महिलांविरोधातील गुन्ह्यांबाबत चुकीचा अर्थबोध

गोवा पोलिसांकडून एनसीआरबी अहवालाबाबत सारवासारव

गांवकारी, दि.९ (प्रतिनिधी)

महिलांविरोधातील गुन्ह्यांबाबत चुकीचा अर्थबोध होत असल्याचे गोवा पोलिसांनी स्पष्ट केले आहे. राष्ट्रीय गुन्हे नोंद ब्युरो (एनसीआरबी) च्या २०२४ च्या आकडेवारीनुसार गोवा महिलांविरोधातील गुन्ह्यांमध्ये पहिल्या क्रमांकावर असल्याचे दाखवण्यात आले होते. यामुळे राज्य सरकारची नाचक्की झाली असली तरी पोलिसांनी या आकडेवारीचा चुकीचा संदर्भ घेतला गेला असल्याचे सांगितले आहे.
पोलिसांचे म्हणणे आहे की बलात्कार आणि पोक्सो प्रकरणांची आकडेवारी एकत्रित दाखवली गेल्याने चुकीचा अर्थबोध झाला. प्रत्यक्षात १०५ प्रकरणांपैकी ६४ पोक्सो अंतर्गत असून ती स्वतंत्र श्रेणीत मोडतात. त्यामुळे बलात्काराचा दर ५.२ तर पोक्सो प्रकरणांचा दर ८.१ इतका राहतो, जो राष्ट्रीय सरासरीच्या तुलनेत आहे.
महिला सुरक्षेला प्राधान्य
गोवा पोलिसांनी महिलांच्या सुरक्षिततेसाठी तत्काळ गुन्हा नोंदविणे, संवेदनशील तपास आणि कठोर कारवाई करण्याचे धोरण अवलंबले आहे. गुन्हे नोंदविण्याचे प्रमाण जास्त असणे हे नागरिकांमध्ये वाढलेली जागरूकता आणि पोलिस यंत्रणांवरील विश्वास दर्शवते, असे त्यांनी म्हटले आहे.
नोंद झालेल्या प्रकरणांमध्ये आरोपी आणि पीडित परिचयातील असणे, लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार, परस्पर संमतीच्या नात्यातून उद्भवलेले वाद, अल्पवयीनांच्या पळून जाण्याशी संबंधित प्रकरणे यांचा मोठा भाग आहे. अनोळखी व्यक्तींनी केलेले लैंगिक अत्याचार किंवा सार्वजनिक ठिकाणी विनयभंगाच्या घटना अत्यल्प प्रमाणात असल्याचे विश्लेषणातून दिसून आले आहे.
गोवा पोलिसांनी बहुतांश प्रकरणांचा तातडीने उलगडा करून दोषारोपपत्र दाखल केले असून, ६० दिवसांच्या आत दोषारोपपत्र दाखल करण्याच्या निकषांमध्ये राज्याने सातत्याने यश मिळवले आहे.
महिला सरंक्षणासाठी तत्पर
महिला सुरक्षेसाठी पिंक फोर्स, एएचटीयू, महिला पोलीस स्टेशन, जनजागृती मोहिमा, सुलभ तक्रार नोंद प्रक्रिया, सायबर मॉनिटरिंग, जलद प्रतिसाद यंत्रणा, वाढीव गस्त आणि देखरेख यांसारख्या उपाययोजना राबवण्यात आल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

  • Related Posts

    २७ जूनपर्यंत सरकारला ‘अल्टीमेटम’

    खाजगी बस मालक आंदोलनाच्या पवित्र्यात गांवकारी, दि. २२ (प्रतिनिधी) राज्यातील खासगी बस मालकांच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत सरकारकडून कोणताही ठोस निर्णय होत नसल्याचा आरोप करत अखिल गोवा खाजगी बस मालक संघटनेतर्फे…

    मडगांवच्या विकास प्रकल्पांत पारदर्शकता राखा मडगांवचो आवाजचे नेते प्रभव नायक यांची मागणी

    मडगांवचो आवाज आणि युवा नेते प्रभव नायक यांनी मडगाव नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादर करून शहरातील महत्त्वाच्या विकास प्रकल्पांबाबत पारदर्शकता राखण्याची आणि नागरिकांना विश्वासात घेण्याची मागणी केली. जुन्या बसस्थानकाच्या पुनर्विकासाबाबत घाईघाईने निर्णय न घेता जनमत घ्यावे आणि स्मार्ट सिटीअंतर्गत मूलभूत प्रश्न सोडवावे अशी त्यांची मागणी आहे.

    You Missed

    23/06/2026 e-paper

    23/06/2026 e-paper

    मान्सूनपूर्व कामांचा पोलखोल

    मान्सूनपूर्व कामांचा पोलखोल

    चेकपोस्टच्या पोस्टिंगसाठी लाखोंच्या बोली ?

    चेकपोस्टच्या पोस्टिंगसाठी लाखोंच्या बोली ?

    AAP Demands Waiver of Power Bills, 300 Free Units and 24×7 Electricity Supply

    AAP Demands Waiver of Power Bills, 300 Free Units and 24×7 Electricity Supply

    PwD Reservation Rights Complaint: Gadekar Seeks Urgent Intervention from State Commissioner

    PwD Reservation Rights Complaint: Gadekar Seeks Urgent Intervention from State Commissioner

    22/06/2026 e-paper

    22/06/2026 e-paper