मुख्यमंत्री, जीत आरोलकरांच्या मैत्रिची पेडण्यात खमंग चर्चा

राज्याचे मुख्यमंत्री जिल्हा पंचायत निवडणूकीत ५० मतदारसंघांपैकी पेडण्यातील चार मतदारसंघांवर जी नजर ठेवून आहेत आणि वारंवार बैठका, भेटीगाठी घेऊन वावरत आहेत ते पाहता मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांच्या जिगरी मैत्रिची खमंग चर्चा सुरू झाली आहे. मगोचे आमदार आणि पहिल्यांदाच निवडून आलेल्या जीत आरोलकर यांनी मुख्यमंत्र्यांवर पाडलेली छाप याचे नेमके रहस्य काय, यावरून पेडणे तालुक्याच्या नाकानाक्यावर आणि चहाच्या गाड्यांवर जोरदार चर्चा सुरू आहे.
मांद्रे मतदारसंघात मोरजी आणि हरमल हे दोन जिल्हा पंचायत मतदारसंघ येतात. मोरजीत मगोतर्फे तारा हडफडकर या उमेदवार आहेत तर हरमलात भाजपतर्फे मनिषा कोरखणकर यांनी उमेदवारी दाखल केली आहे. या दोघांच्या विजयासाठी जीत आरोलकर यांनी जीवाची बाजी लावली आहे. मनिषा कोरखणकर यांच्यासाठी माजी आमदार दयानंद सोपटे हे देखील सक्रीयपणे काम करताना दिसतात. कोरखणकर या सोपटेंच्या समर्थक असल्याने त्यांचा विजय जीत आरोलकर यांच्यासाठी अडचणीचा तर ठरणार नाही,असे जीत आरोलकरांच्या काही समर्थकांना वाटते परंतु इथे मुख्यमंत्र्यांनी त्यांना आश्वस्त केले आहे की जीत आरोलकरांनी भिवपाची गरज ना.
तारा हडफडकर या जीत आरोलकरांच्या उमेदवार आहेत आणि तिथे मगोतर्फे त्या निवडणूक लढवत आहेत. जीत आरोलकर यांचे राजकीय प्रतिस्पर्धी त्यांच्या या उमेदवाराच्या पराभवासाठी सक्रीय बनले आहेत. त्यांचे छुपे काम सुरू आहे. तारा हडफडकर यांचा पराभव झाल्यास जीत आरोलकर यांचा अश्वमेध आपोआप रोखता येणे शक्य आहे. जीत आरोलकर यांना याची कल्पना असल्यामुळेच त्यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे सहाय्य घेऊन मोरजी मतदारसंघातील तारा हडफडकर यांची बाजू भक्कम करण्यासाठी जोरदार प्रयत्न चालवले आहेत.
तोरसे मतदारसंघात मुख्यमंत्र्यांचा संचार
पेडणे मतदारसंघातील धारगळ आणि तोरसे हे दोन मतदारसंघ आहेत. धारगळीत भाजपची उमेदवारी पीडब्लूडीचे कंत्राटदार श्रीकृष्णा उर्फ नानू हरमलकर यांना मिळाली आहे. वास्तविक ही उमेदवार धारगळचे माजी सरपंच भूषण नाईक यांना निश्चित होती परंतु या उमेदवारीत जीत आरोलकर यांनी प्रमुख भूमीका वठवल्याची खबर आहे. दुसरीकडे तोरसे मतदारसंघ ओबीसीसाठी राखीव झाल्याने तिथे उमेदवार मिळणे भाजपसाठी कठीण बनले. अशा परिस्थितीती थिवी माडेल येथे राज्यसभा खासदार आणि भाजपचे माजी अध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांचे शेजारी आणि दोन महिन्यांपूर्वीच सेवानिवृत्त झालेले शिक्षक राघोबा कांबळी यांना उमेदवारी दिली आहे. हा उमेदवार पूर्णपणे नवखा असून त्यांना कुणीही ओळखत नसल्यामुळे पेडणेचे आमदार प्रविण आर्लेकर यांच्यासमोर पेचप्रसंग निर्माण झाला आहे. पेडणेचे आमदार प्रविण आर्लेकर यांच्याप्रती मतदारसंघात तीव्र नाराजी आहे. त्यात तोरसे जिल्हा पंचायत मतदारसंघात मोपा विमानतळ आणि मोपा पीडीए परिसर येत असल्यामुळे तिथे अनेकांचे हीत लपले आहे. प्रविण आर्लेकर यांच्याकडे तोरसेत जिल्हा पंचायत उमेदवार निवडून आणणे शक्य होणार नाही, याची कल्पना आलेल्या मुख्यमंत्र्यांनी जीत आरोलकर यांना ही जबाबदारी दिल्याची खबर आहे. जीत आरोलकर यांनी टॅक्सी व्यवसायीक तथा अन्य युवकांना तोरसेतील भाजप उमेदवाराच्या विजयासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. एवढे करूनही मिशन फॉर लोकलचे अपक्ष उमेदवार गजानन गडेकर हे प्रचारात आघाडीवर असल्याने आणि त्यांना सर्व थरांतून पाठींबा मिळत असल्याने आता धमकी सत्र सुरू झाले आहे. मोपा विमानतळावरील काउंटर बंद करणार किंवा ट्रॅक्सी व्यवसायीकांविरोधात दाखल झालेल्या तक्रारींमुळे अडचणी वाढणार अशा गोष्टी सांगून या युवकांना घाबरवले जात आहे. या व्यतिरीक्त प्रत्येक महिला मंडळांना प्रत्येकी पाच हजार रूपयांची पाकिटे वाटण्याचे काम जोरात सुरू आहे. तोरसे मतदारसंघासाठीच आत्तापर्यंत तीन ते चार बैठका खुद्द मुख्यमंत्री डॉ. सावंत घेत असल्यामुळे या मतदारसंघात नक्कीच काहीतरी घबाड लपले आहे,अशी चर्चा आता रंगली आहे. प्रविण आर्लेकर यांना केवळ फोटोसाठी सोबत घेतले जात आहे तर प्रत्यक्षात पेडणे तालुक्याची भिस्तच मुख्यमंत्र्यांनी जीत आरोलकर यांच्यावर सोपवल्यामुळे मुळ भाजपवासीही काहीसे नाराज आहेत. मुख्यमंत्री आणि जीत आरोलकर यांची जोडगोळी पेडणेवर कब्जा करतात की पेडणेकर त्यांना अद्दल घडवतात हे २२ डिसेंबर रोजीच्या मतमोजणीतून स्पष्ट होणार

