भाजपला यश पण सबूरीचा सल्ला

विरोधकांना एकत्र येण्याचा स्पष्ट कौल

गांवकारी, दि.२२ (प्रतिनिधी)

राज्यातील ५० जिल्हा पंचायत मतदारसंघांसाठी झालेल्या निवडणुकीत ग्रामीण भागातील जनतेने भाजप आघाडीलाच पसंती दिली आहे. हे करत असतानाच मतदारांनी दिलेला कौल अत्यंत सूचक ठरला असून भाजपने वेळीच चुकांची सुधारणा केली नाही, तर विधानसभेला धडगत नाही, असेही या निकालांतून स्पष्ट झाले आहे.
गत २०२० च्या जिल्हा पंचायत निवडणुकीत ३३ जागांवर विजय मिळवलेल्या भाजपला पाच वर्षांनंतर २९ जागांवरच समाधान मानावे लागले. भाजप युतीतील घटक मगो पक्षाने आपले तीनही उमेदवार निवडून आणल्याने ५० पैकी ३२ जागांवर सरकारने यश मिळवले आहे.
उत्तर गोव्यात भाजपने चांगले यश मिळवले असले तरी दक्षिण गोव्यात मात्र पक्षाला अपेक्षित यश मिळू शकले नाही. मागील निवडणुकीपेक्षा काँग्रेस पक्षाने यावेळी चांगली कामगिरी करत सासष्टी तालुक्यातील आपले प्राबल्य अबाधित ठेवले आहे. सासष्टीच्या सर्व ८ जागांवर काँग्रेसने यश मिळवले आहे. २०२० च्या जिल्हा पंचायतीत केवळ ४ जागांवर विजयी ठरलेल्या काँग्रेसने ९ ठिकाणी यश मिळवून आपली लाज वाचवली आहे.
यावेळी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी सासष्टीतील काँग्रेसची प्रतिष्ठा जपण्यात यश मिळवले. काँग्रेसच्या आमदारांनी आपापले मतदारसंघ सांभाळले. आरजीपीचे आमदार विरेश बोरकर यांनी सांतआंद्रेचा आपला गड राखून दोन्ही जागा मिळवण्यात यश मिळवले. गोवा फॉरवर्ड आणि आप पक्षाला फक्त एकाच ठिकाणी यश मिळाले आहे, तर चार ठिकाणी अपक्ष उमेदवारांनी विजय प्राप्त केला.
आपचे आमदार कॅप्टन वेन्झी व्हिएगश यांना बाणावलीत तर वेळ्ळीचे आमदार क्रुझ सिल्वा यांना वेळ्ळीत धक्का देण्यात काँग्रेसने यश मिळवले आहे. एकंदरीत विश्वजीत राणे, बाबुश मोन्सेरात, रोहन खंवटे, मायकल लोबो, मॉविन गुदीन्हो यांच्यासह मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आपापले गड राखून आपली प्रतिष्ठा सांभाळली आहे.

गोव्यात ग्रामीण भागात वास्तव्य करणाऱ्या मतदारांनी भाजपला पसंती दिली आहे. त्यांनी भाजपवर विश्वास दाखवला आहे. ईव्हीएमवर दोष ठेवणाऱ्या काँग्रेसला आता बॅलेट पेपरनेही नाकारले आहे. पुढील विधानसभा निवडणुकीत भाजपच्या मोठ्या विजयाची ही नांदी ठरेल.
डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री – गोवा राज्य

भाजपच्या जुलमी आणि भ्रष्ट कारभाराविरोधात जनतेने दिलेला हा कौल आहे. किमान या कौलाचा विचार करून तरी विरोधकांनी एकसंघ होण्याची गरज आहे. जनतेने विरोधकांना एकत्र येण्याचा सल्ला दिला आहे. काँग्रेसमधील अंतर्गत आणि बाहेरील कपटी घटकांना बाजूला सारणे गरजेचे आहे. हा जनतेचा विजय आहे. विरोधकांच्या मतविभागणीमुळे भाजपला फायदा झाला आहे. ही विभागणी दूर केली, तर भाजपचा २०२७ मध्ये सफाया निश्चित आहे.
युरी आलेमाव, विरोधी पक्षनेते

  • Related Posts

    EDC Records ₹128 Crore Revenue, ₹69 Crore Profit in FY 2025–26

    EDC Limited’s Board approved its financial statements for FY 2025–26, reporting ₹128 crore revenue and ₹69 crore profit. The Board also reviewed schemes, including an additional 5% rebate for solar projects and an Easy Exit Scheme for CMRY borrowers, aiming to support Goan entrepreneurs.

    GOA DOES NOT NEED AN ANTI-CONVERSION BILL

    The Goa Government’s proposed move to introduce an Anti-Conversion Bill during the forthcoming Assembly session calls for serious public discussion. Legislation of such significance cannot be justified merely on the ground that similar laws exist in other States.

    You Missed

    EDC Records ₹128 Crore Revenue, ₹69 Crore Profit in FY 2025–26

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 26, 2026
    • 8 views
    EDC Records ₹128 Crore Revenue, ₹69 Crore Profit in FY 2025–26

    GOA DOES NOT NEED AN ANTI-CONVERSION BILL

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 26, 2026
    • 11 views
    GOA DOES NOT NEED AN ANTI-CONVERSION BILL

    Rajnath Singh Inaugurates Hutatma Smruti Smarak at Patradevi

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 26, 2026
    • 13 views
    Rajnath Singh Inaugurates Hutatma Smruti Smarak at Patradevi

    Dandewado Villagers Halt NH66 Expansion Work, Demand Bypass and Project Clarity

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 26, 2026
    • 24 views
    Dandewado Villagers Halt NH66 Expansion Work, Demand Bypass and Project Clarity

    26/08/2026 e-paper

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 26, 2026
    • 17 views
    26/08/2026 e-paper

    बाऊन्सर्सच्या मदतीने घरात घुसखोरी

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 26, 2026
    • 26 views
    बाऊन्सर्सच्या मदतीने घरात घुसखोरी