स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला तालुकावार जागृती निदर्शने

१० मागण्यांच्या पूर्ततेसाठी आग्रह

गांवकारी, दि. १० (प्रतिनिधी)

‘इनफ इज इनफ, गोवा’ चळवळीतर्फे येत्या १४ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राज्यातील विविध तालुक्यांमध्ये जागृती निदर्शने करण्यात येणार आहेत. या वेळी चळवळीच्या १० प्रमुख मागण्यांविषयी जनजागृती केली जाणार असून, चळवळीच्या विविध उपक्रमांची माहितीही जनतेसमोर मांडली जाणार आहे.

आज आयोजित पत्रकार परिषदेत चळवळीचे सचिव देविदास आमोणकर यांनी ही माहिती दिली. याप्रसंगी चळवळीचे अध्यक्ष गोविंद शिरोडकर, कोअर समितीचे सदस्य स्वप्नेश शेर्लेकर आणि निवृत्त आयपीएस अधिकारी बॉस्को जॉर्ज उपस्थित होते.

चळवळीतर्फे यापूर्वीच विधानसभेतील सर्व आमदारांना ‘गोवा कृषी संरक्षण विधेयक-२०२६’ सादर करण्यात आले आहे. मागील अधिवेशनात हे विधेयक चर्चेसाठी येणार होते; परंतु अधिवेशन रद्द झाल्यामुळे ते शक्य झाले नाही. आता तीन दिवसांच्या अधिवेशनात सरकारनेच हे विधेयक मंजूर करून घ्यावे, अशी मागणी या वेळी करण्यात आली.

ही चळवळ भावी पिढीच्या सुरक्षेसाठी तसेच भविष्यातील गोवा सुरक्षित ठेवण्यासाठी आहे. निवृत्त न्यायमूर्ती फेर्दिन रिबेलो यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक विषयावर कायदेशीर तोडगा काढून लोकशाहीच्या तत्त्वांनुसार पुढे जाण्याचा निर्धार चळवळीने केला आहे.

मांडवी नदीतील कॅसिनो हटविण्यासाठी चळवळीतर्फे न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेमुळेच मांडवीत येऊ घातलेले आणखी एक भयावह कॅसिनो जहाज रोखण्यात यश मिळाले. जोपर्यंत मांडवीतून कॅसिनो हटविले जात नाहीत, तोपर्यंत हा लढा सुरूच राहणार आहे.

  • Related Posts

    Goa Congress Holds Strategy Meeting with Leaders from All 40 Constituencies

    The Goa Pradesh Congress Committee (GPCC) held a strategic planning meeting with representatives from all 40 Assembly constituencies to strengthen grassroots organisation and prepare for future elections.

    स्वातंत्र्यसैनिक लिबिया लोबो सरदेसाई यांच्या हस्ते होणार ‘18 जूनचे 64 दिवस’ या इंग्रजी पुस्तकाचे स्वातंत्र्य दिनी प्रकाशन

    पत्रकार व लेखक संदेश प्रभुदेसाय यांच्या ‘64 Days of 18 June 1946’ या इंग्रजी पुस्तकाचे येत्या स्वातंत्र्य दिनी 102 वर्षांच्या जेष्ठ स्वातंत्र्यसैनिक ॲड लिबिया लोबो सरदेसाई यांच्या हस्ते प्रकाशन होणार आहे. हे पुस्तक 18 जून 1946 नंतर गोवाभरातील सामान्य लोकांनी केलेल्या उत्स्फूर्त आंदोलनाचा तारीखवार लेखाजोगा मांडते.

    You Missed

    अति तिथे माती !

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 10, 2026
    • 22 views
    अति तिथे माती !

    स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला तालुकावार जागृती निदर्शने

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 10, 2026
    • 17 views

    सांगेतील वादावर पडदा

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 10, 2026
    • 14 views
    सांगेतील वादावर पडदा

    Goa Congress Holds Strategy Meeting with Leaders from All 40 Constituencies

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 10, 2026
    • 11 views
    Goa Congress Holds Strategy Meeting with Leaders from All 40 Constituencies

    10/08/2026 e-paper

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 10, 2026
    • 11 views
    10/08/2026 e-paper

    स्वातंत्र्यसैनिक लिबिया लोबो सरदेसाई यांच्या हस्ते होणार ‘18 जूनचे 64 दिवस’ या इंग्रजी पुस्तकाचे स्वातंत्र्य दिनी प्रकाशन

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 10, 2026
    • 20 views
    स्वातंत्र्यसैनिक लिबिया लोबो सरदेसाई यांच्या हस्ते होणार ‘18 जूनचे 64 दिवस’ या इंग्रजी पुस्तकाचे स्वातंत्र्य दिनी प्रकाशन