दाम करी काम येड्या…

राजकारणात पैशांसमोर सगळेच नगण्य अशी अवस्था आहे. कुणी प्रत्यक्ष देवाकडे आपण बोलतो,असे म्हणत आहे तर देवासमोर शपथ घेऊनही निर्लज्यपणे या शपथेच्याविरोधात जातो, त्यालाही काहीच वाटत नाही.

“दाम करी काम येड्या” या १९७१ सालच्या चित्रपटासाठी जगदीश खेबूडकर यांनी लिहीलेले गीत आज सकाळी शनिवारी श्री मारूतीचे दर्शन घेण्यासाठी गेलो असता कानावर पडले. नकळतपणे हे शब्द आजच्या घडीला किती तंतोतंत लागू पडतात याची जाणीव झाली. प्रभू श्री रामाची महती सांगून सत्तेवर आलेल्या भाजपच्या राज्यातही वासुदेवाची वाणी किती खरी ठरते हे या गाण्याच्या शब्दांतून आता खरे वाटायला लागले आहे. वासुदेवाची ऐका वानी “जगात न्हाई राम रे, दाम करी काम येड्या दाम करी काम” ही या गीताची सुरूवात. “मुह मे राम, बगल मे छुरी” अशी एक हिंदी कहावत आहे. देवाचे नाव घेऊन अपवित्र गोष्टी करायच्या ही तर आता अनेकांना सवयच जडली आहे. आपले नेते,पुढारी मोठ मोठ्या मंदिरात जाऊन धार्मिक विधी करतानाचे तसेच मंदिरांना पैसा, दागिन्यांचे दान करतानाचे फोटो आपल्याला त्यांच्या सोशल मीडियावर हटकून दिसतात. पण नेते, पुढारी म्हणून त्यांची कृती पाहिल्यानंतर हे धाडस ते करूच कसे शकतात,असा प्रश्न पडतो. सामान्य माणूस बिचारा देवाला घाबरतो. कुठलेही वाईट काम किंवा खोटे काम करायची वेळ येते तेव्हा तो स्वतःला दचकतो. पण बिनधास्तपणे पाप करणाऱ्या या नेत्यांना देवाच्या पायांकडे लोटांगण घालताना खरेच काहीच वाटत नसावे काय,असा सवाल नेहमीच पडतो. आज गोव्यातील राजकीय परिस्थिती पाहील्यानंतर जगदीश खेबूडकरांच्या या ५० वर्षांपूर्वीच्या गीताचे शब्द तेवढेच जिवंत वाटतात. आपले सगळे राजकारण हे केवळ पैशांभोवतीच फिरते की काय,अशी परिस्थीती निर्माण झाली आहे. पैसा असेल तर कुठलीही गोष्ट असाध्य नाही असाच जणू संदेश सर्वंत्र पसरला आहे. माणूस कळत नकळत या पैशांच्या मागे फरफटत चालला आहे. तो दिवसेंदिवस आंधळा बनत चालला आहे आणि पैशांमुळे माणूसकीही हरवत चालली आहे,अशी निराशाजनक परिस्थिती उदभवली आहे. आपण गरीब असताना किती सुखी, समाधानी होतो परंतु या पैशांच्या मागे लागून किती स्वार्थी आणि आपमतलबी झाले हेच कळले नाही. पैशांनी देवालाही विकत घेता येते, इथपर्यंत माणसाने झेप घेतली आहे. माणसामाणसांतील स्पर्धा ही केवळ पैसा आणि प्रतिष्ठेसाठी लागली आहे. राजकारणात पैशांसमोर सगळेच नगण्य अशी अवस्था आहे. कुणी प्रत्यक्ष देवाकडे आपण बोलतो,असे म्हणत आहे तर देवासमोर शपथ घेऊनही निर्लज्यपणे या शपथेच्याविरोधात जातो, त्यालाही काहीच वाटत नाही. भोळाभाबडा सामान्य माणूस देवावर श्रद्धा ठेवून वागतो पण मोठ मोठी माणसे देवालाही आपल्या कवेत घेऊन वावरतात. देवाला मोठ मोठे दान देऊन देवाला आपल्या शब्दात अडकवून ठेवण्याची कृतीही अलिकडच्या काळात सुरू असल्याचे दिसून येते. हा देव म्हणे या व्यक्तीच्या कलानेच वागतो मग सामान्य माणसांसाठी कुठल्या गाभाऱ्यातला देव राहीला आहे, याचा आता शोध घ्यावा लागणार आहे. हा देव आता आपला खरा अवतार दाखवणार तरी कधी. देवभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या पवित्र भूमीत आता देव आपले अस्तित्व दाखवणार आहे की नाही ?

  • Related Posts

    माणसासम वागणे… हीच प्रार्थना!

    प्रत्येकवेळी या धर्मातील लोकांना आपला राष्ट्रवाद, देशप्रेम, बंधुभाव सिद्ध करावा लागत असेल, तर मग या धार्मिक लोकांच्या मनात शत्रुत्वाची भावना तयार होणे स्वाभाविक आहे. “धर्म, जाती, प्रांत, भाषा भेद सारे…

    दहशतवादाचा बिमोड हवाच

    आपला धार्मिक एकोपा हीच आपली ताकद आहे आणि या ताकदीच्या बळावरच आपण अशा दहशतवादाला सडेतोड प्रत्यूत्तर द्यायचे आहे हे विसरून चालणार नाही. जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे मंगळवारी दुपारी झालेल्या…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    24/04/2025 e-paper

    24/04/2025 e-paper

    माणसासम वागणे… हीच प्रार्थना!

    माणसासम वागणे… हीच प्रार्थना!

    चिरेखाणी; मशीनमागे ७० हजारांचा हप्ता !

    चिरेखाणी; मशीनमागे ७० हजारांचा हप्ता !

    23/04/2025 e-paper

    23/04/2025 e-paper

    दहशतवादाचा बिमोड हवाच

    दहशतवादाचा बिमोड हवाच

    राजधानीला ‘मुंबई’ बनवण्याचा घाट का ?

    राजधानीला ‘मुंबई’ बनवण्याचा घाट का ?
    error: Content is protected !!