कोण चोर, कोण पोलिस ?

राज्यात १४ वर्षे आणि केंद्रात १२ वर्षे सत्तेत असेलल्या भाजपने भ्रष्टाचार, अनैतिकता आणि निष्क्रियतेची काँग्रेसचीच परंपराच तर पुढे आणली आहे.

सुलेमान खान पलायन प्रकरणाने पोलिस खात्याच्या विश्वासाहर्तेलाच काळीमा फासला आहे. मांद्रेचे माजी सरपंच महेश कोनाडकर यांच्यावर जीवघेणा हल्ला करणारे अटक झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी जामीनावर सुटतात, तिकडे मोरजी येथे पोलिसांच्या समक्ष दोन्ही गटातील लोक एकमेकांच्या कुरघोड्या करतात. तिकडे कळंगुटमध्ये उघडपणे हुक्कांची दुकाने सुरू असताना आमदार डिलायला लोबो ती बंद पाडतात. हे सगळेच प्रकार पाहता नेमके काय चालले आहे, हेच कळत नसल्याची परिस्थिती बनली आहे. भाजप विरोधात असताना आणि रवी नाईक हे गृहमंत्री असताना पोलिस, ड्रग्स माफिया साटेलोटे प्रकरण बरेच गाजले होते. रवी नाईक यांच्या पुत्राचा संबंध ड्रग्स माफियाकडे असल्याचा आरोप करून भाजपने विधानसभेत आणि विधानसभेबाहेरही मोठे आंदोलन केले होते. पोलिस आणि गुन्हेगारांचे कसे साटेलोटे आहेत, हे दर्शवणारे हे प्रकरण होते. कोण ते रॉय नाईक असा सवाल उपस्थित झाला होता. आता रॉय आणि रवी दोघेही भाजपात आहेत आणि पोलिस- गुन्हेगारांच्या साटेलोट्यांची परंपराही भाजपाने पुढे सुरू ठेवली आहे,असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
काँग्रेस भ्रष्टाचारी, अनैतिक, निष्क्रिय आणि काय काय म्हणून आरोप भाजपने केले होते. राज्यात १४ वर्षे आणि केंद्रात १२ वर्षे सत्तेत असेलल्या भाजपने भ्रष्टाचार, अनैतिकता आणि निष्क्रियतेची काँग्रेसचीच परंपराच तर पुढे आणली आहे. सर्वसामान्य लोकांना या गोष्टी गाढून टाकणार असल्याचे आश्वासन दिले होते, परंतु भाजपने तर या गोष्टी अधिक जोमदारपणे पुढे आणल्या आहेत. अशावेळी काँग्रेस आणि भाजप ह्यात फरक काय,असा सवाल केला तर खरोखरच तो फरक सहजपणे सांगता येणार की डोके खाजवावे लागणार याचा विचार गोंयकारांनी करायला हवा. सुलेमान खान या कुख्यात गुन्हेगाराला पलायन करण्यासाठी एका आयआरबीच्या पोलिस शिपायाला ३ कोटी रूपयांची ऑफर दिली आणि त्याने ते काम फत्ते केले,अशी चर्चा आता पोलिसांकडूनच सुरू आहे. अशा ऑफरांना बळी पडणारे लोक जर पोलिस खात्यात काम करत असतील तर तुमचे- आमचे सोडूनच द्या आपले राज्य आणि देश तरी सुरक्षीत राहू शकेल काय, याचा विचार करावा लागेल. आमदार, मंत्र्यांचे हप्ते गोळा करून ते देता देता पोलिस नकळतपणे कधी स्वतःही पात्रांव बनतात हेच त्यांना कळत नाही. पोलिस सेवेत असलेल्यांची मालमत्ताच आता तपासण्याची वेळ आली आहे. आमदार, मंत्र्यांचे हप्ते पोहचवण्यासाठी त्यांना लोकांना कसे पिडावे लागते आणि गुन्हेगारांकडेच कसे पैसे मागावे लागतात, याच्या सुरस कथा एकल्यावर भीतीचा थरपाक उडतो. वास्तव आणि अवास्तव यातील फरक जाणवतो. भ्रष्टाचाराचा थर इतका खालावला आहे की आशेची अपेक्षाच करता येणार नाही. सरकारात काही मंत्र्यांचे खास कलेक्शन एजंट असतात. रेती, चिरे, जुगार तसेच अन्य बेकायदा व्यवसायांचे पैसे गोळा करून ते थेट वरपर्यंत पोहचवले जातात. आता हे वरपर्यंत म्हणजे नेमके कुठे हे विचाराल तर निश्चित सांगता येणार नाही. या वरच्या मजल्याच्या अनेक खोल्या आहेत जिथे त्याची विभागणी होते. सुलेमान खान याचे पलायन ही ह्याच भ्रष्ट सिस्टीमची परिणती आहे हे मात्र नक्की.

  • Related Posts

    ऑर्डर.. ऑर्डर…

    केवळ भावना किंवा आपल्याला काय वाटते याला अर्थ नाही तर ते सिद्ध करण्याची किंवा त्याबाबतचे पुरावे हाती असण्याची गरज आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने सनबर्न महोत्सवाला सशर्त मान्यता दिली…

    तुची डोळे उघड न्यायदेवते…

    हायकोर्टाने शर्ती आणि अटींची बंधने जी सरकार आणि आयोजकांना घातली आहेत त्यांचे खरोखरच पालन होते काय हे न्यायदेवता आता डोळ्यांवरील पट्टी हटविल्यामुळे पाहु शकेल, एवढीच काय ती अपेक्षा सर्वसामान्य नागरिक…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    21/12/2024 e-paper

    21/12/2024 e-paper

    खबरदार ! सनबर्नबद्दल गैर बोलाल तर…

    खबरदार ! सनबर्नबद्दल गैर बोलाल तर…

    ऑर्डर.. ऑर्डर…

    ऑर्डर.. ऑर्डर…

    तुची डोळे उघड न्यायदेवते…

    तुची डोळे उघड न्यायदेवते…

    20/12/2024 e-paper

    20/12/2024 e-paper

    राजेश नाईक यांचा ‘गॉडफादर’ कोण ?

    राजेश नाईक यांचा ‘गॉडफादर’ कोण ?
    error: Content is protected !!