सरकारी यंत्रणांवर कुणाची दहशत ?

बनावट विल प्रकरणाला वेगळेच वळण

गांवकारी, दि. १६ (प्रतिनिधी)

दाडाचीवाडी-धारगळ येथील जमिनीचे बनावट विल तयार करून सरकारी यंत्रणांच्या मदतीने ती जमीन स्वतःच्या नावे करून घेतल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. मात्र, सरकारी यंत्रणा प्रचंड राजकीय दबावाखाली कार्यरत असल्याचे स्पष्ट होत आहे. पेडणे मामलेदारांनी पीडित कुटुंबाकडूनच बनावट विलच्या आधारे केलेले म्यूटेशन रद्द करण्यासाठी ४८ हजार रुपये शुल्क आकारले, ज्यामुळे प्रकरणाला वेगळीच कलाटणी मिळाली आहे.
म्यूटेशन रद्द करण्यातील अडथळे
पेडणेचे उपजिल्हाधिकारी शिवप्रसाद नाईक यांनी हे विल बनावट असल्याचे निष्पन्न करून त्याच्या आधारे केलेले म्यूटेशन बेकायदेशीर ठरवले. त्यांनी ते रद्द करण्याचा निर्णय घेतला असताना संशयित सुभाष कानुळकर याने अतिरिक्त जिल्हाधिकारीकडून स्थगिती मिळवली. ही स्थगिती नवनियुक्त अतिरिक्त जिल्हाधिकारी गुरुदास देसाई यांनी अखेर उठवली. तरीही पेडणे मामलेदार म्यूटेशन रद्द करण्यास टाळाटाळ करत असल्याची पीडित कुटुंबीयांची नाराजी आहे.
अन्यायकारक शुल्क आकारणी
सुभाष कानुळकर याने स्व. शांताराम कानुळकर यांच्या नावे बनावट विल तयार करून २०१३ मध्ये तत्कालीन पेडणे मामलेदार चंद्रकांत शेटकर यांच्याद्वारे म्यूटेशन प्रक्रिया पूर्ण केली. हा बनावट प्रकार २०२३ मध्ये उघडकीस आला. त्यानंतर पीडित कुटुंबाने पाठपुरावा केल्यानंतर बनावट विलची सत्यता स्पष्ट झाली. तरीही त्याच विलच्या आधारावर झालेले म्यूटेशन रद्द करण्यासाठी पेडणे मामलेदारांनी पीडित कुटुंबाकडून शुल्क आकारले आहे. त्याशिवाय म्यूटेशन ऑनलाईन प्रक्रियेस मंजुरी मिळणार नाही, असे सांगण्यात आले.
गुन्हे शाखेचा हस्तक्षेप आणि चालढकल
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्तक्षेपानंतर हे प्रकरण गुन्हे शाखेकडे सुपूर्त करण्यात आले. मात्र, दोन आठवडे उलटूनही कोणतीही कारवाई झाल्याचे दिसून आले नाही. संशयित बिनधास्त फिरत असून “आपले कुणी काहीच बिघडवू शकत नाही,” असे म्हणत असल्याची चर्चा आहे. गुन्हे शाखेने संशयिताला ताब्यात घेऊन प्रकरणाचा छडा लावण्याऐवजी अजूनही अभ्यासच सुरू ठेवला आहे.

  • Related Posts

    Yash Fadte Goes Down Fighting in PSA Aramis Club Open Quarterfinals

    Indian squash player Yash Fadte reached the quarterfinals of the PSA Aramis Club Open in Belgium, demonstrating resilience in a grueling five-game battle against Scottish No. 1 John Meehan, following a remarkable comeback victory in the pre-quarterfinals.

    प्रभव नायकांकडून मल्टिलेव्हल पार्किंग प्रकल्पाचा‘अपयशाचा ११वा वर्धापनदिन’ पाळला

    मडगावातील प्रस्तावित बहुमजली पार्किंग प्रकल्पाच्या पायाभरणीला ११ वर्षे पूर्ण झाल्याचे निमित्त साधत ‘मडगांवचो आवाज’चे युवा नेते प्रभव नायक यांनी अनोख्या पद्धतीने निषेध नोंदविला. कोसळलेल्या शिलान्यास फलकाला पुष्पहार अर्पण करून त्यांनी या प्रकल्पाला ‘अपयशाचे स्मारक’ असे संबोधले.

    You Missed

    Yash Fadte Goes Down Fighting in PSA Aramis Club Open Quarterfinals

    • By Gaonkaari
    • सप्टेंबर 18, 2026
    • 13 views
    Yash Fadte Goes Down Fighting in PSA Aramis Club Open Quarterfinals

    प्रभव नायकांकडून मल्टिलेव्हल पार्किंग प्रकल्पाचा‘अपयशाचा ११वा वर्धापनदिन’ पाळला

    • By Gaonkaari
    • सप्टेंबर 18, 2026
    • 11 views
    प्रभव नायकांकडून मल्टिलेव्हल पार्किंग प्रकल्पाचा‘अपयशाचा ११वा वर्धापनदिन’ पाळला

    1526–2026: 500 Years of the Foral

    • By Gaonkaari
    • सप्टेंबर 16, 2026
    • 20 views
    1526–2026: 500 Years of the Foral

    गणा धाव रे… गोव्याला पाव रे…: गोमंतकीय भूमीपुत्राचे गणरायाला भावनिक साकडे

    • By Gaonkaari
    • सप्टेंबर 14, 2026
    • 31 views
    गणा धाव रे… गोव्याला पाव रे…: गोमंतकीय भूमीपुत्राचे गणरायाला भावनिक साकडे

    गणा धाव रे… गोव्याला पाव रे…

    • By Gaonkaari
    • सप्टेंबर 14, 2026
    • 27 views
    गणा धाव रे… गोव्याला पाव रे…

    Kejriwal’s Goa Visit Sparks Political Buzz; Major Announcement Today at 3 PM

    • By Gaonkaari
    • सप्टेंबर 12, 2026
    • 35 views
    Kejriwal’s Goa Visit Sparks Political Buzz; Major Announcement Today at 3 PM