फ्रेंड्स कॉलनीवर अखेर फिरणार बुलडोझर

दक्षिण गोवा कोमुनिदाद प्रशासकांचा निर्णय

गांवकारी, दि.२४ (प्रतिनिधी)

चिकोळणा-बोगमाळो कोमुनिदादच्या मालकीच्या सर्वे क्रमांक ४/१ मधील बेकायदेशीर बंगले आणि घरे त्वरित रिकामी करावीत अन्यथा ती पाडण्याचे आदेश दक्षिण गोवा कोमुनिदादचे प्रशासक यांनी जारी केले आहेत. या आदेशामुळे फ्रेंड्स कॉलनीतील अलिशान बांधकामांवर बुलडोझर फिरणे अटळ बनले आहे.
फोरम अगेन्स्ट करप्शन, इललिगेलिटी अँण्ड डिस्ट्रक्शन्स या संस्थेचे संजय म्हाळशेकर आणि रूई आरावेझो यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात जनहित याचिका दाखल केली होती. सुनावणीनंतर न्यायालयाने बांधकामे बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट केले. खंडपीठाने या बांधकामे आठ दिवसांत पाडण्याचे आदेश दक्षिण गोवा जिल्हाधिकारी व कोमुनिदाद प्रशासकांना दिले.
कोमुनिदाद प्रशासकांनी या कारवाईसाठी खंडपीठाकडे अतिरिक्त १२ आठवड्यांची मुदत मागितली होती. ती मंजूर झाल्यानंतर काही काळ कारवाईला स्थगिती मिळाली. मात्र, सर्व प्रयत्न निष्फळ ठरल्यावर अखेर २१ जुलै रोजी प्रशासक प्रजित चोडणकर यांनी संबंधित १९ बांधकामे त्वरित रिकामी करावी अन्यथा ती पाडण्यात येतील असे आदेश दिले आहेत.
राजकीय हस्तक्षेप आणि संताप
मुरगांव तालुक्यातील एका वरिष्ठ राजकीय नेत्याच्या वरदहस्तामुळे कोमुनिदादच्या जागेवर ही अलिशान बांधकामे उभी राहिली होती. संबंधित भूखंडे त्यांच्या निकटवर्तीयांना देण्यात आली होती. त्या ठिकाणी १९ बांधकामे उभारण्यात आली ज्यात काही अत्यंत महागडी बंगले आहेत. सदर राजकीय नेत्याने कारवाई थांबविण्यासाठी पूर्ण ताकद पणाला लावली होती, तसेच जिल्हाधिकारी व प्रशासकांवर दबाव टाकण्यात आला होता. या १९ बेकायदा बांधकामे पाडण्याचे आदेश स्वीकारण्यासाठी सदर राजकीय नेत्याचाच एक अधिकारी उपस्थित होता आणि त्यानेच हे सगळे आदेश स्वीकारल्याचीही माहिती प्राप्त झाली आहे. प्रजित चोडणकर यांनी आदेश जारी केल्यानंतर त्यांची बदलीची चर्चा सुरू झाली आहे. सदर राजकीय नेता सरकारचा भाग असतानाही ही कारवाई थांबवू शकला नाही, त्यामुळे न्यायालयाचा निर्णय निर्णायक ठरल्याचे बोलले जात आहे.

  • Related Posts

    दामू नाईक यांचा अभ्यास कच्चा !

    काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांचा हल्लाबोल गांवकारी, दि. ७ (प्रतिनिधी) राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या अपयशाचे खापर काँग्रेसवर फोडणाऱ्या भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांचा अभ्यास अपुरा आहे, असा टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष…

    बांबोळी ”ब्लॅकस्पॉट” सरकारनिर्मित

    बिल्डरला मदत करण्यासाठी महामार्गात बदल गांवकारी, दि. ६ (प्रतिनिधी)बांबोळी येथील राष्ट्रीय महामार्ग-६६ वर आतापर्यंत अनेकांचे प्राण गेले आहेत. या महामार्गाच्या मूळ आराखड्यात गोवा सार्वजनिक बांधकाम खात्याने एका बिल्डरला मदत करण्याच्या…

    You Missed

    जनतेला मूर्ख बनवण्याचा प्रयत्न नको

    जनतेला मूर्ख बनवण्याचा प्रयत्न नको

    अरे हे चाललंय काय?

    अरे हे चाललंय काय?

    08/11/2025 e-paper

    दामू नाईक यांचा अभ्यास कच्चा !

    दामू नाईक यांचा अभ्यास कच्चा !

    गोंयकारांनीच पुढाकार घ्यावा

    गोंयकारांनीच पुढाकार घ्यावा

    07/11/2025 e-paper

    error: Content is protected !!