उद्या युद्धाची रंगीत तालीम!

देशातील २४४ शहरांमध्ये मॉक ड्रिलचे आयोजन

गांवकारी, दि. ७ (प्रतिनिधी)

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झाला आहे. या युद्धसदृश परिस्थितीत लष्करी तसेच नागरी सज्जतेची पडताळणी करण्यासाठी बुधवार, ७ मे रोजी देशभरात नागरी सुरक्षा मॉक ड्रिल आयोजित करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह महसूल, पोलिस, तसेच अन्य नागरी सुरक्षा यंत्रणांच्या अधिकाऱ्यांनी केंद्रीय संरक्षण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली. या बैठकीत मॉक ड्रिलसंबंधी राज्यांना मार्गदर्शन करण्यात आले. मॉक ड्रिलची जबाबदारी दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे आहे. तसेच सर्व नागरी सुरक्षा यंत्रणांना सज्ज ठेवण्यात आले आहे. आज संध्याकाळपर्यंत नेमका आराखडा तयार केला जाईल, तसेच मॉक ड्रिलच्या आयोजन स्थळांवरील स्थानिकांना सतर्क करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी दिली.
उत्तरेत पणजी, दक्षिणेत मुरगांव केंद्र
उत्तर गोव्यात राजधानी पणजी, तर दक्षिण गोव्यात दाबोळी, मुरगांव बंदर आणि वास्को शहरात या मॉक ड्रिलचे आयोजन केले जाणार आहे. युद्धाच्या परिस्थितीत लष्करी व्यवस्थापनासह नागरी व्यवस्थापनाचे मोठे आव्हान सरकारी यंत्रणांसमोर असते. युद्ध झाल्यास संभाव्य परिस्थिती आणि आवश्यक काळजी तसेच सतर्कतेविषयी जनतेला माहिती मिळावी या उद्देशाने हा सराव आयोजित केला जात आहे.
१९७१ नंतर पहिल्यांदाच
१९७१ नंतर प्रथमच देशव्यापी नागरी सुरक्षा मॉक ड्रिल आयोजित करण्यात येत आहे. भारत-पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारचे सराव यापूर्वी करण्यात आले होते. या मॉक ड्रिलमध्ये २४४ शहरांमध्ये युद्ध परिस्थितीची तयारी केली जाणार आहे.

नागरी मॉक ड्रिल म्हणजे काय?

नागरी मॉक ड्रिल म्हणजे आपत्ती किंवा आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांची आणि सरकारी यंत्रणांची तयारी तपासण्यासाठी केलेला सराव. यात युद्ध, नैसर्गिक आपत्ती, दहशतवादी हल्ला किंवा अन्य संकट परिस्थितीत नागरी सुरक्षेच्या उपाययोजना कशा कार्यान्वित होतील, याची पडताळणी केली जाते.

यामध्ये पोलिस, अग्निशमन दल, आरोग्य सेवा, नागरी प्रशासन आणि स्थानिक नागरिकांचा सहभाग असतो. आपत्ती व्यवस्थापन, बचाव कार्य, मदत सेवा आणि सुरक्षेचे उपाय यांचा आढावा घेतला जातो. यामुळे नागरिकांना अशा परिस्थितीत काय करावे आणि स्वतःचे संरक्षण कसे करावे याची समज मिळते.

युद्धजन्य परिस्थितीत नागरी मॉक ड्रिल खास करून हवाई हल्ल्यापासून बचाव, आपत्कालीन मदत कार्य आणि अत्यावश्यक सेवांचे संचालन तपासण्यासाठी उपयोगी पडते.

  • Related Posts

    बांबोळी ”ब्लॅकस्पॉट” सरकारनिर्मित

    बिल्डरला मदत करण्यासाठी महामार्गात बदल गांवकारी, दि. ६ (प्रतिनिधी)बांबोळी येथील राष्ट्रीय महामार्ग-६६ वर आतापर्यंत अनेकांचे प्राण गेले आहेत. या महामार्गाच्या मूळ आराखड्यात गोवा सार्वजनिक बांधकाम खात्याने एका बिल्डरला मदत करण्याच्या…

    राजकीय दबावाने पोलिस खाते कोलमडले…

    आरटीआय कार्यकर्ते सुदीप ताम्हणकर यांचा पंचनामा गांवकारी, दि. ५ (प्रतिनिधी) पोलिस खात्यावर प्रचंड प्रमाणात राजकीय दबाव वाढला आहे. जनतेची सेवा करण्याऐवजी आपल्या राजकीय बॉसांच्या आदेशांचे पालन करण्याकडे पोलिस अधिकाऱ्यांचा कल…

    You Missed

    पोलीस निष्क्रियतेवर ‘रासुका’ची मात्रा!

    पोलीस निष्क्रियतेवर ‘रासुका’ची मात्रा!

    बांबोळी ”ब्लॅकस्पॉट” सरकारनिर्मित

    बांबोळी ”ब्लॅकस्पॉट” सरकारनिर्मित

    06/11/2025 e-paper

    05/11/2025 e-paper

    राजकीय दबावाने पोलिस खाते कोलमडले…

    राजकीय दबावाने पोलिस खाते कोलमडले…

    वोट चोरी : लोकशाहीलाच सुरूंग

    वोट चोरी : लोकशाहीलाच सुरूंग
    error: Content is protected !!