आदिवासींचे आता राज्यव्यापी आंदोलन

राजकीय आरक्षणासाठी १३ ऑगस्टला पणजीत महाआंदोलन

गांवकारी, दि. २७ (प्रतिनिधी)

राज्यातील भाजप सरकारने अनुसूचित जमातींना आगामी विधानसभा निवडणुकीत राजकीय आरक्षण देण्याचे वचन दिले होते. यासंदर्भात केंद्र सरकारने कायदाही संमत केला होता. एवढे करूनही राज्य आणि केंद्र सरकारच्या उदासिनतेमुळे संतप्त झालेल्या आदिवासी समाजाने राजकीय आरक्षणासाठी राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा केली आहे. १३ ऑगस्ट रोजी पणजीत विराट महाआंदोलन होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
उटा संघटनेतर्फे आयोजित पत्रकार परिषदेला संघटनेचे अध्यक्ष तथा माजी मंत्री प्रकाश वेळीप, उपाध्यक्ष गोविंद शिरोडकर, ॲड. जॉन फर्नांडिस, विश्वास गावडे, रुमाल्डो गोंसाल्विस, विशेष सचिव दुर्गादास गावडे, सचिव श्रीकांत गावकर, जोसेफ वाझ, जॉयसी डायस, प्रकाश गावकर, खजिनदार नामदेव फातर्पेकर आणि संयोजक रवींद्र वेळीप यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी अनुसूचित जमातींचे राजकीय आरक्षण लागू व्हावे, यासाठी एसटी लोकसंख्या असलेल्या मतदारसंघांमध्ये प्रभाग आणि ग्रामपातळीवर व्यापक जनजागृती बैठका आयोजित केल्या जाणार आहेत.
१३ ऑगस्ट २०२६ रोजी कायदेविषयक सूचनेला एक वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पणजीत सार्वजनिक सभा आणि ‘चलो पणजी’ असा महामोर्चा काढण्यात येणार आहे.
राज्य सरकारकडून मिळालेली आश्वासने आणि प्रत्यक्ष अंमलबजावणीतील दिरंगाई यावर उटा संघटनेने नाराजी व्यक्त केली आहे. लोकशाही मार्गाने सनदशीर हक्क मिळवण्यासाठी सर्व समाजबांधव आणि सामाजिक संस्थांनी या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन परिषदेत करण्यात आले.

  • Related Posts

    गणा धाव रे… गोव्याला पाव रे…: गोमंतकीय भूमीपुत्राचे गणरायाला भावनिक साकडे

    This is an emotional plea from a Goan to Lord Ganesha, urging him to awaken the wisdom in the hearts of Goans to protect their land. The author expresses concern about unchecked development, the sale of land, and money-driven politics that threaten Goa’s natural beauty, cultural identity, and the future of its youth. The plea is for discernment, courage, and a collective resolve to prioritize Goa’s future over personal gain, ensuring it remains an invaluable homeland for generations to come.

    गणा धाव रे… गोव्याला पाव रे…

    A heartfelt plea from a Goan native to Lord Ganesha, urging for the preservation of Goa’s identity, land, and future against unchecked development, money-driven politics, and the commodification of ancestral land. The plea emphasizes the need for Goans to awaken, question leadership, and prioritize Goa’s future over personal gain.

    You Missed

    गणा धाव रे… गोव्याला पाव रे…: गोमंतकीय भूमीपुत्राचे गणरायाला भावनिक साकडे

    • By Gaonkaari
    • सप्टेंबर 14, 2026
    • 19 views
    गणा धाव रे… गोव्याला पाव रे…: गोमंतकीय भूमीपुत्राचे गणरायाला भावनिक साकडे

    गणा धाव रे… गोव्याला पाव रे…

    • By Gaonkaari
    • सप्टेंबर 14, 2026
    • 19 views
    गणा धाव रे… गोव्याला पाव रे…

    Kejriwal’s Goa Visit Sparks Political Buzz; Major Announcement Today at 3 PM

    • By Gaonkaari
    • सप्टेंबर 12, 2026
    • 22 views
    Kejriwal’s Goa Visit Sparks Political Buzz; Major Announcement Today at 3 PM

    आरजीपीच्या नव्या राज्य कार्यालयाचे उद्घाटन

    • By Gaonkaari
    • सप्टेंबर 12, 2026
    • 30 views
    आरजीपीच्या नव्या राज्य कार्यालयाचे उद्घाटन

    ‘गोवा विकू देणार नाही’; काँग्रेसची २७ दिवसीय ‘गोंय राखण यात्रा’

    • By Gaonkaari
    • सप्टेंबर 12, 2026
    • 27 views
    ‘गोवा विकू देणार नाही’; काँग्रेसची २७ दिवसीय ‘गोंय राखण यात्रा’

    गणेश विसर्जन स्थळाच्या स्वच्छतेसाठी ‘टुगेदर फॉर म्हापसा’चा पुढाकार

    • By Gaonkaari
    • सप्टेंबर 12, 2026
    • 32 views
    गणेश विसर्जन स्थळाच्या स्वच्छतेसाठी ‘टुगेदर फॉर म्हापसा’चा पुढाकार