पीडित की पोलिस, कोण खरे ?

कळंगुटातील बलात्कार प्रकरणाने खळबळ
गांवकारी, दि. १४ (प्रतिनिधी)

उत्तर प्रदेशातील २३ वर्षीय तरुणीने गोव्यातील एका स्पा मालकावर नोकरीचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा गंभीर आरोप केला आहे. या प्रकरणी तक्रार दाखल करू नये यासाठी काही पोलिस कर्मचाऱ्यांनी दबाव आणल्याचा धक्कादायक दावा तिने केला असून पोलिसांनी हा आरोप फेटाळला आहे. त्यामुळे पीडित की पोलिस – कोण खरे? असा सवाल उपस्थित झाला आहे.
या प्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या आवदेश राय याला न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. १२ जुलै रोजी कळंगुट पोलिस स्थानकात भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर १३ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार आरोपीला अटक करण्यात आली.
पीडितेचा आरोप आहे की, तक्रार दाखल करायला गेली असता तिला पैसे देऊन तसेच विमानाचे तिकीट काढून गोव्याबाहेर पाठवण्याचाही प्रयत्न करण्यात आला.
नोकरीच्या आमिषाने टाकला डाव
पीडितेच्या म्हणण्यानुसार, नोकरीच्या आश्वासनावरून तिला १० जुलै रोजी गोव्यात बोलावण्यात आले. त्याच रात्री कळंगुटमधील एका हॉटेलमध्ये तिच्यावर बलात्कार करण्यात आला. दुसऱ्या दिवशी तिने कळंगुट पोलिस स्थानकात धाव घेतली. मात्र, तक्रार दाखल करण्याऐवजी प्रकरण मिटवण्याचा दबाव आणण्यात आल्याचा तिचा आरोप आहे.
पोलिस स्थानकातील एका महिला अधिकाऱ्यासह दुसरी महिला स्वतःला वकील असल्याचे सांगत आली आणि बलात्काराची तक्रार नोंदवू नये, असे सांगून लैंगिक संबंध परस्पर संमतीने झाल्याचे निवेदन लिहून देण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न झाल्याचेही पीडितेने म्हटले आहे.
हरामखोराला अद्दल घडवण्याचा निर्धार
पीडितेला १० हजार रुपये रोख आणि लखनौला जाण्यासाठी विमानाचे तिकीट देण्यात आले. विमानतळावर सोडून तिचा मोबाईल फोनही विमानात बसल्यानंतरच परत करण्यात आला. मात्र, मुंबईत विमान बदलताना तिने आपल्या नातेवाईकांशी संपर्क साधला. त्यांच्या सल्ल्यानंतर ती पुन्हा गोव्यात परतली. या हरामखोराला अद्दल घडविण्याच्या निर्धाराने तिने पुन्हा पोलिसांकडे धाव घेतली.
१२ जुलै रोजी कळंगुट पोलिसांनी भारतीय न्याय संहिता अंतर्गत बलात्कारासह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. या प्रकरणातील पोलिसांच्या भूमिकेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

  • Related Posts

    चिखली उपजिल्हा रूग्णालयाची दैना
    आम आदमी पक्षाकडून पंचनामा

    वास्को, दि. १४ – आम आदमी पक्षाचे वरिष्ठ उपाध्यक्ष संदेश तेलेकर-देसाई यांनी पक्षाच्या इतर नेत्यांसह चिखली उपजिल्हा रुग्णालयाला भेट देऊन तेथील आरोग्य व्यवस्थेची अत्यंत वाईट अवस्था उघड केली. रुग्णालयाकडे जाणारे…

    Take One Last Look…

    An editorial warning that Goa’s unique identity, culture, and land are rapidly vanishing due to unchecked development and land transactions. It calls for Goans to unite and act to protect their state for future generations.

    You Missed

    चिखली उपजिल्हा रूग्णालयाची दैना
    आम आदमी पक्षाकडून पंचनामा

    चिखली उपजिल्हा रूग्णालयाची दैना<br>आम आदमी पक्षाकडून पंचनामा

    14/07/2026 e-paper

    • By Gaonkaari
    • जुलै 14, 2026
    • 19 views
    14/07/2026 e-paper

    शेवटची नजर टाका…

    • By Gaonkaari
    • जुलै 14, 2026
    • 14 views
    शेवटची नजर टाका…

    पीडित की पोलिस, कोण खरे ?

    • By Gaonkaari
    • जुलै 14, 2026
    • 15 views
    पीडित की पोलिस, कोण खरे ?

    Take One Last Look…

    • By Gaonkaari
    • जुलै 14, 2026
    • 19 views
    Take One Last Look…

    Bavaria Motors’ Appeal Dismissed; Goa Govt Upholds 90-Day Trade Certificate Suspension

    • By Gaonkaari
    • जुलै 13, 2026
    • 12 views
    Bavaria Motors’ Appeal Dismissed; Goa Govt Upholds 90-Day Trade Certificate Suspension