नियमांची सुरुवात सरकारपासूनच व्हावी!

विशेषतः सरकारी कदंब आणि बालरथ बसेसपासून तपासणीची सुरुवात झाली पाहिजे. नियम मोडणारे वाहन सरकारी असो वा खासगी, कारवाई समान असली पाहिजे.

शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक हा केवळ वाहतुकीचा विषय नाही, तर तो हजारो मुलांच्या सुरक्षिततेशी थेट संबंधित आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने स्कूल बस आणि विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी स्पष्ट नियमावली आखली आहे. मात्र, नियम सामान्य नागरिकांसाठी एक आणि सरकारी यंत्रणेसाठी दुसरे, अशी परिस्थिती निर्माण झाली तर त्या नियमांचा मूळ उद्देशच पराभूत होतो. कायदा आणि नियमांचे पालन करण्याची सुरुवात सरकारने स्वतःपासून करणे आवश्यक आहे.

गोव्यात बालरथ, कदंबच्या बसेस तसेच खासगी बस आणि इतर वाहनांमधून मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांची वाहतूक होते. वाहतूक पोलीस आणि आरटीओकडून खासगी वाहनांची तपासणी केली जाते. नियमभंग आढळल्यास दंडात्मक कारवाईही होते. ती व्हायलाच हवी. परंतु याच निकषांवर कदंब आणि बालरथ बसेसची तपासणी होते का, हा प्रश्न दुर्लक्षित करता येणार नाही. कायद्यापुढे सरकारी आणि खासगी असा भेद असता कामा नये.

आरटीआय कार्यकर्ते आणि वाहतूकदार सुदीप ताम्हणकर यांनी याच मुद्याकडे वाहतूक संचालकांचे लक्ष वेधले. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी तडजोड थांबवावी आणि नियमांची कठोर अंमलबजावणी करावी, अशी मागणी त्यांनी केली. त्यानंतर वाहतूक संचालक अरविंद खुंटकर यांनी उत्तर आणि दक्षिण गोव्यातील सहाय्यक वाहतूक संचालकांसह संबंधित अधिकाऱ्यांना स्कूल बस सुरक्षा नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत.

आदेशातील बाबी महत्त्वाच्या आहेत. विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांना ठरावीक रंग व ‘स्कूल बस’ अशी स्पष्ट ओळख, स्पीड गव्हर्नर, खिडक्यांना सुरक्षा ग्रील, सुरक्षित दरवाजे, आसनाखाली स्कूल बॅग ठेवण्याची व्यवस्था, चालकांच्या पूर्वइतिहासाची आणि वार्षिक वैद्यकीय तंदुरुस्तीची पडताळणी, तसेच विद्यार्थिनींच्या वाहतुकीवेळी पात्र महिला सहाय्यकाची उपस्थिती यांसारख्या नियमांची पूर्तता तपासण्याचे निर्देश आहेत. विद्यार्थी यादी, मार्ग परवाना आणि आपत्कालीन संपर्क नोंदीही तपासल्या जाणार आहेत.

मात्र, प्रश्न आदेश काढण्याचा नाही; त्याच्या अंमलबजावणीचा आहे. काही दिवस तपासण्या करून पुन्हा ‘येरे माझ्या मागल्या’ अशी अवस्था होता कामा नये. विशेषतः सरकारी कदंब आणि बालरथ बसेसपासून तपासणीची सुरुवात झाली पाहिजे. नियम मोडणारे वाहन सरकारी असो वा खासगी, कारवाई समान असली पाहिजे.

समाजात शिस्त निर्माण करण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. प्रशासनच बेशिस्तीला मूक संमती देत असेल, तर नागरिकांकडून नियमपालनाची अपेक्षा करण्याचा नैतिक अधिकार सरकार गमावते. मुलांच्या सुरक्षिततेच्या बाबतीत तर तडजोडीला अजिबात जागा नाही. नियम सर्वांसाठी असतील, तर ते सर्वप्रथम सरकारने पाळून दाखवावेत.

  • Related Posts

    आरोप गंभीर; सत्य काय ?

    सरकारलाही या प्रकरणी मौन धारण करता येणार नाही. दाखल झालेल्या तक्रारीबाबत प्राथमिक चौकशी करून तथ्य जनतेसमोर आणणे ही यंत्रणांची जबाबदारी आहे. राज्याचे दोन क्रमांकाचे मंत्री असलेले विश्वजीत राणे आणि पर्येच्या…

    मगोची साथ, भाजपची डोकेदुखी ?

    ढवळीकरांवर पूर्ण विश्वास ठेवणे भाजपसाठी जोखमीचे असले, तरी त्यांना दूर ठेवणे त्याहून मोठी राजकीय चूक ठरू शकते. गोव्याच्या राजकारणात महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे स्थान आज संख्येने मर्यादित असले, तरी राजकीय समीकरणांच्या…

    You Missed

    Amit Patkar Demands Better Pay, Job Security for Pre-Primary Teachers; Announces Teachers’ Town Hall

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 27, 2026
    • 10 views
    Amit Patkar Demands Better Pay, Job Security for Pre-Primary Teachers; Announces Teachers’ Town Hall

    Goa Needs Law Against Its Conversion Into a ‘Sin Destination’: Prabhav Naik

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 27, 2026
    • 24 views
    Goa Needs Law Against Its Conversion Into a ‘Sin Destination’: Prabhav Naik

    Goa College of Agriculture Students Get Practical Exposure to Agri-Industry

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 27, 2026
    • 17 views
    Goa College of Agriculture Students Get Practical Exposure to Agri-Industry

    चीनचे विनाशकारी ‘वॉटर बॉम्ब’!

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 27, 2026
    • 19 views
    चीनचे विनाशकारी ‘वॉटर बॉम्ब’!

    27/08/2026 e-paper

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 27, 2026
    • 18 views
    27/08/2026 e-paper

    नियमांची सुरुवात सरकारपासूनच व्हावी!

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 27, 2026
    • 20 views
    नियमांची सुरुवात सरकारपासूनच व्हावी!