‘हाऊसिंग फॉर ऑल’ योजनांचा धडाका!

घर खरेदी, दुरुस्ती आणि फ्लॅटसाठी गृहकर्ज योजनांची घोषणा
————————————-
गांवकारी, दि. २६ (प्रतिनिधी
आगामी विधानसभा निवडणुकीला दोन ते अडीच महिने शिल्लक असताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विविध घटकांसाठी गृहकर्ज योजनांची घोषणा केली आहे. सरकारी कर्मचारी, महामंडळे, अनुदानित संस्था तसेच खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना नवीन घर खरेदी, घराची दुरुस्ती आणि फ्लॅट खरेदीसाठी या योजनांचा लाभ मिळणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘हाऊसिंग फॉर ऑल’ संकल्पनेअंतर्गत राज्य सरकारने या योजना तयार केल्या आहेत. सरकारने निश्चित केलेल्या बँकांमार्फत पात्र अर्जदारांना कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना ४ टक्के व्याजदराने गृहकर्ज मिळणार असून, खासगी क्षेत्रातील पात्र कर्मचाऱ्यांनाही सरकारकडून ४ टक्के व्याजदराची सवलत दिली जाणार आहे. सरकारी कर्मचाऱ्यांसाठीच्या योजनेत ३५ लाख रुपयांपर्यंत कर्जाची तरतूद आहे.
गोवा मानव संसाधन विकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठीही स्वतंत्र गृहकर्ज योजना राबविण्यात येणार आहे. याशिवाय, मूळ भूमिहीन गोमंतकीयांसाठी गोवा गृहनिर्माण मंडळ किंवा गोवा पुनर्वसन मंडळाने बांधलेले फ्लॅट दुरुस्त करून तसेच वापराविना असलेले सरकारी गाळे दुरुस्त करून ३० वर्षांच्या भाडेपट्ट्यावर देण्याची योजनाही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ३० वर्षांचा रहिवासी दाखला आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

  • Related Posts

    तुका म्हणे सेटल व्हावे !

    मनोजच्या भाषणात बरेच वैयक्तिक मुद्दे आले जे टाळता आले असते. पण हातचे राखून बोलला तर तो मनोज परब कसला? ———————————————————————————— अंत्रुजसिंग फोंडेकर कुठे गायब झाला असा प्रश्न कोणालाही पडला नसेल.…

    वाघाच्या अस्तित्वाचे पुरावे तीन महिन्यांत देतो!

    पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर यांचे वनमंत्र्यांना आव्हान ————————————————————————————————– गांवकारी, दि. २४ (प्रतिनिधी) म्हादई अभयारण्यातील वाघाच्या चित्रफितीवरून वनमंत्री विश्वजित राणे यांनी केलेल्या दाव्याला पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर यांनी आव्हान दिले आहे. संबंधित चित्रफीत…

    You Missed

    26/11/2026 e-paper

    26/11/2026 e-paper

    ही तर गोंयकारपणाला घरघर…?

    ही तर गोंयकारपणाला घरघर…?

    ‘हाऊसिंग फॉर ऑल’ योजनांचा धडाका!

    ‘हाऊसिंग फॉर ऑल’ योजनांचा धडाका!

    ध्वनिप्रदूषण ; उच्च न्यायालयाने फटकारले

    ध्वनिप्रदूषण ; उच्च न्यायालयाने फटकारले

    Citizens’ Group Urges ECI to Restore Excluded Goa Voters, Warns of Demand to Scrap SIR

    Citizens’ Group Urges ECI to Restore Excluded Goa Voters, Warns of Demand to Scrap SIR

    Karapur-Sarvan Activist Files Police Complaint Over Alleged Assault Threat

    Karapur-Sarvan Activist Files Police Complaint Over Alleged Assault Threat