जीत – मायकल राजकारणाला हिंसक वळण ?

मांद्रेचे माजी सरपंच महेश कोनाडकर यांच्यावर हल्ला

पेडणे,दि.४(प्रतिनिधी)

मांद्रेचे आमदार जीत आरोलकर आणि कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांच्यात राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच आज दिवसाढवळ्या मांद्रेचे माजी सरपंच आणि विद्यमान पंच महेश कोनाडकर यांच्यावर चार ते पाच अज्ञात बुरखाधाऱ्यांनी प्राणघातक हल्ला चढवण्याचा प्रकार घडला. तुला मायकल हवा का असे विचारून हल्लेखोरांनी लोखंडी रॉडने मारहाण केल्यामुळे कोनाडकर जबर जखमी झाले आहेत.
मायकल लोबो यांची धाव
मांद्रेचे माजी सरपंच आणि पंच महेश कोनाडकर हे मुळ माजी आमदार दयानंद सोपटे यांचे समर्थक. आमदार जीत आरोलकर यांनी त्यांच्या पंचायत मंडळाला खाली उतरवून या पंचायतीवर आपली सत्ता स्थापन केली. अलिकडेच बाळा नाईक यांच्यावर अविश्वास ठराव दाखल करून आमदार जीत आरोलकर यांनी पंचायतीत नवी खेळी खेळली आणि त्यात महेश कोनाडकर यांना आपल्या बाजूने ओढले. कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांचा पेडणेतील मांद्रे आणि पेडणे मतदारसंघात बराच वावर सुरू झाला आहे. मायकल लोबो हे स्वतः किंवा आपल्या मुलासाठी मांद्रे मतदारसंघाची चाचपणी करत असल्याची खबर पसरली आहे. त्यात मायकल लोबो यांच्यासोबत पेडणे तालुक्यातील अनेक मंडळी वावरताना दिसत आहे. अलिकडेच झालेल्या काही कार्यक्रमांत महेश कोनाडकर हे मायकल लोबो यांच्यासोबत दिसल्याने तो देखील एक चर्चेचा विषय ठरला होता. महेश कोनाडकर यांच्यावर हल्ला झाल्याची खबर कळताच मायकल लोबो यांनी तुये सामाजिक इस्पितळात धाव घेऊन त्यांची विचारपूस केली. माजी आमदार दयानंद सोपटे हे देखील हजर होते. तालुक्यातील विविध भागांतून मोठ्या प्रमाणात सरपंच, पंचांनी आणि हीतचिंतकांनी धाव घेऊन महेश कोनाडकर यांनी धीर दिला.
गुंडगिरी खपवून घेणार नाही
मांद्रे मतदारसंघात गुंडगिरीला अजिबात थारा दिला जाणार नाही. राजकारणात आरोप-प्रत्यारोप होत असतात पण त्याचा अर्थ तिथे वैर किंवा सूडबुद्धी नसते. कुणीतरी या राजकीय वातावरणाचा गैरवापर करून हे कृत्य घडवून आणले असण्याची शक्यता आमदार जीत आरोलकर यांनी केली. हे अत्यंत घृणास्पद आणि निंदनीय राजकारण आहे. आपण मुख्यमंत्र्यांकडे याविषयी बोललो आहे आणि दोषींना ताबडतोब अटक करण्याची मागणी केल्याचेही ते म्हणाले.
मुख्यमंत्र्यांची भेट
आमदार मायकल लोबो, माजी आमदार दयानंद सोपटे तसेच मांद्रेचे सरपंच, पंचसदस्य आणि पेडणे तालुक्यातील इतर लोकांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेतली. कायदा सुव्यवस्थेचा हा प्रश्न ताबडतोब निकाली काढावा,असे त्यांनी सांगितले. मांद्रे पोलिस स्थानकाच्या पोलिस निरीक्षकांच्या तक्रारीही यावेळी करण्यात आल्या. हे निरीक्षक राजकीय इशाऱ्यांवर काम करत असल्याची टीकाही यावेळी करण्यात आली. महेश कोनाडकर यांच्या हल्लेखोरांना ताबडतोब पकडण्यात यावे,अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली.

  • Related Posts

    ‘स्वामित्व’ योजनेत गोवा सरकार नापास

    लोकसभेला पुरवली प्रॉपर्टी कार्डची खोटी माहिती पणजी, दि. १८ (प्रतिनिधी) राज्यातील ग्रामीण भागांतील लोकांच्या घरांचे भूमापन करून त्यांना मालकीचा दाखला प्रदान करण्यासंबंधीच्या केंद्र सरकारच्या स्वामित्व योजनेत गोवा सरकार सपशेल नापास…

    दोन मंत्र्यांच्या कार्यालयात ‘दिदि’गिरी!

    मुख्यमंत्र्यांकडे तक्रारी करूनही काही उपयोग होत नाही पणजी, दि. १७ (प्रतिनिधी) राज्यात कॅश फॉर जॉब प्रकरणांतून मंत्र्यांकडील सलगीचा वापर करून नोकरीचे आमिष दाखवून शेकडो बेरोजगारांना गंडा घातलेल्या महिलांचे उदाहरण ताजे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    18/01/2025 e-paper

    18/01/2025 e-paper

    सूर्याचे लग्न !

    सूर्याचे लग्न !

    दामू नाईक व्हा पुढे…

    दामू नाईक व्हा पुढे…

    ‘स्वामित्व’ योजनेत गोवा सरकार नापास

    ‘स्वामित्व’ योजनेत गोवा सरकार नापास

    नवनिर्वाचित भाजपाध्यक्ष दामू कार्यकर्तृत्व महती त्याची काय वानू..!!

    नवनिर्वाचित भाजपाध्यक्ष दामू कार्यकर्तृत्व महती त्याची काय वानू..!!

    ‘गांव जाला जाण्टो’ आता मुंबईत

    ‘गांव जाला जाण्टो’ आता मुंबईत
    error: Content is protected !!