‘लोकनायक’ माहितीपटाचे ४ सप्टेंबरला पर्तगाळी मठात प्रदर्शन

मडगाव, ३ सप्टेंबर २०२६ : मडगावचे माजी आमदार तथा मंत्री अनंत (बाबू) नरसिंह नायक यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या प्रेरणादायी जीवनकार्यावर आधारित ‘लोकनायक’ या माहितीपटाचे विशेष प्रदर्शन शुक्रवार, ४ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठ येथे आयोजित करण्यात आले आहे.

बाबू नायक जन्मशताब्दी सोहळा समितीचे अध्यक्ष श्रीनिवास व्ही. धेंपे यांनी ही माहिती दिली. परमपूज्य श्रीमद् विद्याधीशतीर्थ श्रीपाद वडेर स्वामीजी, मठाधिपती, श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठ यांच्या उपस्थितीत माहितीपटाचे प्रदर्शन होणार आहे.

हिंदू पंचांगानुसार बाबू नायक यांची जन्मतिथी याच दिवशी येत असल्याने या कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. बाबू नायक यांचा जन्म गोकुळाष्टमीच्या पवित्र दिवशी झाला होता. यंदा गोकुळाष्टमी ४ सप्टेंबर रोजी साजरी होत असल्याने त्यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यातील हा कार्यक्रम विशेष ठरणार असल्याचे धेंपे यांनी सांगितले.

बाबू नायक हे पर्तगाळी मठाचे निष्ठावंत शिष्य होते. मडगाव येथील मठग्राम मठ संकुल तसेच श्री मारुती मंदिराच्या उभारणीत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. मठ आणि समाजासाठी केलेल्या त्यांच्या योगदानाची दखल घेत पर्तगाळी मठातर्फे त्यांना प्रतिष्ठेच्या ‘विद्याधिराज पुरस्काराने’ गौरविण्यात आले होते.

“गोकुळाष्टमीच्या पवित्र दिवशी पर्तगाळी मठात ‘लोकनायक’ माहितीपटाचे प्रदर्शन होणे, हे बाबू नायक यांच्या मठावरील गाढ श्रद्धेचे आणि या आध्यात्मिक संस्थेशी असलेल्या त्यांच्या चिरंतन नात्याचे प्रतीक आहे,” असे श्रीनिवास धेंपे यांनी नमूद केले.

या विशेष प्रदर्शनाला बाबू नायक यांच्या कुटुंबीयांचीही उपस्थिती राहणार आहे.

  • Related Posts

    Goa Govt Notifies Regularisation Rules for 10-Year Contractual Employees; Thousands Set to Benefit

    CM Pramod Sawant delivers on assurance; one-time regularisation covers eligible Group A, B and C contractual staff, departments told to submit lists within 15 days

    कारापूरवासीयांसोबत ‘पॉझिटिव्ह’ बैठक

    मुख्यमंत्र्यांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना महत्वाचे निर्देश गांवकारी, दि. ३ (प्रतिनिधी) प्रस्तावित हाऊस ऑफ अभिनंदन लोढा प्रकल्पाविरोधात कारापूर-सर्वण येथील ग्रामस्थांचे सुरू असलेले आंदोलन निर्णायक वळणावर आले आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी…

    You Missed

    Goa Govt Notifies Regularisation Rules for 10-Year Contractual Employees; Thousands Set to Benefit

    • By Gaonkaari
    • सप्टेंबर 3, 2026
    • 11 views
    Goa Govt Notifies Regularisation Rules for 10-Year Contractual Employees; Thousands Set to Benefit

    03/09/2026 e-paper

    • By Gaonkaari
    • सप्टेंबर 3, 2026
    • 16 views
    03/09/2026 e-paper

    कारापूरवासीयांसोबत ‘पॉझिटिव्ह’ बैठक

    • By Gaonkaari
    • सप्टेंबर 3, 2026
    • 22 views
    कारापूरवासीयांसोबत ‘पॉझिटिव्ह’ बैठक

    योजनांव्दारे मतांचा पाऊस !

    • By Gaonkaari
    • सप्टेंबर 3, 2026
    • 16 views
    योजनांव्दारे मतांचा पाऊस !

    Amit Patkar to Hold Teachers’ Town Hall in Margao on September 6

    • By Gaonkaari
    • सप्टेंबर 3, 2026
    • 21 views
    Amit Patkar to Hold Teachers’ Town Hall in Margao on September 6

    Karapur Protest Sees Major Breakthrough: CM Orders Land Verification, Legal Review of HOABLodha Project

    • By Gaonkaari
    • सप्टेंबर 3, 2026
    • 20 views
    Karapur Protest Sees Major Breakthrough: CM Orders Land Verification, Legal Review of HOABLodha Project