३९ (ए) चे भूत मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात

८०, ९२६ चौ. मीटर झोन बदलासाठी शिफारस



गांवकारी, दि. २४ (प्रतिनिधी)

नगर नियोजन कायद्यातील वादग्रस्त कलम ३९(ए) अंतर्गत आता खुद्द मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या साखळी मतदारसंघातील ८०,९२६ चौ. मीटर जमीन झोन बदलासाठी शिफारस करण्यात आली आहे. या कायद्याविरोधात सुरू असलेल्या आंदोलनांना चिथावणी देणारा हा प्रकार ठरल्याने मुख्यमंत्री सावंत टीकेचे लक्ष्य ठरण्याची शक्यता आहे.
सामाजिक कार्यकर्ते स्वप्नेश शेर्लेकर यांनी यासंबंधी माहिती दिली. नगर नियोजन खात्याने कलम ३९(ए) अंतर्गत जमीन क्षेत्र बदलून ते बांधकामासाठी खुले करण्याचा सपाटा सुरू केला आहे. आता हे प्रकरण मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात पोहोचले आहे. प्रादेशिक आराखडा २०२१ मध्ये नैसर्गिक आच्छादन, अविकसित क्षेत्र, डोंगर व स्मशानभूमी म्हणून नोंद असलेली जमीन सरसकट सेटलमेंट क्षेत्र म्हणून घोषित करण्याची शिफारस अधिसूचनेत करण्यात आली आहे. मुख्यमंत्री या प्रकरणाबाबत अनभिज्ञ आहेत असे मानणे मुर्खपणाचे ठरेल, असा टोला शेर्लेकर यांनी लगावला.
खाण खंदकाजवळची जमीन
साखळीतील सरकारी सामाजिक आरोग्य केंद्राच्या मागे दक्षिण म्हावळिंगे येथे ही प्रस्तावित जमीन आहे. ती रविंद्र सुखटणकर यांच्या नावे असून स्थानिकांच्या माहितीनुसार या जमिनीत कुळांची नोंदही आहे. २०२२ मध्ये सेटलाइट इमेजद्वारे केलेल्या तपासणीत येथे घनदाट जंगल व हिरवळ दिसत होती; मात्र आता मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल झाल्याचे स्पष्टपणे दिसते, असे शेर्लेकर यांनी सांगितले.
राज्यात कोणते उद्योग सुरू आहेत हे या प्रकरणातून स्पष्ट होते. राज्याचे प्रमुख असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघातच असे प्रकार सुरू असतील तर इतर भागांचा विचारही करवत नाही, असे ते म्हणाले. या प्रकरणातून नगर नियोजन खात्याच्या कटात मुख्यमंत्री व सरकार सहभागी असल्याचे अधोरेखित होत असल्याची टीकाही त्यांनी केली.

  • Related Posts

    Viriato Raises Land-Losers’ Rights at Konkan Railway Meeting

    South Goa MP Capt. Viriato Fernandes on Monday strongly raised the issue of families who surrendered their land for railway projects, demanding that Konkan Railway give them priority in manpower recruitment as well as allotment of shops at railway stations.

    गडकरींना काळे झेंडे दाखवणार

    खासगी बस वाहतूकदारांची सरकारला नोटीसगांवकारी, दि. २४ (प्रतिनिधी) : राज्यातील खासगी बस व्यावसायिकांच्या दीर्घकाळ प्रलंबित मागण्या सात दिवसांत सोडवाव्यात; अन्यथा गोव्यात येणारे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांना…

    You Missed

    Viriato Raises Land-Losers’ Rights at Konkan Railway Meeting

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 24, 2026
    • 9 views
    Viriato Raises Land-Losers’ Rights at Konkan Railway Meeting

    24/08/2026 e-paper

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 24, 2026
    • 23 views
    24/08/2026 e-paper

    24/08/2026 e-paper

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 24, 2026
    • 16 views
    24/08/2026 e-paper

    कारापूरवासीयांची सुटका करा

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 24, 2026
    • 19 views
    कारापूरवासीयांची सुटका करा

    ‘मेटा’ची दिलगिरी; एक गाजवलेली, एक दडपलेली

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 24, 2026
    • 18 views
    ‘मेटा’ची दिलगिरी; एक गाजवलेली, एक दडपलेली

    गडकरींना काळे झेंडे दाखवणार

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 24, 2026
    • 18 views
    गडकरींना काळे झेंडे दाखवणार