सचिवांकडून सरपंचानाच कारणे दाखवा !

चिखलीच रंगले राजकीय नाट्य
——————————————————————————
गांवकारी,दि. ५ (प्रतिनिधी)
चिखली पंचायतीचे सरपंच कमलप्रसाद यादव यांना त्यांच्याच पंचायत सचिवांकडून कारणे दाखवा नोटीस बजावल्याने खळबळ उडाली आहे. दाबोळी येथील सर्व्हे क्रमांक ३/१, ५/१ व ७/१ मधील कथित बेकायदा बांधकाम आणि विनापरवाना व्यावसायिक व्यवहारांप्रकरणी ही नोटीस बजावण्यात आली आहे. कमलाप्रसाद यादव यांनी विधानसभा निवडणूक लढविण्याचे संकेत दिल्यानंतर चिखलीत हे राजकीय नाट्य रंगल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

पंचायत संचालनालयाच्या २९ ऑक्टोबर २०२६ च्या निर्देशांचा संदर्भ देत गोवा पंचायत राज कायद्याच्या कलम ७२-अ अंतर्गत ही नोटीस जारी करण्यात आली. संबंधित जागेवर बहुमजली इमारत तसेच सुमारे ९५ दुकाने व निवासी खोल्यांचे बांधकाम करण्यात आल्याचा उल्लेख नोटिशीत आहे. पंचायत परवान्याशिवाय व्यावसायिक व्यवहार सुरू असून परवाना शुल्क, पायाभूत सुविधा कर व घरपट्टी थकीत असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

विशेष म्हणजे, यापूर्वी या व्यावसायिक व्यवहारांवर पंचायतीने कोणतीही कारवाई केली नसल्याचे नोटिशीत म्हटले आहे. सात दिवसांत समाधानकारक खुलासा न केल्यास उपलब्ध नोंदींच्या आधारे निर्णय घेऊन संबंधित जागा सील करण्याची कारवाई होऊ शकते. स्वतःच्या सरपंचालाच पंचायत सचिवाने नोटीस बजावल्याने या प्रकरणाची चर्चा सुरू झाली आहे.
मॉविन गुदीन्होंचा हात असल्याचा संशय
चिखलीचे सरपंच कमलाप्रसाद यादव यांनी दाबोळी मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचे संकेत दिले आहेत. त्यांच्या या घोषणेमुळे पंचायतमंत्री मॉविन गुदीन्हो अस्वस्थ बनले आहेत. चिखली पंचायतीच्या उपसरपंचपदी गुदीन्हो यांच्या समर्थक एश्वर्या कोरगांवकर असून पंचायत सचिवांना पुढे करून ही नोटीस बजावण्यात आल्याचे सांगितले जाते. कारणे दाखवा नोटीशीसाठी पंचायत मंडळाचा ठराव गरजेचा असतो. तो ठराव घेऊन ही नोटीस जारी केली आहे की काय, याचीही चर्चा सुरू आहे.

  • Related Posts

    राज्याच्या ‘केअर्स’ समितीवर मांगिरीश, सुनया यांची नियुक्ती

    गांवकारी, दि. ४ (प्रतिनिधी) राज्यातील शाळांमध्ये कोडिंग आणि रोबोटिक्स शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘कोडिंग अँड रोबोटिक्स एज्युकेशन इन स्कूल्स’ (केअर्स) योजनेच्या पुनर्गठित राज्यस्तरीय समितीवर उमंग ग्रुपचे मुख्य कार्यकारी अधिकारी…

    भोमा महामार्ग वाद प्रकरणी उच्च न्यायालयाकडून मध्यस्थाची नियुक्ती

    गांवकारी, ४ (प्रतिनिधी) : भोमा येथील प्रस्तावित राष्ट्रीय महामार्गाच्या आराखड्यावरून निर्माण झालेला वाद सोडविण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने ज्येष्ठ वकील सुबोध कंटक यांची मध्यस्थ म्हणून नियुक्ती केली आहे. महामार्ग…

    You Missed

    Casino Advertisements Across Goa Violate Gambling Law; Justice Rebello Demands Immediate Police Action

    • By Gaonkaari
    • नोव्हेंबर 5, 2026
    • 10 views
    Casino Advertisements Across Goa Violate Gambling Law; Justice Rebello Demands Immediate Police Action

    05/11/2026 e-paper

    • By Gaonkaari
    • नोव्हेंबर 5, 2026
    • 12 views
    05/11/2026 e-paper

    गोवा `सीईओं`ना हायकोर्टाचा दणका !

    • By Gaonkaari
    • नोव्हेंबर 5, 2026
    • 19 views
    गोवा `सीईओं`ना हायकोर्टाचा दणका !

    सचिवांकडून सरपंचानाच कारणे दाखवा !

    • By Gaonkaari
    • नोव्हेंबर 5, 2026
    • 26 views
    सचिवांकडून सरपंचानाच कारणे दाखवा !

    अहंकारी नेमका कोण ?

    • By Gaonkaari
    • नोव्हेंबर 5, 2026
    • 22 views
    अहंकारी नेमका कोण ?

    गोवा मराठी पत्रकार संघाच्या नूतन कार्यकारिणीचे अधिकारग्रहण

    • By Gaonkaari
    • नोव्हेंबर 5, 2026
    • 31 views
    गोवा मराठी पत्रकार संघाच्या नूतन कार्यकारिणीचे अधिकारग्रहण