मांद्रेत डोंगर, ताळगांवातील शेते धगधगत!

अग्निशमन दलाच्या जवानांची कसोटी

गांवकारी, दि. ५ (प्रतिनिधी)

पेडणे तालुक्यातील मांद्रे आणि इतर किनारी गावांतील डोंगरांवर अलीकडे आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. दुसरीकडे, ताळगांवमध्ये शेतातील सुके गवत साफ करण्यासाठी आग लावण्याचे प्रकार वाढले आहेत. या दोन्ही घटनांमुळे अग्निशमन दलाच्या जवानांना मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागत आहे.
मांद्रेत डोंगरांवरील आगी आणि स्थानिकांचे नुकसान
मांद्रेतील आस्कावाडा, नाईकवाडा परिसरातील माळरानावर रविवारी रात्री मोठ्या प्रमाणात आग लागली. ही आग सर्वत्र पसरून स्थानिकांच्या काजू बागायतींचे मोठे नुकसान झाले. अग्निशमन दलाच्या प्राथमिक अंदाजानुसार सुमारे २० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
स्थानिक युवकांनी मदत केल्यामुळेच ही आग आटोक्यात आणणे शक्य झाले. मोरजी, मांद्रे आणि किनारी भागांतील डोंगरांवर आगीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने हा प्रकार मानवनिर्मित असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या डोंगर आणि माळरानावरील अनेक जमिनी परप्रांतीयांनी विकत घेतल्या आहेत. त्या साफ करून विकासासाठी तयार करण्याच्या हेतूने मुद्दाम आगी लावल्या जात असल्याचा अंदाज आहे. या आगींमुळे स्थानिक काजू बागायतदारांचे मोठे नुकसान होत आहे.
ताळगांवमध्ये शेतातील आगी आणि त्याचे परिणाम
ताळगांवमध्ये शेतात उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात गवत वाढते, जे सुकल्यानंतर आग लावून साफ केले जाते. हा मोकळा परिसर असल्याने ही आग अनियंत्रितपणे पसरते.
शेतात पाणी असल्याने सुके आणि ओले गवत जळल्यानंतर गडद धूर निर्माण होतो, जो संपूर्ण परिसरात पसरतो. परिणामी शेजारील रहिवाशी वसाहतींतील लोकांना घुसमटण्याचा त्रास होतो. अशा परिस्थितीत आपत्कालीन स्थिती निर्माण होते.
सोमवारीही अशीच घटना घडल्याने अग्निशमन दलाच्या जवानांना मोठ्या कष्टाने ही आग विझवावी लागली. हे प्रकार आता नेहमीचे झाले असून, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांच्या आरोग्यासाठीही धोकादायक ठरू शकतात. त्यामुळे ताळगांव पंचायतीने शेतकऱ्यांना किंवा हे प्रकार करणाऱ्यांना त्वरित ताकीद देण्याची गरज आहे. ताळगांव आणि करंझाळे परिसरात शेतातील आगीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे, असे सिलिल रॉड्रिगीस यांनी सांगितले.

  • Related Posts

    जांबावली श्री दामोदर संस्थानात कुशावती आरतीला भाविकांची भव्य उपस्थिती

    जांबावली – श्री रामनाथ दामोदर संस्थानतर्फे १११ व्या पिंडीकोत्सवा निमीत्त बुधवार २५ मार्च २०२६ रोजी आयोजित कुशावती नदी आरती सोहळ्यास गोवा तसेच कर्नाटक, महाराष्ट्र राज्यातून आलेल्या भक्तांची भव्य उपस्थिती लाभली.…

    नव्या कॅसिनोमुळे मांडवीला धोका

    जीसीझेडएमएच्या निरीक्षणांकडे सरकारचे दुर्लक्ष गांवकारी, दि. २६ (प्रतिनिधी) मांडवी नदीत डेल्टा प्लेझर क्रूझ कंपनी प्रा. लि. यांच्या एम.व्ही. डेल्टीन रॉयल या नव्या भव्य जहाजास परवानगी देण्यासंदर्भात गोवा किनारपट्टी क्षेत्र व्यवस्थापन…

    You Missed

    जांबावली श्री दामोदर संस्थानात कुशावती आरतीला भाविकांची भव्य उपस्थिती

    जांबावली श्री दामोदर संस्थानात कुशावती आरतीला भाविकांची भव्य उपस्थिती

    26/03/2026 e-paper

    26/03/2026 e-paper

    मिराबागवासीयांचा नवा विक्रम, पण

    मिराबागवासीयांचा नवा विक्रम, पण

    नव्या कॅसिनोमुळे मांडवीला धोका

    नव्या कॅसिनोमुळे मांडवीला धोका

    दिगंबर कामत यांचा श्रद्धा व परंपरेवर आघात – प्रभव नायक

    दिगंबर कामत यांचा श्रद्धा व परंपरेवर आघात – प्रभव नायक

    GCZMA Inspection Flags Data Gaps, Raises Environmental Concerns Over New Deltin Vessel in Mandovi

    GCZMA Inspection Flags Data Gaps, Raises Environmental Concerns Over New Deltin Vessel in Mandovi