  • शाणो परब पेडणेकर,

तोरसे- पेडणे

  • Related Posts

    Rent-a-Cab Operators Urge Goa Govt to Reverse 12-Year Permit Renewal Decision

    Porvorim, August 5: RTI activist Sudip Narayan Tamankar has submitted a representation to the Director of Transport, Government of Goa, urging the State Transport Authority (STA) to reconsider and withdraw…

    AAP Alleges Police Intimidation at Karapur Protest, Demands CM Meet Agitators

    Panaji, August 5: The Aam Aadmi Party (AAP) on Tuesday accused the BJP-led Goa Government of using police deployment to intimidate villagers protesting against the proposed Karapur mega project and…

    You Missed

    सरकारी कंत्राटी कामगार अस्वस्थ

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 7, 2026
    • 18 views
    सरकारी कंत्राटी कामगार अस्वस्थ

    न्यायाचा विजय की राजकीय डावपेच?

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 7, 2026
    • 9 views
    न्यायाचा विजय की राजकीय डावपेच?

    RTI documents reveal Land Grabbing Commission held three persons responsible in Dhargal land case

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 7, 2026
    • 15 views
    RTI documents reveal Land Grabbing Commission held three persons responsible in Dhargal land case

    Former GPCC President Amit Patkar, Goa Forward Oppose Proposed FCRA Amendments; Seek Protection for Goa’s Charitable Institutions

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 6, 2026
    • 17 views
    Former GPCC President Amit Patkar, Goa Forward Oppose Proposed FCRA Amendments; Seek Protection for Goa’s Charitable Institutions

    Centre Notifies Goa ST Political Reservation Act; Process Begins for Reservation of Four Assembly Constituencies

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 6, 2026
    • 18 views
    Centre Notifies Goa ST Political Reservation Act; Process Begins for Reservation of Four Assembly Constituencies

    शिक्षकांचा मानसिक ताण… शेवटी ऐकणार तरी कोण?

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 6, 2026
    • 19 views
    शिक्षकांचा मानसिक ताण… शेवटी ऐकणार तरी कोण?