महाराष्ट्रात कोंकणी अकादमी स्थापणार

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची घोषणा
——————————————————————–
गांवकारी, दि. १४ (प्रतिनिधी) : महाराष्ट्रात कोंकणी अकादमी स्थापन करण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिणार असल्याची घोषणा गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली. गोव्यात महाराष्ट्र परिचय केंद्र कार्यरत आहे, मग ह्याच धर्तीवर महाराष्ट्रात कोंकणी अकादमी स्थापन झाल्यास कोंकणी साहित्यिकांना त्याचा मोठा फायदा होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पुणे येथे अखिल भारतीय कोंकणी परिषदेतर्फे आयोजित ३४ व्या अखिल भारतीय कोंकणी परिषद अधिवेशनाचे उद्घाटन मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. या अधिवेशनात देशभरातील कोंकणी साहित्यिक, कवी, अभ्यासक, संशोधक आणि भाषाप्रेमी सहभागी झाले आहेत.

कोंकणी ही केवळ संवादाची भाषा नसून ती आपली ओळख, सांस्कृतिक अस्मिता आणि समृद्ध वारसा आहे. विविध प्रदेशांमध्ये वास्तव्यास असलेल्या कोंकणी भाषिकांना आणि त्यांच्या पिढ्यांना जोडण्याचे महत्त्वपूर्ण कार्य ही भाषा करीत असल्याचे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले.

कोंकणी भाषेला समृद्ध साहित्यिक परंपरा लाभली असून तिचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्नांची आवश्यकता आहे. विशेषतः शिक्षण, संशोधन आणि डिजिटल युगात कोंकणी भाषेचा वापर अधिक व्यापक होणे गरजेचे आहे. त्यासाठी साहित्यिक, अभ्यासक आणि भाषाप्रेमींनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले.

महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणावर कोंकणी भाषिक वास्तव्यास आहेत. या पार्श्वभूमीवर स्वतंत्र कोंकणी अकादमी स्थापन झाल्यास कोंकणी साहित्यनिर्मिती, साहित्यिक उपक्रम आणि भाषेच्या संवर्धनाला चालना मिळू शकेल. महाराष्ट्रातील कोंकणी साहित्यिकांना एक स्वतंत्र व्यासपीठ उपलब्ध होण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरू शकतो.

अखिल भारतीय कोंकणी परिषदेसारखी अधिवेशने देशभरातील कोंकणी भाषिकांना एकत्र आणण्याबरोबरच भाषेच्या भविष्यातील वाटचालीवर विचारमंथन करण्याची संधी उपलब्ध करून देतात. कोंकणी भाषा आणि साहित्याच्या संवर्धनासाठी कार्यरत असलेल्या आयोजकांचे तसेच अधिवेशनात सहभागी झालेल्या प्रतिनिधींचे मुख्यमंत्री सावंत यांनी अभिनंदन केले.
कोंकणी आमची भास, कोंकणी आमचो वारसो, कोंकणी आमची वळख! या शब्दांत त्यांनी कोंकणी भाषेबद्दलचा अभिमान व्यक्त केला.

  • Related Posts

    भाजयुमोच्या ‘सीएम ट्रॉफी २.०’ स्पर्धेचा शुभारंभ; एक लाख युवकांच्या सहभागाचे उद्दिष्ट

    गांवकारी, दि. १४ (प्रतिनिधी) : भारतीय जनता युवा मोर्चा (भाजयुमो) गोवा प्रदेशतर्फे आयोजित ‘सीएम ट्रॉफी २.०’ या राज्यव्यापी क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेच्या लोगोचे आणि नोंदणीसाठीच्या क्यूआर कोडचे शनिवारी पणजीत अनावरण करण्यात आले. राज्यातील सर्व ४० विधानसभा मतदारसंघांमध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या या स्पर्धेत एक लाखाहून अधिक युवकांची नोंदणी करण्याचे उद्दिष्ट भाजयुमोने ठेवले आहे.

    तुयेत ‘आयटी हब’ प्रकल्प !

    आयपीबीकडून १७ हजार चौ. मी. गुंतवणूक क्षेत्र घोषित —————————————————————————— गांवकारी, दि. १४ (प्रतिनिधी) : पेडणे तालुक्यातील तुये येथे सुमारे साडेपाच लाख चौरस मीटर जमिनीवर उभारण्यात येत असलेला इलेक्ट्रॉनिक सिटी प्रकल्प…

    You Missed

    महाराष्ट्रात कोंकणी अकादमी स्थापणार

    • By Gaonkaari
    • नोव्हेंबर 14, 2026
    • 10 views
    महाराष्ट्रात कोंकणी अकादमी स्थापणार

    भाजयुमोच्या ‘सीएम ट्रॉफी २.०’ स्पर्धेचा शुभारंभ; एक लाख युवकांच्या सहभागाचे उद्दिष्ट

    • By Gaonkaari
    • नोव्हेंबर 14, 2026
    • 11 views
    भाजयुमोच्या ‘सीएम ट्रॉफी २.०’ स्पर्धेचा शुभारंभ; एक लाख युवकांच्या सहभागाचे उद्दिष्ट

    तुयेत ‘आयटी हब’ प्रकल्प !

    • By Gaonkaari
    • नोव्हेंबर 14, 2026
    • 12 views
    तुयेत ‘आयटी हब’ प्रकल्प !

    जमीन रूपांतरणाचा खेळ

    • By Gaonkaari
    • नोव्हेंबर 14, 2026
    • 12 views
    जमीन रूपांतरणाचा खेळ

    Heritage First Festival Opens in Panaji, to Showcase Goa’s Rich Cultural Legacy

    • By Gaonkaari
    • नोव्हेंबर 14, 2026
    • 9 views
    Heritage First Festival Opens in Panaji, to Showcase Goa’s Rich Cultural Legacy

    Former Goa CM Laxmikant Parsekar Returns to BJP Ahead of 2027 Assembly Elections

    • By Gaonkaari
    • नोव्हेंबर 13, 2026
    • 14 views
    Former Goa CM Laxmikant Parsekar Returns to BJP Ahead of 2027 Assembly Elections