पुरुष !

पुरुष एखाद्या स्त्रीच्या अगतिकतेला, बेचैनीला, तिच्या भावनिक अस्वस्थतेला लैंगिक दृष्टीने का पाहतो? कोणत्याही स्त्रीकडे लैंगिकता विरहित दृष्टीने पाहायला अनेक पुरुष असक्षम का ठरतात? ही आमच्या संस्कारातील, संगोपनातील मोठी त्रुटी आहे काय? लैंगिक मूल्ये शिकवण्यात आपण कमी पडतो आहोत काय?

चार–पाच वर्षांपूर्वीची, कोरोनानंतरची गोष्ट. बावीस वर्षांची एक तरुणी तिच्या आईसोबत डिप्रेशनवर उपचार घेण्यासाठी ओपीडीमध्ये आली होती. तिचं एका तरुणावर प्रेम होतं. पण वर्षभराच्या संबंधांनंतर त्या तरुणाने घरच्यांच्या विरोधामुळे लग्नाला नकार दिला. तिने आणि तिच्या नातेवाईकांनी त्याला परोपरीने समजावून पाहिलं, पण तो तयार झाला नाही. शेवटी तिने “लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक संबंध ठेवल्याची तक्रार” पोलिसात करीन अशी धमकी दिली. तरीही त्याने आपला निर्णय बदलला नाही. अखेर तिने पोलिसात गुन्हा नोंदवला. त्या तरुणाला अटक झाली आणि खटला सुरू झाला.
पण तिला त्याचा मनापासून राग नव्हता, शिक्षा व्हावी अशीही तिची इच्छा नव्हती. खटल्याचा मार्ग तिने निवडला तो फक्त त्याने आपला निर्णय बदलून लग्न करावे, या अपेक्षेने. त्यामुळे खटला सुरू असूनही तिची बेचैनी कमी झाली नव्हती. ती त्या बेचैनीवर, असहाय्यतेवर आणि निराशेवर उपचार घ्यायला ओपीडीमध्ये आली होती.
ओपीडीच्या भेटींपलीकडे ती अनेकदा मला फोन करून व्यक्त होत असे. नेहमीच तिला वेळ देणे शक्य नसे, म्हणून मी तिला आमच्या समुपदेशिकेचा रेफरन्स दिला. ती त्यांना भेटली आणि आता रोज त्यांनाही फोन करू लागली.
एका फॉलोअपला तिने एक अनुभव सांगितला. जेव्हा तिने पोलिस स्टेशनात तक्रार नोंदवली, तेव्हा तिथल्या एका पोलिसाने सहानुभूती दाखवत आपला नंबर दिला आणि “कधी टेंशन आले तर मला फोन कर” असं सांगितलं. ती जशी मला आणि समुपदेशिकेला सतत फोन करी, तशीच त्या पोलिसालाही करू लागली. आठवडाभरानंतर एक दिवस तो पोलिस म्हणाला: “तुझ्यात एवढी आग असेल तर मी शांत करू शकतो!”
त्याच्या अशा अनपेक्षित बोलण्याने ती हादरली आणि तिने त्याचा नंबर ब्लॉक केला.
प्रश्न असा आहे की तो पोलिस असे का वागला? ती भावनिकदृष्ट्या अस्वस्थ होती. कोणाशी बोलल्याने तिला तात्पुरता दिलासा मिळत असे. पण त्या पोलिसातला “पुरुष” मात्र तिच्या भावनिक अस्वस्थतेला लैंगिक अस्वस्थता समजत होता! किंबहुना त्याने नंबर दिलाच होता कारण त्याला तिची अस्वस्थता म्हणजे व्हल्नरेबल सावज वाटली असावी.
पुरुष एखाद्या स्त्रीच्या अगतिकतेला, बेचैनीला, तिच्या भावनिक अस्वस्थतेला लैंगिक दृष्टीने का पाहतो? कोणत्याही स्त्रीकडे लैंगिकता विरहित दृष्टीने पाहायला अनेक पुरुष असक्षम का ठरतात? ही आमच्या संस्कारातील, संगोपनातील मोठी त्रुटी आहे काय? लैंगिक मूल्ये शिकवण्यात आपण कमी पडतो आहोत काय?
सिमोन द बोव्हा म्हणाली होती: “स्त्री जन्माला येत नाही, ती घडवली जाते.” त्यासारखाच प्रश्न मला पडतो. आम्ही आमच्या समाजात निकोप दृष्टिकोन पाळू न शकणारा पुरुषदेखील घडवत आहोत काय?

  • डाॅ. रुपेश पाटकर
  • Related Posts

    पाळोळे बांधकाम प्रकरणी ३९(ए) अंतर्गत अर्ज

    पश्चिम बंगाल सभापतींच्या गोवा भेटीचे रहस्य उघडगावंकारी, दि. २५ (प्रतिनिधी) पश्चिम बंगाल विधानसभेचे सभापती रथिंद्र बोस यांच्या आर. बोस हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट प्रा. लि. कंपनीतर्फे पाळोळे-काणकोण येथील सर्व्हे क्रमांक १४८/६ मधील…

    चीनचे विनाशकारी ‘वॉटर बॉम्ब’!

    नेपाळमधील महापुरानंतर हिमनदीजन्य तलावांचा धोका चर्चेत; भारतासाठीही सतर्कतेचा इशारा नेपाळमध्ये आलेल्या विनाशकारी पुरामुळे मोठी जीवित आणि वित्तहानी झाल्याचे वृत्त समोर येत आहे. उपलब्ध माहितीनुसार, सात जिल्ह्यांना पुराचा मोठा फटका बसला…

    You Missed

    22/09/2026 e-paper

    • By Gaonkaari
    • सप्टेंबर 22, 2026
    • 17 views
    22/09/2026 e-paper

    १४ वर्षांचा सत्तावनवास संपणार ?

    • By Gaonkaari
    • सप्टेंबर 22, 2026
    • 22 views
    १४ वर्षांचा सत्तावनवास संपणार ?

    किमान वेतनात मोठी वाढ करा

    • By Gaonkaari
    • सप्टेंबर 22, 2026
    • 27 views
    किमान वेतनात मोठी वाढ करा

    Francis Coelho Quits AAP Goa, Questions Separate Opposition Front Ahead of 2027 Polls

    • By Gaonkaari
    • सप्टेंबर 21, 2026
    • 12 views
    Francis Coelho Quits AAP Goa, Questions Separate Opposition Front Ahead of 2027 Polls

    21/09/2026 e-paper

    • By Gaonkaari
    • सप्टेंबर 21, 2026
    • 15 views
    21/09/2026 e-paper

    उड्डाणपुलाच्या त्रुटींचे उत्तरदायित्व कोण घेणार ?

    • By Gaonkaari
    • सप्टेंबर 21, 2026
    • 14 views
    उड्डाणपुलाच्या त्रुटींचे उत्तरदायित्व कोण घेणार ?