स्वातंत्र्यसैनिक लिबिया लोबो सरदेसाई यांच्या हस्ते होणार ‘18 जूनचे 64 दिवस’ या इंग्रजी पुस्तकाचे स्वातंत्र्य दिनी प्रकाशन

पणजी,दि.10: पत्रकार व लेखक संदेश प्रभुदेसाय यांच्या ‘64 Days of 18 June 1946’ (18 जूनचे 64 दिवस) या इंग्रजी पुस्तकाचे येत्या स्वातंत्र्य दिनी मडगावला प्रकाशन होणार आहे.

क्युरेट प्रकाशनाच्या या पुस्तकाचे प्रकाशन 102 वर्षांच्या जेष्ठ स्वातंत्र्यसैनिक ॲड लिबिया लोबो सरदेसाई यांच्या हस्ते 15 ऑगस्ट रोजी 4.30 वाजता मडगावच्या रविन्द्र भवनातील ब्लॅक बॉक्समध्ये संपन्न होणार आहे.

300 हून जास्त पृष्ठे असलेल्या या पुस्तकात 18 जून 1946 नंतर तब्बल 64 दिवस गोवाभरातील सामान्य लोक कशा प्रकारे उत्स्फूर्तपणे रस्त्यावर उतरले याचा तारीखवार लेखाजोगा घेण्यात आलेला आहे. कोणतेही केंद्रीय नेतृत्व वा संघटना नसतानासुद्धा खास करून ख्रिश्चनबहुल जुन्या काबिजादीतील गावांमध्ये व इतर ठिकाणी तसेच मुंबईतसुद्धा उत्स्फूर्त आंदोलने झाली होती. महत्वाचे म्हणजे त्यासाठी पुढाकार घेतलेले बहुतांश स्थानिक कार्यकर्ते हे आजच्या ‘जॅन झी’ सारखे केवळ 14 ते 30 वयोगटातील होते.

डॉ राममनोहर लोहिया यांनी 18 जून रोजी नागरी स्वातंत्र्यासाठी सुरू केलेला लढ्याचे रुपांतर तत्कालीन आर्थिक कारणांमुळे कशा प्रकारे दुसऱ्याच दिवसापासून पोर्तुगालच्या फॅसिस्ट सालाझारशाही विरोधातील स्वातंत्र्यलढ्यात झाले याची सविस्तर कारणमिमांसा या पुस्तकात करण्यात आलेली आहे. तसेच या स्वातंत्र्यलढ्याचे पडसाद राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरसुद्धा कसे उमटले व स्थानिक पातळीवरील नेतृत्वामधल्या मतभेदांचा या जनआंदोलनाला कसा फटका बसला त्याचेही विश्लेषण करण्यात आले आहे.

भारतातील नामांकित राज्यशास्त्रज्ञ व विश्लेषक प्रा. डॉ. पीटर रोनाल्ड डिसोझा हे या प्रकाशन समारंभात प्रमुख वक्ते म्हणून भाष्य करणार आहेत. तसेच डॉ राममनोहर लोहिया सिसर्च फाउंडेशनचे अध्यक्ष व राष्ट्रीय पत्रकार अभिषेक रंजन सिंग सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित असतील.

डॉ त्रिस्तांव ब्रागांझा कुन्हा यांच्यावर डॉक्टरेट केलेल्या अभ्यासक डॉ निष्ठा देसाई यांची प्रस्तावना या पुस्तकाला लाभली आहे. पत्रकार व साहित्यिक अन्वेषा सिंगबाळ या कार्यक्रमाच्या सूत्रधार असतील.

या पुस्तकाची सवलतीच्या दरातील प्रकाशनपूर्व नोंदणी अमेझॉनवर सुरू झालेली असून प्रकाशन समांरभावेळी त्याहूनही जास्त सवलतीच्या दरात हे पुस्तक मिळेल. त्याशिवाय या पुस्तकाचे ई-बूकही प्रकाशित होणार आहे.

  • Related Posts

    स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला तालुकावार जागृती निदर्शने

    १० मागण्यांच्या पूर्ततेसाठी आग्रह गांवकारी, दि. १० (प्रतिनिधी) ‘इनफ इज इनफ, गोवा’ चळवळीतर्फे येत्या १४ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राज्यातील विविध तालुक्यांमध्ये जागृती निदर्शने करण्यात येणार आहेत. या वेळी चळवळीच्या…

    Goa Congress Holds Strategy Meeting with Leaders from All 40 Constituencies

    The Goa Pradesh Congress Committee (GPCC) held a strategic planning meeting with representatives from all 40 Assembly constituencies to strengthen grassroots organisation and prepare for future elections.

    You Missed

    अति तिथे माती !

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 10, 2026
    • 21 views
    अति तिथे माती !

    स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला तालुकावार जागृती निदर्शने

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 10, 2026
    • 15 views

    सांगेतील वादावर पडदा

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 10, 2026
    • 12 views
    सांगेतील वादावर पडदा

    Goa Congress Holds Strategy Meeting with Leaders from All 40 Constituencies

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 10, 2026
    • 11 views
    Goa Congress Holds Strategy Meeting with Leaders from All 40 Constituencies

    10/08/2026 e-paper

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 10, 2026
    • 10 views
    10/08/2026 e-paper

    स्वातंत्र्यसैनिक लिबिया लोबो सरदेसाई यांच्या हस्ते होणार ‘18 जूनचे 64 दिवस’ या इंग्रजी पुस्तकाचे स्वातंत्र्य दिनी प्रकाशन

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 10, 2026
    • 19 views
    स्वातंत्र्यसैनिक लिबिया लोबो सरदेसाई यांच्या हस्ते होणार ‘18 जूनचे 64 दिवस’ या इंग्रजी पुस्तकाचे स्वातंत्र्य दिनी प्रकाशन