विश्वजीतबाबांचा रुद्रावतार!

जिल्हा इस्पितळे, उपजिल्हा इस्पितळे तसेच सामाजिक आरोग्य केंद्र आणि प्राथमिक आरोग्य केंद्र यांचे तंत्रज्ञानाच्या माध्यमाने एक जाळे विणून, योग्य संवाद आणि समन्वयाच्या आधारे एक प्रभावी प्रणाली निर्माण करणे शक्य आहे.

आज आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी गोवा मेडिकल कॉलेजला अचानक भेट दिली. तिथे कॅज्युअल्टी विभागातील आरोग्य अधिकाऱ्याकडून एका रूग्णाला मिळालेल्या वागणुकीबद्दल त्यांनी रुद्रावतार धारण केला आणि संबंधित डॉक्टरला निलंबितही केले. डॉक्टर किंवा इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर ताण असतो हे खरे आहे, पण रुग्णांशी चांगले वागणे आणि त्यांना योग्य मार्गदर्शन करणे हे त्यांचे कर्तव्य आहे, असे विश्वजीत राणे यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या कारवाईचे अनेकांनी स्वागत केले तर अनेकांनी त्यांच्या मग्रुर वागणूकीबाबत नाराजी व्यक्त केली. परंतु हे प्रकार जर संपूष्टात यायचे असतील तर या विषयाच्या मुळाशी जाऊन हा विषय कायमस्वरूपी सोडवण्यासाठी गोमेकॉच्या व्यवस्थापनात सुधारणा घडवणे अत्यावश्यक आहे.
गोवा मेडिकल कॉलेज हा गोमंतकीयांसाठी एक महत्त्वाचा आधार आहे. केवळ गोमंतकीयच नव्हे तर शेजारील महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्हा आणि कर्नाटकातील कारवार जिल्हाही वैद्यकीय सुविधांसाठी गोमेकॉवर अवलंबून आहेत. मोफत उपचार, औषधे, शस्त्रक्रिया आणि इतर वैद्यकीय सेवा यामुळे गोमेकॉ सर्वसामान्यांसाठी एक महत्त्वाचा आधारवड ठरला आहे.
आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांच्या नेतृत्वाखाली हृदयशस्त्रक्रिया विभाग आणि अनेक अत्याधुनिक वैद्यकीय सेवा सुरू झाल्यामुळे गोमेकॉ आता केवळ सर्वसामान्यांचेच नव्हे तर विशेष रुग्णांचेही एक महत्त्वाचे उपचार केंद्र बनले आहे. आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांच्यावर कारभाराच्या चुकांबाबत टीका होते, परंतु त्यांनी गोमेकॉमध्ये अनेक सकारात्मक सुधारणा घडवून आणल्या आहेत, हे मान्य करावे लागेल. जिल्हा इस्पितळे, उपजिल्हा इस्पितळे आणि सामाजिक आरोग्य केंद्रे यामध्ये सुधारणा करण्यासाठी त्यांना सरकारची, विशेषतः मुख्यमंत्र्यांची सहकार्याची गरज आहे. ओपीडी व्यवस्थापन हा सर्वात महत्त्वाचा विषय आहे. पहाटे चार वाजता रुग्ण ओपीडीमध्ये नंबर मिळवण्यासाठी रांगेत उभे असतात, ही प्रथा बदलण्याची गरज आहे. ऑनलाइन ओपीडी व्यवस्था किंवा तंत्रज्ञानाचा वापर करून फोनद्वारे भेटीचे नियोजन करण्याची नवी प्रणाली आणल्यास रुग्ण आणि डॉक्टर दोघांना फायदा होईल. तसेच, रुग्णांना त्यांच्या जवळच्या सामाजिक आरोग्य केंद्रात प्राथमिक तपासणी करून आवश्यक असल्यास गोमेकॉत पाठवता येईल, यामुळे रुग्णांचे हेलपाटे आणि वेळेचा अपव्यय टाळता येईल.
तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून गोमेकॉ आणि जिल्हा इस्पितळांचे व्यवस्थापन अधिक प्रभावी आणि सुलभ करता येईल. यासाठी आयटी क्षेत्रातील व्यावसायिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, तसेच रुग्ण, त्यांच्या नातेवाईक आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांवरचा ताण कमी होऊन आरोग्यसेवेचा योग्य लाभ मिळेल.

  • Related Posts

    शेतकऱ्यांच्या संकटांकडे डोळेझाक ?

    महाराष्ट्रात १८ टक्के पावसाच्या तुटीच्या पार्श्वभूमीवर ३५८ पैकी २६५ तालुक्यांत दुष्काळी स्थिती जाहीर करण्यात आली. मग गोवा नेमकी कशाची वाट पाहत आहे? केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंग चौहान २ ऑक्टोबर रोजी गोव्यातील…

    जमीन हडप; जाळे किती खोल ?

    जमीन खरेदी-विक्री करणाऱ्याची चौकशी करून उपयोग नाही. त्या व्यवहाराला आवश्यक कागदपत्रे, परवानग्या किंवा प्रशासकीय मान्यता कोणी आणि कोणत्या आधारावर दिली, हेही तपासले गेले पाहिजे. गोव्यातील जमीन हडप प्रकरणांची व्याप्ती पाहता…

    You Missed

    गोव्याच्या जमिनींच्या मुळावर उठलेल्यांना सत्तेतून हद्दपार करा : काँग्रेस

    • By Gaonkaari
    • सप्टेंबर 30, 2026
    • 11 views
    गोव्याच्या जमिनींच्या मुळावर उठलेल्यांना सत्तेतून हद्दपार करा : काँग्रेस

    30/09/2026 e-paper

    • By Gaonkaari
    • सप्टेंबर 30, 2026
    • 22 views
    30/09/2026 e-paper

    राजकीय आरक्षणाचा सातत्याने पाठपुरावा

    • By Gaonkaari
    • सप्टेंबर 30, 2026
    • 22 views
    राजकीय आरक्षणाचा सातत्याने पाठपुरावा

    शेतकऱ्यांच्या संकटांकडे डोळेझाक ?

    • By Gaonkaari
    • सप्टेंबर 30, 2026
    • 26 views
    शेतकऱ्यांच्या संकटांकडे डोळेझाक ?

    रमेश तवडकर यांना हायकोर्टाची नोटीस

    • By Gaonkaari
    • सप्टेंबर 30, 2026
    • 28 views
    रमेश तवडकर यांना हायकोर्टाची नोटीस

    Yash Fadte Clinches PSA Copa Federació 2026 Title in Spain

    • By Gaonkaari
    • सप्टेंबर 30, 2026
    • 19 views
    Yash Fadte Clinches PSA Copa Federació 2026 Title in Spain