मांद्रेतील कलाकारांनी मुंबईत जिंकली रसिकांची मने

‘तो मी नव्हेच’ नाटकाचे सलग पाच प्रयोग यशस्वी

मुंबई/मांद्रे : श्री गंगाळ देव कला केंद्र, मांद्रे यांनी मुंबई येथे आचार्य अत्रे लिखित आणि पंत प्रभाकर पणशीकर यांनी अजरामर केलेल्या ‘तो मी नव्हेच’ या नाटकाचे सलग पाच प्रयोग सादर करून रसिक प्रेक्षकांची मने जिंकली. या नाटकाचा शेवटचा प्रयोग दादर येथील शिवाजी मंदिर येथे मोठ्या उत्साहात पार पडला.

या प्रयोगाला मांद्रे मतदारसंघाचे आमदार जीत आरोलकर यांनी विशेष उपस्थिती दर्शवून सर्व कलाकारांचे मनापासून कौतुक केले. मांद्रे गावचे सरपंच किरण सावंत हेदेखील उपस्थित होते. मुंबईसारख्या मोठ्या शहरात मांद्रेतील कलाकारांनी पाच यशस्वी प्रयोग सादर केल्याबद्दल त्यांनी कलाकारांचे अभिनंदन केले.

या नाटकाचे दिग्दर्शन जयेंद्रनाथ हळदणकर यांनी केले असून, मार्गदर्शन सौ. जान्हवी पणशीकर यांचे लाभले. निर्माते रावजी कोनाडकर व सुभाष असोलकर, तर सूत्रधार उद्देश दिलीप पेडणेकर होते.

नाटकात अनिल मनोहर असोलकर यांच्यासह प्रियंका गुरव, प्रज्ञा पार्सेकर, सुजाता शेलाडकर, गीताली मातोंडकर, योगिता परब, उत्कर्षा पेडणेकर, विशाखा बर्डे, उत्कर्षा केळकर, अमित पेडणेकर, बाळा नाईक, स्मितल बांदेकर, नारायण सावंत, सुनील पुर्खे, प्रणेश गुरव, भिकाजी असोलकर, श्रीकांत कान्होजी, विजय बर्डे, सिद्धेश गवंडी, अशोक गवंडी, प्रथमेश मांद्रेंकर, आश्वेश गिमोणकर, विशाल असोलकर, सनील पार्सेकर, भास्कर म्हामल, प्रवीण म्हामल, सत्यवान असोलकर, विलासिनी असोलकर, बाब्या म्हामल, एकनाथ सावंत, गोपाळ म्हामल, अंकिता पेडणेकर, प्रदीप जोशी, नवसो परब, श्याम पोखरे, हरीश कोनाडकर, कनक कोनाडकर, राजलक्ष्मी कोनाडकर, सारन्या असोलकर, श्रुती असोलकर, वैष्णव असोलकर, ओम पेडणेकर, तस्मय गुरव, दूर्वा केपकर, देवेंद्र केपकर, दत्ताराम ठाकूर, नित्यानंद पेडणेकर, सर्वेश चोडणकर आणि अनिल तळावणेकर यांनी भूमिका साकारल्या.

माटुंगा येथील प्रयोगाला आचार्य अत्रे यांचे नातू राजेंद्र पै उपस्थित होते. त्यांनी कलाकारांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. तसेच पंत प्रभाकर पणशीकर यांच्यासोबत या नाटकात काम केलेले काही ज्येष्ठ कलाकारही विविध प्रयोगांना उपस्थित राहून कलाकारांचे कौतुक केले.

“इतके मोठे नाटक मुंबईतही सध्या क्वचितच सादर होते; मात्र पेडण्यासारख्या गावातून आलेल्या कलाकारांनी हे शिवधनुष्य यशस्वीरीत्या पेलले,” अशा शब्दांत अनेक रसिकांनी मंडळाचे कौतुक केले. काही ज्येष्ठ प्रेक्षकांनी हे नाटक पुन्हा मुंबईत आणण्याची मागणीही केली.

  • Related Posts

    ‘विकसित गोवा – २०३७’ ची रूपरेषा
    मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे नीती आयोगासमोर सादरीकरण

    नवी दिल्ली, दि. ११ : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गुरुवारी नीती आयोगाच्या ११ व्या गव्हर्निंग कौन्सिल बैठकीत गोव्याच्या मानव संसाधन विकास, शिक्षण, कौशल्य विकास, आरोग्य, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), महिला…

    फातोर्ड्यातील भातशेती जमीन परत द्या

    विजय सरदेसाई यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणीगांवकारी, दि. ११ (प्रतिनिधी) फातोर्डा मतदारसंघाचे आमदार विजय सरदेसाई यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना पत्र लिहून फातोर्डा येथील घाऊक मासळी बाजारालगतची संपादीत भातशेती जमीन शेतकरी…

    You Missed

    ‘विकसित गोवा – २०३७’ ची रूपरेषा
    मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे नीती आयोगासमोर सादरीकरण

    ‘विकसित गोवा – २०३७’ ची रूपरेषा<br>मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे नीती आयोगासमोर सादरीकरण

    11/06/2026 e-paper

    11/06/2026 e-paper

    फातोर्ड्यातील भातशेती जमीन परत द्या

    फातोर्ड्यातील भातशेती जमीन परत द्या

    विकासाचा लेखाजोखा कधी?

    Prabhav Naik Seeks Transparency on Proposed Hydraulic Parking Project in Margao

    Prabhav Naik Seeks Transparency on Proposed Hydraulic Parking Project in Margao

    Konkan Railway Detects Over 61,000 Ticketless and Irregular Travellers in May; Collects ₹3.70 Crore in Penalties

    Konkan Railway Detects Over 61,000 Ticketless and Irregular Travellers in May; Collects ₹3.70 Crore in Penalties