधी काशिनाथ शेटये यांनी गोवा पोलिस तक्रार निवारण प्राधिकरणाकडे याचिका दाखल केली आहे. यात पोलिस निरीक्षक विजय चोडणकर आणि पोलिस अधीक्षक हरिषचंद्र मडकईकर यांना प्रतिवादी केले असून नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. येत्या १२ मार्च रोजी पुढील सुनावणी होईल.
सरदेसाई विरुद्ध परब वाकयुद्ध
आरजीपीचे अध्यक्ष मनोज परब यांनी आमदार विजय सरदेसाई यांच्यावर निशाणा साधला. सरदेसाई हे विश्वजीत राणे यांच्या घरावर मोर्चात सहभागी का झाले नाहीत? असा सवाल त्यांनी केला. परब यांनी आरोप केला की सरदेसाई यांचे सरकारातील अनेकांकडे घनिष्ठ संबंध आहेत. ३९(ए) कलमाचे मूळ रूप हे १६(ब) असून त्याचे ते जनक आहेत. विधानसभेत या वादग्रस्त विधेयकावेळीही त्यांनी चर्चेत सहभाग घेतला नाही. विधानसभेत ते या विषयाला न्याय द्यायला तयार नाहीत आणि विधानसभेबाहेरही आंदोलनाला गालबोट लावण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी टीका परब यांनी केली.
विजय सरदेसाई यांनी प्रत्युत्तर देताना म्हटले की मनोज परब यांना उत्तर देण्याची पात्रताच नाही. या आंदोलनात लहान मुले, महिलांचा समावेश होता. एखाद्याच्या खाजगी घरावर मोर्चा नेणे हे अयोग्य वाटल्यानेच आणि आंदोलनातील लोकांच्या सुरक्षेचा विषय महत्त्वाचा असल्यामुळेच आपण गेलो नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

  • Related Posts

    चलो, आझाद मैदान !

    आज ”करो या मरो” महाआंदोलन गांवकारी, दि. २३ (प्रतिनिधी) शिरदोन-पाळीवासियांच्या आंदोलनाला आता राज्यव्यापी आंदोलनाचे वळण मिळाले आहे. नगर नियोजन खात्याच्या वादग्रस्त कलम ३९(ए) रद्द करून आमदार विरेश बोरकर यांना फरफटत…

    आंदोलकांवर ब्लॅकमेलिंगचा आरोप

    शिरदोन-पाळेवासीय आक्रमक गांवकारी, दि. २१ (प्रतिनिधी) नगर नियोजन खात्याच्या कार्यालयात ठाण मांडून शुक्रवारची संपूर्ण रात्र तिथेच झोपून काढलेल्या शिरदोन-पाळेवासियांना “ब्लॅकमेलर्स” असे संबोधून नगर नियोजन मंत्री विश्वजीत राणे यांनी आगीत तेल…

    You Missed

    24/02/2026 e-paper

    24/02/2026 e-paper

    विरेश पुन्हा मैदानात

    विरेश पुन्हा मैदानात

    उन्मत्त सत्तेविरोधात जनक्षोभाचा विस्फोट

    उन्मत्त सत्तेविरोधात जनक्षोभाचा विस्फोट

    मनोज परब, हो सावधान!

    मनोज परब, हो सावधान!

    Manoj Parab, Be Cautious!

    Manoj Parab, Be Cautious!

    This is Viresh Borkar’s moment!

    This is Viresh Borkar’s moment!