कुटीलांची कौटील्यबुद्धी

मुख्यमंत्री आणि भाजप प्रदेशाध्यक्ष यांचा हा कुटील डाव त्यांची कौटील्यबुद्धी सिद्ध करणारा ठरला ह्यात दुमतच नाही.

नवीन वर्षांच्या स्वागताचे गोव्याच्या पर्यटनाचे मुख्य आकर्षण ठरलेला सनबर्न महोत्सव तूर्त धारगळीत होणार हे आता निश्चित झाले आहे. आयोजकांना परवानगी दिली नाही,असे सांगून सरकारने न्यायालयाची दिशाभूल केली खरी परंतु आतुन हा महोत्सव धारगळीत घडवून आणण्याचा डाव अखेर धारगळ पंचायतीच्या ठरावाने उघड झाला. धारगळ पंचायत मंडळाच्या आजच्या बैठकीत हा ठराव ५ विरूद्ध ४ मतांनी मंजूर झाला. हा ठराव मंजूर करण्यासाठी सत्ताधारी पंचायत मंडळाने केलेले युक्तीवाद आणि दिलेली कारणे ही केवळ हास्यास्पदच नव्हे तर धारगळवासीयांना विचार करण्यास लावणारी ठरणार आहेत. कचरा व्यवस्थापनासाठी वाहन आणि कायदेशीर निधी, स्थानिकांना रोजगार आणि व्यवसायसंधी आदी प्रमुख अटी समर्थकांनी बोलून दाखवल्या. डेल्टीनचा टाऊनशीप प्रकल्प जो धारगळीतच उभा राहणार आहे, जिथे हा महोत्सव साजरा केला जाणार आहे, त्याबाबत पंचायतीने आपला प्रस्ताव पाठवला आहे काय. फक्त तीन दिवसांच्या या महोत्सव आयोजकांना तीन दिवसांसाठीचा प्रस्ताव पाठवणाऱ्या पंचायत मंडळाला कायमस्वरूपी प्रकल्पांकडून काय मिळाले, याचे उत्तर पहिल्यांदा शोधावे लागेल. आयूष इस्पितळात धारगळचे किती लोक कामाला लागले, याचा आकडा दिला तर बरे होईल. कचरा व्यवस्थापनासाठी सरकारकडून अर्थ सहाय्य मिळते. पंचायतीने लोकांकडून योग्य पद्धतीने कर आकारणी केल्यास हा खर्च भागवता येतो, परंतु अशा गोष्टींना प्रोत्साहन देऊन त्या बदल्यात साधनसुविधांसाठी आर्थिक मदत मागणे ही गोष्ट कितपत परवडणारी आहे. सत्ताधारी पंचायत मंडळावर प्रचंड राजकीय दबाव आहे हे कुणीही अमान्य करणार नाही. खुद्द मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आपले समर्थक आणि काही पंचायत मंडळाला हा महोत्सव धारगळीत व्हायला हवा, असे सांगितल्याची चर्चा आहे. मुख्यमंत्र्यांचा शब्द पाळला तर आपले भले होईलच आणि आपली कामेही होतील, या भावनेतून हे पंचायत मंडळ वागले त्यात त्यांचा दोष तो काय.
स्थानिक आमदार आणि पंचायत मंडळाचे वैर असल्यामुळे पक्षाने आमदाराला लोकांसोबत रहा, असा सल्ला देऊन विरोधी लोकांचा विश्वास संपादन केला आणि मुख्यमंत्र्यांनी सत्ताधारी मंडळाला ठराव मंजूर करा, असे सांगून आपलाही डाव साध्य करून घेतला. मुख्यमंत्री आणि भाजप प्रदेशाध्यक्ष यांचा हा कुटील डाव त्यांची कौटील्यबुद्धी सिद्ध करणारा ठरला ह्यात दुमतच नाही. धारगळ हा शहरीकरणाच्या दिशेने झेप घेणारा गांव ठरला आहे. भविष्यात धारगळचा काही भाग हा पेडणे पालिका क्षेत्रात समावेश होऊ शकतो. आयूष इस्पितळ, डेल्टीन कॅसिनो टाऊनशीप आणि अन्य इतर अनेक प्रकल्प येथे होऊ घातले आहेत. या प्रकल्पांत धारगळकर स्वतःचे स्थान किंवा संधी कुठे आणि काय पाहतात हे महत्वाचे आहे. धारगळीत नवीन स्थलांतरित लोकांची संख्या वाढत चालली आहे. अंतर्गत भाग मात्र तसाच अविकसीत आहे. सुधारीत भागांतील लोकच धारगळचे भवितव्य ठरवू लागले आहेत. धारगळच्या पंच सदस्यांवर नव्यानेच धारगळीत दाखल झालेल्या लोकांचा प्रभाव वाढू लागला आहे. या लोकांनी अर्थकारण समजून या पंचसदस्यांना सोबत घेऊन आपले फासे टाकायला सुरूवात केली आहे. धारगळवासीय वेळीच सावध झाले नाहीत ते आपल्याच गावांत नाममात्र रहिवाशी ठरणार हे नक्की.

  • Related Posts

    चटका लावणारी एक्झिट

    डॉ. केतन भाटीकर यांच्या अकाली आणि दुर्दैवी निधनाने फोंडा तालुक्यासह संपूर्ण गोवा हळहळला आहे. एका तरुण, ऊर्जावान, समाजाभिमुख आणि राजकीय क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण करू पाहणाऱ्या नेतृत्वाचा असा अचानक अंत…

    परवानगीचेही राजकारण

    ही केवळ परवानगी नाकारण्याची बाब राहिलेली नाही; तर लोकशाहीतील असहमतीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न म्हणून ती अधिक गंभीर बनत चालली आहे. गोव्यात सध्या एक विचित्र आणि धोकादायक वातावरण तयार होताना दिसत…

    You Missed

    15/05/2026 e-paper

    15/05/2026 e-paper

    ‘नीट युजी २०२६’ फेरपरीक्षेची तारीख जाहीर

    ‘नीट युजी २०२६’ फेरपरीक्षेची तारीख जाहीर

    चटका लावणारी एक्झिट

    चटका लावणारी एक्झिट

    चटका लावणारी एक्झिट

    चटका लावणारी एक्झिट

    Goa Loses Young Leader: Dr. Ketan Bhatikar Dies After Alleged Snakebite at Anmod

    Goa Loses Young Leader: Dr. Ketan Bhatikar Dies After Alleged Snakebite at Anmod

    14/05/2026 e-paper

    14/05/2026 e-paper