सावईकरांविरोधात ‘आप’ची पोलिसांत धाव

एफआयआर नोंदवा, अन्यथा न्यायालयात जाण्याचा इशारा

गांवकारी, दि. २३ (प्रतिनिधी)

भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी खासदार अॅड. नरेंद्र सावईकर यांनी आंदोलनकर्त्या युवकांविषयी फेसबुकवर केलेल्या पोस्टवरून राजकीय वाद पेटला आहे. आंदोलनकर्त्यांचा उल्लेख ‘झुरळे’ आणि ‘वाळवी’ असा करतानाच पोस्टमध्ये भारताचा कथित विकृत नकाशा वापरण्यात आल्याचा आरोप आम आदमी पार्टीने केला आहे. या प्रकरणी ‘आप’ने पणजी पोलिस स्थानकात तक्रार दाखल करून सावईकरांविरोधात तातडीने गुन्हा नोंदवण्याची मागणी केली आहे.
‘आप’ गोवाचे अध्यक्ष वाल्मिकी नाईक यांनी पत्रकार परिषदेत सावईकर यांच्या पोस्टवर जोरदार आक्षेप घेतला. शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्या युवकांना ‘झुरळे’ आणि ‘वाळवी’ संबोधणे हा केवळ त्यांचा अपमान नसून आंदोलनकर्त्यांविषयी द्वेष आणि वैमनस्य निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केला.
विशेषतः पोस्टमध्ये वापरण्यात आलेल्या भारताच्या नकाशावर ‘आप’ने गंभीर आक्षेप नोंदवला आहे. देशाच्या नकाशाचा कथित विकृत स्वरूपात वापर करून सावईकर यांनी आपल्या राष्ट्रप्रेमाचे वास्तव दाखवून दिल्याची टीका नाईक यांनी केली. भाजपने जणू देशभक्तीचा ठेका घेतल्याप्रमाणे वागू नये. राजकीय सोयीसाठी राष्ट्रीय ध्वज अथवा देशाच्या नकाशाचा गैरवापर करणे धिक्कारार्ह असल्याचेही त्यांनी म्हटले.
या प्रकरणात पोलिसांनी तातडीने दखल घेऊन कायद्यानुसार कारवाई करावी, अशी मागणी ‘आप’ने केली आहे. तक्रार दाखल केल्यानंतरही तीन दिवसांत एफआयआर नोंदवून योग्य कारवाई झाली नाही, तर पक्ष पुढील कायदेशीर पाऊल उचलेल, असा इशारा नाईक यांनी दिला. आवश्यकता भासल्यास न्यायालयातही दाद मागितली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
देशाच्या अखंडतेशी संबंधित प्रतीकांचा कथित गैरवापर तसेच आंदोलनकर्त्यांविषयी अवमानकारक भाषा वापरून सामाजिक वैमनस्य निर्माण करण्याच्या प्रकारांकडे दुर्लक्ष करता कामा नये, अशी भूमिका ‘आप’ने घेतली आहे. त्यामुळे आता या तक्रारीवर पणजी पोलिस कोणती कारवाई करतात, याकडे लक्ष लागले आहे.

  • Related Posts

    Girish Chodankar Writes Open Letter to BJP Chief Damu Naik, Slams ‘Abusive’ Political Discourse

    Goa Pradesh Congress Committee President Girish Chodankar has penned an open letter to BJP Goa President Damu Naik, condemning the use of derogatory language during a BJP protest and advocating for respectful, issue-based political discourse in Goa.

    Environment Activist Approaches DySP Over Valpoi Police’s Alleged Inaction on Illegal Stone Quarrying

    Environmental activist Harish Tulaskar has approached the Deputy Superintendent of Police (DySP), Bicholim Sub-Division, alleging inaction by the Valpoi Police over complaints concerning illegal stone quarrying at two locations in Sattari.

    You Missed

    Girish Chodankar Writes Open Letter to BJP Chief Damu Naik, Slams ‘Abusive’ Political Discourse

    • By Gaonkaari
    • जुलै 23, 2026
    • 16 views
    Girish Chodankar Writes Open Letter to BJP Chief Damu Naik, Slams ‘Abusive’ Political Discourse

    Environment Activist Approaches DySP Over Valpoi Police’s Alleged Inaction on Illegal Stone Quarrying

    • By Gaonkaari
    • जुलै 23, 2026
    • 27 views
    Environment Activist Approaches DySP Over Valpoi Police’s Alleged Inaction on Illegal Stone Quarrying

    23/07/2026 e-paper

    • By Gaonkaari
    • जुलै 23, 2026
    • 18 views
    23/07/2026 e-paper

    निर्दोष मुक्तता; पण प्रश्नांचे काय ?

    • By Gaonkaari
    • जुलै 23, 2026
    • 25 views
    निर्दोष मुक्तता; पण प्रश्नांचे काय ?

    सावईकरांविरोधात ‘आप’ची पोलिसांत धाव

    • By Gaonkaari
    • जुलै 23, 2026
    • 19 views
    सावईकरांविरोधात ‘आप’ची पोलिसांत धाव

    Goa Congress Vows Relentless Agitation Until Justice for Students

    • By Gaonkaari
    • जुलै 23, 2026
    • 15 views
    Goa Congress Vows Relentless Agitation Until Justice for Students